England New Test Captain : अष्टपैलू बेन स्टोक्सकडे इंग्लंड संघाच्या कसोटी कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने बेन स्टोक्सच्या नावाची घोषणा केली आहे. इंग्लंड कसोटी संघाचे कर्णधारपद स्वीकारणारा बेन स्टोक्स 81 खेळाडू ठरलाय. जो रुटच्या जागी इंग्लंडने ही जबाबदारी बेन स्टोक्सकडे सोपवली आहे. 


अष्टपैलू बेन स्टोक्सची क्रिकेट कारकिर्द आतापर्यंत जबरदस्त राहिली आहे. अनेकदा बेन स्टोक्स याने एकहाती सामना फिरवला आहे. इंग्लंड क्रिकेटच्या भविषाचा विचार करत बेन स्टोक्सकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. यापुढे आता बेन स्टोक्सकडे इंग्लंडच्या कसोटी संघाची जबाबदारी असणार आहे.  






इंग्लड कसोटी संघाच्या कर्णधारपद सांभाळण्याची संधी मिळाल्यामुळे सन्मानिक केल्यासारखे वाटत आहे. हा एक विशेषाधिकार आहे. यामुळे मी खूप उत्साहित आहे. जो रुटने इंग्लंडसाठी आतापर्यंत जे दिलेय, त्यासाठी त्याचे खूप आभार... जो रुटच्या नेतृत्वात मला क्रिकेटमधील बारकावे शिकायला मिळाले आहेत, असे बेन स्टोक्स म्हणाला.  


बेन स्टोक्सने आपल्या अष्टपैलू खेळाने सर्वांचेच लक्ष वेधलं आहे. स्टोक्सने अनेक सामन्यात इंग्लंडला विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली. बेन स्टोक्सने 79 कसोटी सामन्यात इंग्लंड संघाचं प्रतिनिधित्व केलेय. यामध्ये त्याने 5061 धावा चोपल्या आहेत. 11 शतके आणि 26 अर्धशतकांचा समावेश आहे. यामध्ये एका द्विशतकाचाही समावेश आहे. शिवाय गोलंदाजीतही स्टोक्सने 174 विकेट घेतल्या आहेत. स्टोक्सने चार वेळा पाच विकेट घेण्याचा करिश्मा केलाय.  


हे देखील वाचा-