Shikhar Dhawan Bollywood Debut : भारतीय क्रिकेटर शिखर धवन (Shikhar Dhawan) याला आवडीने फॅन्स गब्बर म्हणून संबोधतात. आता हाच गब्बर लवकरच एका बॉलिवूड चित्रपटात दिसणार आहे. शिखर धवनची भूमिका असलेला हा चित्रपट एक कॉमेडी चित्रपट असेल. या चित्रपटात भारतीय क्रिकेटर शिखर धवनसोबत बॉलीवुड अभिनेत्री हुमा कुरेशी आणि सोनाक्षी सिन्हा दिसणार आहेत. शिखर धवनच्या या बॉलिवूड चित्रपटाबद्दल चाहते कमालीचे उत्सुक दिसत आहेत. शिखर धवनच्या नेतृत्त्वाखाली नुकतच भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 3 वनडे मालिकेतील दोन सामने जिंकत मालिका 2-1 ने जिंकली आहे.


बॉलीवुडमध्ये शिखर पदार्पण करणार असला तरी क्रिकेटवर त्याचं अधिक लक्ष्य असून काही दिवसांपूर्वीच त्याने आगामी एकदिवसीय विश्वचषक आपलं लक्ष्य असल्याचं सांगितलं. शिखर धवनने त्याचं लक्ष पुढील वर्षी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकावर असल्याचं सांगितलं. त्यासाठी मला जास्तीत जास्त सामने खेळायचे आहेत, असंही त्याने नमूद केलं. विश्वचषकापूर्वी अधिक सराव व्हावा यासाठी मला जास्तीत जास्त सामने खेळायचे असून सध्या मी चांगल्या फॉर्ममध्ये असून हाच फॉर्म कायम ठेवून विश्वचषकात संघासाठी चांगली कामगिरी करायची आहे, असं तो म्हणाला.  


मोठ्या स्पर्धांचा खेळाडू आहे शिखर


विश्वचषक तसंच आयसीसी चॅम्पियनशिप ट्रॉफीसारख्या भव्य स्पर्धांमध्ये शिखर धवनने आजवर जबरदस्त फलंदाजी केली आहे. दरम्यान, 2013 आणि 2017 मध्ये खेळण्यात आलेल्या चॅम्पियनशिप ट्रॉफीमध्ये भारतासाठी त्यानं सर्वाधिक धावा केल्या होत्या. याशिवाय, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड मध्ये 2015 खेळल्या गेलेल्या विश्वचषकातही त्यानं चमकदाक कामगिरी केली होती. या विश्वचषकातही त्यानं भारतासाठी सर्वाधिक धावा केल्या होत्या.  श्रीलंका दौऱ्यावर शिखन धवननं एकदिवसीय संघांचं नेतृत्व केलं होतं. आयपीएलनंतर त्याला भारतीय संघात स्थान मिळालं नाही. इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिकेतही त्याची संघात निवड झाली नव्हती. मात्र, इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेत त्याला संघात स्थान देण्यात आलं आहे. भारताच्या वेस्ट इंडीज दौऱ्यावर शिखर धवन भारतीय संघाचं नेतृत्व करताना दिसणार आहे. 


हे देखील वाचा-