Har Ghar Tiranga Campaign: भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्तानं संपूर्ण देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (Amrit Mahotsav) साजरा करण्यात येत आहे. भारत सरकारच्या आवाहनानुसार, देशभरात घरोघरी तिरंगा मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत प्रत्येकजण आपल्या सोशल मीडिया प्रोफाईल फोटोवर भारतीय तिरंग्याचा फोटो लावत आहेत. दरम्यान, भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीनंही(Mahendra Singh Dhoni) आपल्या सोशल मीडिया अकाऊंटच्या प्रोफाईल फोटोवर तिरंग्याचा फोटो लावून या मोहिमेत सहभाग दर्शवलाय. 


महेंद्रसिंह धोनीनं शुक्रवारी त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटचा फोटो बदलून तिरंग्याचा फोटो लावला. धोनीच्या प्रोफाईल फोटोमधून संपूर्ण भारतीयांसाठी एक महत्वाचा संदेश आहे. ज्यात असं लिहिलंय की, 'मी भारतीय आहे, हे माझं भाग्य आहे.'


धोनीची इन्स्टाग्राम प्रोफाईल-




भारतीय क्रिकेटपटूंचा मोहिमेत सहभाग
महेंद्रसिंह धोनी हा सोशल मीडियावर खूप कमी सक्रीय असतो. महेंद्रसिंग धोनी बराच काळ फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर काहीही पोस्ट करत नाही. पंरतु देशभरात राबवली जात असलेल्या घरोघरी तिरंगा मोहिमेत धोनीनं सहभाग दर्शवला. घरोघरी तिरंगा मोहिमेत महेंद्रसिंह धोनीशिवाय इतर अनेक क्रिकेटपटूही सहभागी आहेत. भारताचा माजी क्रिकेटर इरफान पठाणनंही त्याच्या घरावर तिरंगा फडकावला. तसेच त्याच्या चाहत्यांनाही घरोघरी तिरंगा मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहनही त्यानं केलं. 


धोनीची आंतराष्ट्रीय कारकिर्द
महेंद्रसिंह धोनीनं 15 ऑगस्ट 2022 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीय. धोनीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्द खूप चांगली राहिली आहे. त्यानं 90 कसोटी, 350 एकदिवसीय आणि 98 टी-20 सामन्यात भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलंय. त्यानं कसोटीत 38.09 च्या सरासरीनं 4 हजार 876 धावा केल्या आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये 50.58 सरासरीनं 10 हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. तर, टी-20 क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 1 हजार 617 धावांची नोंद आहे. धोनीनं आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवत्ती घेतली असली तरी, तो आयपीएलमध्ये चेन्नईच्या संघाचं नेतृत्व करतोय. धोनीच्या नेतृत्वात चेन्नईच्या संघानं आयपीएलचे चार खिताब जिंकले आहेत.


हे देखील वाचा-