BCCI New President: भारताच्या 1983 च्या एकदिवसीय विश्वचषक (1983 World Cup) विजेत्या संघाचे सदस्य रॉजर बिन्नी (Roger Binny) यांनी मंगळवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केलाय. महत्वाचं म्हणजे, रॉजर बिन्नी (Roger Binny) यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी (BCCI President) बिनविरोध निवड होण्याची शक्यता असल्याची माहिती बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला (Rajeev Shukla) यांनी दिली. बेंगळुरू (Bengaluru) येथील रहिवासी असलेले 67 वर्षीय बिन्नी हे या पदासाठी अर्ज दाखल करणारे एकमेव उमेदवार आहेत. जर इतर कोणीही उमेदवारी अर्ज सादर न केल्यास 18 ऑक्टोबर रोजी मुंबईत (Mumbai) होणाऱ्या बोर्डाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (Annual General Meeting) रॉजर बिन्नी सौरव गांगुलींची (Sourav Ganguly) जागा घेतील. 


आठवड्याभराच्या गोंधळानंतर बोर्डाच्या 36व्या अध्यक्षपदासाठी बिन्नी हेच सर्वोत्तम पर्याय ठरले आहेत. "केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा मुलगा जय शहा यांनीही बीसीसीआयचे सचिव म्हणून अर्ज दाखल केला आहे. जर कोणीही या पदासाठी अर्ज दाखल न केल्यास जय शाह दुसऱ्यांदा बीसीसीआयचे सचिव म्हणून कार्यरत राहतील. महत्वाचं म्हणजे, रॉजर बिन्नी यांनी बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी, जय शाहनं सचिवपदासाठी, आशिष शेलार यांनी  खजिनदारपदासाठी आणि देवजित सैकिया यांनी संयुक्त सचिवपदासाठी अर्ज दाखल केले आहेत", अशी माहिती उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी दिलीय. 


अरुण धुमाळ आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलचे प्रमुख
“अरुण धुमल आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलचे प्रमुख असतील आणि अभिषेक दालमिया देखील त्या परिषदेचा भाग असतील. खेरुल जमाल (मामून) मजुमदार हे सर्वोच्च परिषदेचा भाग असतील. आतापर्यंत याच लोकांनी अर्ज दाखल केले आहेत आणि सर्व बिनविरोध आहेत." बुधवारपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. तर, 14 ऑक्टोबपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. विविध पदांसाठीच्या उमेदवारांची अंतिम यादी 15 ऑक्टोबरला जाहीर केली जाईल. बिन्नी हे   कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष असून त्यांना राज्य संस्थेतून पायउतार व्हावं लागणार आहे.


हे देखील वाचा-