ZIM vs IND: तीन सामन्यांची एकदिवसीय खेळण्यासाठी भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर (India tour of Zimbabwe) रवाना झालीय. या दौऱ्यात भारताचे नियमित मुख्यप्रशिक्षक राहुल द्रविडला (Rahul Dravid) विश्रांती देण्यात आलीय. यामुळं या दौऱ्यात भारताचा माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मणच्या (VVS Laxman) खांद्यावर भारतीय संघाच्या प्रशिक्षकाची जबाबदारी सोपवण्यात आलीय. बीसीसीआयचे (BCCI) सचिव जय शाहनं (Jay Shah) याबाबत माहिती दिलीय. यापूर्वी आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतही व्हीव्हीएस लक्ष्मणनं भारतीय संघाचं प्रशिक्षकपदाची जबाबदारी योग्य पद्धतीनं हाताळली होती. आयर्लंडविरुद्ध दोन सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारतानं 2-0 असा विजय मिळवत मालिका खिशात घातली.
झिबाब्वेविरुद्ध तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना 18 ऑगस्ट रोजी खेळला जाणार आहे. त्यानंतर दुसरा सामना 20 ऑगस्ट आणि तिसरा सामना 22 ऑगस्टला खेळवला जाणार आहे. या मालिकेतील सर्व सामने हरारे येथे पार पडतील. भारत आणि झिम्बाब्वे मालिकेतील सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 12.45 वाजता सुरू होतील.
भारत- झिम्बाव्वे एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक-
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला एकदिवसीय सामना | 18 ऑगस्ट 2022 | हरारे स्पोर्ट्स क्लब |
दुसरा एकदिवसीय सामना | 20 ऑगस्ट 2022 | हरारे स्पोर्ट्स क्लब |
तिसरा एकदिवसीय सामना | 22 ऑगस्ट 2022 | हरारे स्पोर्ट्स क्लब |
केएल राहुल संभाळणार भारतीय संघाची धुरा़
झिम्बाब्वे दौऱ्यात रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत, रवींद्र जाडेजा आणि हार्दिक पांड्या यांसारख्या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आलीय. यामुळं या दौऱ्यात केएल राहुल भारतीय संघाचं नेतृत्व करताना दिसत आहे. तर, शिखर धवनकडं उपकर्णधार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. दरम्यान, महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघानं 2016 मध्ये झिम्बाब्वेचा दौरा केलाय.
हे देखील वाचा-
- UEFA Player 2021-22 Nomination: करीम बेन्झेमासह तीन फुटबॉलपटूंचं नामांकन; कोण मारणार बाजी? 25 ऑगस्टला निर्णय
- South Africa T20 League : दक्षिण आफ्रिका लीगसाठी मुंबईपाठोपाठ लखनौ संघाने क्विंंटन डी कॉकसह दिग्गजांना केलं करारबद्ध, पाहा यादी
- Video : वेस्ट इंडीजच्या हेडन वॉल्शनं घेतला अफलातून झेल, व्हिडीओ होतोय सोशल मीडियावर व्हायरल