RR vs MI, IPL 2022 : प्लेऑफच्या स्पर्धेतून बाहेर पडलेल्या मुंबईचा सामना तुफान फॉर्ममध्ये असणाऱ्या राजस्थान रॉयल्ससोबत होणार आहे. मुंबईला या स्पर्धेत आतापर्यंत आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. शनिवारी सायंकाळी डी वाय पाटील स्टेडिअममध्ये पार पडणाऱ्या सामन्यात मुंबईचा संघ पहिल्या विजयासाठी मैदानात उतरणार आहे. 


गुणतालिकेत मुंबईचा संघ आठ पराभवासह दहाव्या क्रमांकावर आहे. तर राजस्थानचा संघ सहा विजयासह तिसऱ्या क्रमांकावर आहे. तुफान फॉर्ममध्ये असणाऱ्या बटलरला रोखणं मुंबईसाठी कठीण जाऊ शकते. त्याशिवाय यजुवेंद्र चाहलही भेदक मारा करत आहे. पर्पल आणि ऑऱेंज कॅपवर या दोघांचा कब्जा आहे. 


मुंबई इंडियन्सचे अद्याप सहा सामने बाकी आहेत. या सहा सामन्यात विजय मिळवत शेवट गोड करण्याचा मुंबईचा प्रयत्न असेल. पण प्रतिस्पर्धी संघाला याचा फटका बसू शकतो. कारण मुंबईमुळे त्यांचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येऊ शकते. मुंबईकडे आता गमावण्यासाठी काहीच नाही, त्यामुळे मुंबईच्या संघावर दबाव नसणार आहे. त्यामुळे मुंबईचा संघ इतर संघाची वाट लावू शकतात. त्यामुळे शनिवारी होणाऱ्या सामन्यात राजस्थानच्या संघाला पूर्ण ताकदीने मैदानात उतरावे लागणार आहे. 


कधी आहे सामना?
आज 30 एप्रिल रोजी होणारा राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. 7 वाजता नाणेफेक होईल.


कधी, कुठे पाहता येणार सामना?
राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडिअममध्ये होणार आहे.   वेगवेगळ्या भाषेतून सामना पाहता येणार आहे. तसेच हॉटस्टार अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला आयपीएलचे लाईव्ह कव्हरेज पाहाता येईल. 


 


मुंबईचे उर्वरित सामने कुणासोबत अन् कधी?
30 एप्रिल - राजस्थान रॉयल्स
6 मे - गुजरात टायटन्स
9 मे - कोलकाता नाईट रायडर्स
12 मे - चेन्नई सुपरकिंग्स
17 मे - सनरायजर्स हैदराबाद
21 मे - दिल्ली कॅपिटल्स