MS धोनीसाठी काहीपण! चेन्नई सुपर किंग्सची बीसीसीआयसमोर अनोखी मागणी; काव्या मारनसह अनेक मालक विरोधात
MS Dhoni Uncapped Player IPL 2025 Mega Auction: चेन्नई सुपर किंग्सने बीसीसीआयसमोर एक वेगळीच मागणी केल्याचं सांगण्यात येत आहे.
MS Dhoni Uncapped Player IPL 2025 Mega Auction: गेल्या अनेक दिवसांपासून आयपीएल 2025 बाबत (IPL 2025) चर्चा रंगल्या आहेत. 31 जुलै रोजी बीसीसीआयचे अधिकारी आणि आयपीएलमधील संघ मालक यांच्यात एक बैठक झाली. या बैठकीत मेगा लिलाव आणि संघात किती खेळाडू कायम ठेवता येईल, याबाबत चर्चा झाली. या मुद्द्यांवरुन कोलकाता नाइट रायडर्स (KKR) संघाचे सह मालक शाहरुख खान (Shahrukh Khan)आणि पंजाब किंग्सचे (Punjab Kings) मालक नेस वाडिया (Ness Wadia) यांच्यात वाद झाल्याची माहिती देखील समोर आली आहे. तसेच या बैठकीत चेन्नई सुपर किंग्सने (CSK) बीसीसीआयसमोर एक वेगळीच मागणी केल्याचं सांगण्यात येत आहे.
चेन्नई सुपर किंग्सच्या व्यवस्थापनाने बीसीसीआयला मेगा लिलावापूर्वी एमएस धोनीचा अनकॅप्ड खेळाडू म्हणून विचार करण्याची विनंती केली आहे. चेन्नईला जुना नियम पुन्हा लागू करायचा आहे असे एका मीडिया रिपोर्टमधून समोर आले आहे. या नियमानुसार, जर एखाद्या खेळाडूने निवृत्त होऊन पाच वर्षे किंवा त्याहून अधिक काळ लोटला असेल, तर तो अनकॅप्ड खेळाडू मानला जाईल. आयपीएलमध्ये हा नियम आधी लागू होता. मात्र 2022 च्या लिलावापूर्वी आयपीएलच्या समितीने या निर्णयावर बंदी घातली होती.
CSK WANTS MS DHONI TO BE RETAINED AS AN UNCAPPED PLAYER. 🤯
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 1, 2024
- CSK wants the reintroduction of a rule that existed from 2008-2021. If a player has retired from internationals for more than 5 years, he'll be classified as an uncapped player. (Espncricinfo). pic.twitter.com/gruMKLZPkj
15 ऑगस्ट 2020 रोजी धोनीची निवृत्ती-
एमएस धोनीने 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतासाठी एकही सामना खेळला नव्हता, तर 15 ऑगस्ट 2020 रोजी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केला होता. 31 जुलै रोजी मुंबईत झालेल्या बैठकीत चेन्नईने धोनीला अनकॅप्ड खेळाडू म्हणून घोषित करण्याचा मुद्दा उपस्थित केला होता, परंतु सनरायझर्स हैदराबादच्या सह मालक काव्या मारनसह अनेक संघांचे मालक या निर्णयाच्या विरोधात आहेत.
काव्या मारनसह अनेक मालकांचा विरोध-
जर एखाद्या निवृत्त खेळाडूला अनकॅप्ड असे टॅग लावून लिलावात आणले तर धोनीसारख्या दिग्गजांचा अपमान होईल. धोनीने लिलावात उतरावे, जेणेकरून त्याला लिलावात योग्य किंमत मिळू शकेल, असे काव्या मारनसह अनेक मालकांनी मत व्यक्त केले.
निवृत्त झालेल्या खेळाडूंची मूळ रक्कम कमी करावी-
बीसीसीआय आणि आयपीएल संघ मालकांच्या बैठकीतही एक मुद्दा उपस्थित करण्यात आला होता की, पाच वर्षे किंवा त्याहून अधिक काळ निवृत्त झालेल्या खेळाडूंची मूळ किंमत कमी करण्यात यावी. रिपोर्ट्सनुसार, ही सूचना आयपीएलचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर हेमांग अमीन यांनी दिली आहे. या खेळाडूंची आधारभूत किंमत कमी केल्यास लिलावात त्यांना खरेदी करण्याची शक्यता वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संबंधित बातमी:
हिंमतीने लढली, 46 सेकंदात हरली! महिला बॉक्सरविरुद्ध पुरुष रिंगणात?; पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खळबळ