IPL 2022 marathi News : यंदाच्या आयपीएलमधील सर्वात घातक संघ असलेल्या गुजरातचं (Gujarat Titans)  आरसीबीसमोर (Royal Challengers Bangalore)  आव्हान असणार आहे. गुजरातचा संघाने आठ सामन्यात सात विजय मिळवत गुणतालिकेत अव्वल स्थान काबिज केले आहे. हार्दिकच्या नेतृत्वातील गुजरात संघाचा विजयरथ रोखण्याचं आव्हान आरसीबीसमोर असणार आहे. शनिवारी गुजरात आणि आरसीबी यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. 


विराट कोहली आणि ग्लेन मॅक्सवेल यांचा फॉर्म आरसीबीसाठी चिंतेचा विषय ठरला आहे. कोहलीला आतापर्यंत फक्त 128 धावाच काढता आल्या आहेत. तर मॅक्सवेल यालाही आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आलेली नाही. सलामीला आल्यानंतरही विराट कोहलीला फॉर्म गवसला नाही. विराट कोहली आणि मॅक्सवेल यांच्या अपयशाचा फटका संघाला बसत आहे. गुजरातविरोधात हे दोन्ही खेळाडू फॉर्ममध्ये परतण्याची आशा आरसीबीच्या चाहत्यांना असेल. 


आरसीबीच्या संगाला नऊ सामन्यात पाच विजय मिळवता आला आहेत. आरसीबी दहा गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे. गुजरातचा विजयरथ रोखण्यासाठी विराट कोहली आणि ग्लेन मॅक्सवेल यांना फॉर्ममध्ये परतावे लागणार आहे. आरसीबीची गोलंदाजी भक्कम दिसत आहे. मात्र फलंदाजीत सुधारणा गरजेची आहे.  आठ सामन्यात सात विजय मिळवणाऱ्या गुजरात संघाचे पारडे जड आहे. गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये तगडा दिसत आहे. सलामीची जोडी गुजरातसाठी चिंतेची आहे. तेवातियासारखा फिनिशर संघात आहे.  हार्दिक पांड्याने सात सामन्यात 305 धावांचा पाऊस पाडला आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात गुजरातचा संघ गुणतालिकेत आघाडीवर आहे.  


कधी आहे सामना?
आज 30 एप्रिल रोजी होणारा गुजरात टायटन्स आणि आरसीबी यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार दुपारी तीन वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. तीन वाजता नाणेफेक होईल.


कुठे आहे सामना?
गुजरात टायटन्स आणि आरसीबी यांच्यातील सामना मुंबईतील ब्रेबॉन स्टेडिअममध्ये होणार आहे. 


कुठे पाहता येणार सामना?
गुजरात टायटन्स आणि आरसीबी यांच्यातील आजचा सामना स्टार स्पोर्ट नेटवर्कवर पाहता येणार आहे. वेगवेगळ्या भाषेतून सामना पाहता येणार आहे. तसेच हॉटस्टार अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला आयपीएलचे लाईव्ह कव्हरेज पाहाता येईल.