Women's IPL: दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या महिला आयपीएल स्पर्धेला अंतिम स्वरूप देण्यास भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) सुरुवात केलीय. महिला आयपीएलचा पहिला हंगाम पुढी वर्षी मार्चमध्ये म्हणजेच 2023 मध्ये खेळला जाणार असल्याची शक्यता दर्शवली जात आहे. यासाठी बीसीसीआयनं आपलं वेळापत्रकही बदललंय.
महिलांच्या लीगसाठी मार्च महिन्याला पसंती मिळत आहे. दरम्यानन, ‘बीसीसीआय’च्या सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत यावर शिक्कामोर्तब होईल. दक्षिण आफ्रिकेत 9 ते 26 फेब्रुवारी 2023 दरम्यान महिला टी- 20 विश्वचषक स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा संपल्यावर लगेच महिलांची ‘आयपीएल’ खेळवली जाईल, अशी माहिती बीसीसीआयच्या सुत्राच्या हवाल्यानं पीटीआयनं दिली आहे.
महिला आयपीएलमध्ये किती संघ असणार?
महिला आयपीएलच्या पंधराव्या हंगामात पाच संघामध्ये स्पर्धा पार पडणार आहे. मात्र, अनेक जणांनी महिला लीगमध्येही गुंतवणूक करण्याची तयारी दाखवली आहे. त्यामुळे ती सहा संघांचीसुद्धा होऊ शकते. महिला आयपीएल ऑक्शनची तारीख लवकरच जाहीर केली जाईल, अशी माहिती समोर येत आहे.
सौरव गांगुलीनं काय म्हटलं होतं?
'बीसीसीआय’ अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहा यांनी यापूर्वीच महिला ‘आयपीएल’ सुरू करण्याबाबत तयारी दर्शविली होती. क्रीडा पत्रकार बोरिया मजूमदार यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये गांगुली यांनी महिला आयपीएलबाबत महत्वाची माहिती दिली होती.'महिला आयपीएल स्पर्धा लवकरच सुरू होईल. भारतीय क्रिकेट बोर्डानं याचा ड्राफ्ट तयार करण्यास सुरुवात केली. येत्या तीन ते चार महिन्यांत या स्पर्धेबाबतची आमची योजना काय आहे, हे स्पष्ट होईल,' असं गांगुली यांनी सांगितलं होतं.
हे देखील वाचा-
- MS Dhoni: 'मी भारतीय आहे, हे माझं भाग्य!' घरोघरी तिरंगा मोहिमेत धोनीचा सहभाग
- VVS Laxman: व्हीव्हीएस लक्ष्मणच्या खांद्यावर प्रशिक्षिकाची जबाबदारी, झिम्बाब्वे दौऱ्यात भारतीय खेळाडूंना करणार मार्गदर्शन
- UEFA Player 2021-22 Nomination: करीम बेन्झेमासह तीन फुटबॉलपटूंचं नामांकन; कोण मारणार बाजी? 25 ऑगस्टला निर्णय