IND vs SA: भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका यांच्यातील तीन सामन्याच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतानं 113 धावांनी विजय मिळवलाय. या विजयासह भारतानं मालिकेत 1-0 नं आघाडी घेतलीय. या विजयासह भारतानं नव्या विक्रमाची नोंद केलीय. कसोटी क्रिकेटमध्ये भारतानं सलग पाचव्यांदा दक्षिण आफ्रिका धुळ चाखली आहे. आता दक्षिण आफ्रिकेला त्यांच्या मायदेशात पराभूत करून भारतीय संघ इतिहास रचण्यासाठी सज्ज झालाय.

पहिल्या कसोटी सामन्यात भारतानं दिलेल्या 302 धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ 191 धावांवर ढासळला. या विजयात जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शामीनं मोलाचा वाटा उचलला. या सामन्यात बुमराह आणि शामीनं प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतल्या. दरम्यान, मोहम्मद सिराज आणि आर अश्विनलाही दोन-दोन विकेट्स मिळवण्यात यश आलंय. 

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताची कामगिरी

24-27 जानेवारी (2018) जोहान्सबर्ग 63 धावांनी विजय 
2-6 ऑक्टोबर (2019) विशाखापट्टानम 203 धावांनी विजय
10-13 ऑक्टोबर (2019) पुणे 137 धावांनी विजय
19- 22 ऑक्टोबर (2019) रांची 202 धावांनी विजय
26-30 डिसेंबर (2021) सेन्चुरिअन 113 धावांनी विजय

 

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दुसरा कसोटी सामना जोहान्सबर्ग येथे खेळला जाणार आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला नमवून भारतीय संघ मालिका खिशात घालण्यासाठी सज्ज झालाय. 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha