Sourav Ganguly Discharged From Hospital: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुलींना (Sourav Ganguly) रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालाय. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना कोलकातामधील (Kolkata) मल्टीस्पेशालिटी रुग्णालय वुडलँड्स (Woodlands) येथे दाखल करण्यात आलं होतं. मात्र, आता त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय, अशी माहिती एएनआय वृत्त संस्थेनं ट्विटरच्या माध्यमातून दिलीय. 


सौरव गांगुली यांना 3 दिवसांपूर्वी कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली होती. तसेच त्यांना कोरोनावरील उपचारासाठी कोलकात्यातील वुडलँड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन दिवसांच्या उपचारानंतर सौरव गांगुली यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय. या वर्षात गांगुलींना रुग्णालयात दाखल करण्याची ही दुसरी वेळ होती. याआधी वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारी 2021 मध्ये त्यांना हृदयविकाराच्या समस्येमुळें बराच काळ रुग्णालयात राहावं लागलं होतं. 


एएनआयचं ट्वीट- 



यापूर्वी सौरव गांगुली यांना  छातीत दुखत असल्यामुळं 2 जानेवारी रोजी कोलकाता येथील बुडलँड्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे त्यांच्यावर अँजियोप्लास्टी करण्यात आली होती. सौरव गांगुली आपल्या घरातील जिममध्ये ट्रेडमिलवर वर्कआउट करत होते. त्यावेळी त्यांच्या छातीत अचानक दुखू लागलं होतं.  त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सौरव गांगुलीनंतर त्यांच्या मोठ्या भावावरही अँजियोप्लास्टी करण्यात आली. दोघांवर कोलकाता येथील वुडलँड्स रुग्णालयातच अँजियोप्लास्टी करण्यात आली.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha