UEFA Player 2021-22 Nomination: युनियन ऑफ युरोपियन फुटबॉल असोसिएशननं (UEFA) प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार (UEFA प्लेयर) साठी नामांकन यादी जाहीर केली. यामध्ये रिअल माद्रिदचा स्टार स्ट्रायकर करीम बेन्झेमा (Karim BENZEMA) आणि गोलकीपर थिबॉट कोर्टोइस (Thibaut COURTOIS) तसेच मँचेस्टर सिटीचा मिडफिल्डर केविन डी ब्रुयन (Kevin DE BRUYNE) यांचा समावेश आहे. युरोपियन फुटबॉल नियामक मंडळ यूईएफएनं शुक्रवारी 15 खेळाडूंच्या शॉर्टलिस्टमधून या तीन खेळाडूंची निवड केलीय. यापैकी कोणता खेळाडू यूईएफए प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार जिंकेल? याचा निर्णय येत्या 25 ऑगस्ट 2022 रोजी होईल.
चॅम्पियन्स लीग 2022-23 साठी गट टप्प्यातील ड्रॉ 25 ऑगस्ट रोजी तुर्कीची राजधानी इस्तंबूल येथे होणार आहेत.याचदरम्यान युरोपियन फुटबॉलमधील 2021-22 या वर्षात सर्वोत्कृष्ट पुरुष आणि महिला खेळाडूंना पुरस्कार दिला जाणार आहे.याचवेळी सर्वोत्तम प्रशिक्षकाचा पुरस्कारही जाहीर केला जाणार आहे.
मोहम्मद सालाह आणि एमबापेला मागं टाकलं
बेन्झेमा आणि कोर्टोइसनं गेल्या हंगामात रिअल माद्रिदला चौदाव्यांदा युरोपियन खिताब जिंकवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. तर, डी ब्रुयननं सिटीला प्रीमिअर लीगचा खिताब जिंकवून दिला. या प्रमुख युरोपियन फुटबॉल पुरस्कारासाठी निवडण्यात आलेल्या 15 खेळाडूंमध्ये लिव्हरपूलचा मोहम्मद सलाह आणि पीएसजीचा केलियन एमबाप्पे यांचाही समावेश होता. परंतु अखेर जूरीनं बेन्झेमा, कर्टिअस आणि डी ब्रायन यांची टॉप-3 नामांकनांसाठी निवड केली.
पुरस्काराच्या शर्यतीतून मेसी, रोनाल्डो बाहेर
युनियन ऑफ युरोपियन फुटबॉल असोसिएशन (UEFA) प्लेयर ऑफ द इयर पुरस्काराच्या यादीत लियोनल मेसी आणि क्रिस्टियानो रोनाल्डो यांच्या नावाचा समावेश करण्यात आला नाही. दोन्ही खेळाडूंना गेल्या हंगामात काही खास कामगिरी करता आली नाही. महत्वाचं म्हणजे, गेल्यावर्षी प्लेयर ऑफ ईअर पुरस्कार जिंकलेला जोरगिन्हो यालाही यादीत स्थान मिळवता आलं नाही.
कोच ऑफ द ईयर पुरस्काराच्या शर्यतीत तीन जण
लिव्हरपूलचा जर्गेन क्लॉप, रिअल माद्रिदचा कार्लो अॅक्लोटी आणि मँचेस्टर सिटीचा जोसेप गार्डिओला यांना 'युईएफए कोच ऑफ द इयर' पुरस्कारासाठी नामांकन मिळालं आहे. यावेळी कार्लो एकोनलोटीने आपल्या संघाला जहाँ ला लीगा आणि चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद मिळवून दिलं. त्याचवेळी गार्डिओलाने सिटीला प्रीमियर लीग चॅम्पियन बनवलं. लिव्हरपूलचे प्रशिक्षक जर्गेन क्लॉप यांनी आपल्या संघाला चॅम्पियन्स लीगच्या अंतिम फेरीत नेलं. प्रीमियर लीगमध्येही त्यांचा संघ जेतेपदाला अगदी जवळून मुकला होता.
हे देखील वाचा-
- South Africa T20 League : दक्षिण आफ्रिका लीगसाठी मुंबईपाठोपाठ लखनौ संघाने क्विंंटन डी कॉकसह दिग्गजांना केलं करारबद्ध, पाहा यादी
- Video : वेस्ट इंडीजच्या हेडन वॉल्शनं घेतला अफलातून झेल, व्हिडीओ होतोय सोशल मीडियावर व्हायरल
- पुन्हा मैदानात दिसणार दादाची दहशत, वर्ल्ड लीजेंड्सविरुद्ध संभाळणार इंडिया महाराजा संघाची धुरा