Ranji Trophy 2022: भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं रणजी ट्राफीच्या वेळापत्रकात मोठा बदल केलाय. रणजी ट्रॉफीचे नॉकआऊट सामने दोन दिवस उशिरानं खेळले जाणार आहेत. रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीचे सामने 6 जून आणि उपांत्य फेरीचे सामने 14 जूनपासून खेळले जाणार आहेत. तसेच अंतिम सामना 22 जून रोजी होणार आहे.
बंगळुरू येथे रणजी ट्रॉफीतील नॉकआऊट सामने होणार आहेत. पहिला उपांत्यपूर्व सामना 4 जून रोजी सुरू होणार होता आणि अंतिम सामना 20 जून रोजी खेळला जाणार होता. रणजी ट्रॉफीतील साखळी सामने आयपीएलचा पंधरावा हंगाम सुरु होण्यापूर्वी खेळण्यात आले होते. तसेच नॉकआऊटचे सामने आयपीएलनंतर खेळले जातील, अशी घोषणा बीसीसीआयनं केली होती.
चार उपांत्यपूर्व फेरीचे सामने 6 ते 10 जून दरम्यान खेळवले जातील. पहिल्या उपांत्यपूर्व फेरीत बंगालचा सामना झारखंडशी होणार आहे. दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीत 41 वेळा रणजी ट्रॉफीवर नाव कोरणाऱ्या मुंबईचा सामना उत्तराखंडशी होईल. तर, तिसरा उपांत्यपूर्व सामना कर्नाटक आणि उत्तर प्रदेश यांच्यात रंगणार आहे. पंजाब आणि मध्य प्रदेशचे संघ चौथ्या उपांत्यपूर्व फेरीत आमनेसामने येतील. उपांत्य फेरीचे सामने 14 ते 18 जून दरम्यान खेळवले जातील, तर अंतिम सामना 22 जून रोजी खेळला जाणार आहे.
नॉक आऊट सामन्यांचे वेळापत्रक-
क्वार्टरफाइनल: 6 से 10 जून
पहला क्वार्टरफाइनल: बंगाल विरुद्ध झारखंड
दुसरा क्वार्टरफाइनल: मुंबई विरुद्ध उत्तराखंड
तिसरा क्वार्टरफाइनल: कर्नाटक विरुद्ध उत्तर प्रदेश
चौथा क्वार्टरफाइनल: पंजाब विरुद्ध मध्य प्रदेश
सेमिफायनल: 14 से 18 जून
फायनल: 22 से 26 जून
हे देखील वाचा-