Shubman Gill Tweet Goes Viral : सध्या क्रिकेटपटू शुभमन गिलचं (Shubman Gill) ट्विट चर्चेचा विषय बनलं आहे. शुभमन गिलनं शुक्रवारी रात्री केलेलं ट्विट सध्या जोरदार व्हायरल होतं आहे. त्याचं कारण म्हणजे शुभमन यांनी ट्विरचे नवे मालक आणि टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क (Elon Musk) यांच्याकडे एक मागणी केली आहे. शुभमन यानं ट्विट करत एलॉन मस्क यांना स्विगी विकत घेण्याची मागणी केली आहे. त्याच्या या ट्विटनं सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. 


अलिकडेच एलॉन मस्क यांनी ट्विटर कंपनी विकत घेतल्यानंतर ते अधिक चर्चेत आले आहेत. त्यानंतर आता शुभमन यानं मस्क यांना स्विगी विकत घेण्याची मागणी केली आहे. शुभमननं ट्विट करत म्हटलं आहे की, एलॉन मस्क कृपया स्विगी विकत घ्या म्हणजे डिलीवरी वेळेवर होईल. स्वीगीच्या सेवेबाबत तक्रार करण्यासाठी शुभमनं हे ट्विट केलं. स्वीगीवरुन ऑर्डर केलेले जेवण वेळेत न मिळाल्याने शुभमननं हे ट्विट केलं होतं.






शुभमनच्या या ट्विटनंतर स्वीगीने शुभमनच्या तक्रारीची नोंद घेतली. त्यानंतर स्वीगीच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून या ट्विटला प्रत्युत्तर देण्यात आलं. स्वीगीने शुभमनला मेसेज करत त्याच्या ऑर्डरबाबतची अधिक माहिती घेतली. शुभमननं स्वीगीला ऑर्डरची माहिती पाठवल्यानंनतर स्वीगीने त्याचे आभार मानले.






दरम्यान, शुभमन गिलचं हे ट्विट जोरदार व्हायरल झालं आहे. शुभमन गिलच्या ट्विटला 31 हजारांहून अधिक लाईक्स आणि 1,600 हून अधिक रिट्विट्स मिळाले आहेत. ट्विटरवर नेटकऱ्यांकडून अनेक कमेट्स करण्यात आल्या आहेत.


एका बनावट स्विगी अकाउंटने शुभमन गिलच्या ट्विट करत शुभमनवरच टीका केली आहे. या ट्विटमध्ये म्हटलंय की, 'आमची सेवा तुझ्या टी-20 क्रिकेटमधील फलंदाजीपेक्षा जलद आहे.'






शुभमनच्या ट्विटवर इतरही प्रतिक्रिया उमटल्या आहेत.






 






 


महत्त्वाच्या बातम्या :