Ashes 2021: ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या ऐतिहासिक अ‍ॅशेस मालिकेत कोरोनाचा स्फोट झालाय. या मालिकेतील सामनाधिकारी आणि इंग्लंडचे प्रशिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. याचपार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज ट्रेव्हिस हेडची (Travis Head) कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर एकच खळबळ माजलीय. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिलीय. तसेच यामुळं ट्रेव्हिड हेड इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या ऍशेस कसोटीतून बाहेर पडलाय. ट्रेव्हिड हेडनं या मालिकेत चांगली कामगिरी करून दाखवलीय. यातच त्याचं संघाबाहेर पडणं ऑस्ट्रेलियाच्या संघासाठी मोठा धक्का मानला जातोय. 


ऑस्ट्रेलिया क्रिकेटनं दिलेल्या माहितीनुसार, "ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ट्रॅव्हिस हेड नियमित पीसीआर चाचणी दरम्यान कोविड-19 पॉझिटिव्ह आढळला आहे. हेड हा कोरोनाचा लक्षणे नसलेला रुग्ण आहे. व्हिक्टोरियन सरकारच्या नियमांनुसार, तो पुढील 7 दिवस मेलबर्नमध्ये आयसोलेट असेल. सिडनी क्रिकेट मैदानावर 5 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या ऍशेस मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यातून त्याला वगळण्यात आलंय. दरम्यान, ट्रॅव्हिस हेड पॉझिटिव्ह आढळल्यानंतर, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट संघ, सहाय्यक कर्मचारी आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांची पीसीआर आणि आरएटी चाचणी करण्यात आलीय.


ट्वीट- 




यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार पॅट कमिन्सलाही कोरोनाचा संसर्ग झाला होता. ज्यामुळं त्याला एडिलेट कसोटीमधून बाहेर पडावं लागलं होतं. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलिया क्रिकेटनं संघात मिचेल मार्श, निक मेडिसन आणि जॉस इगलिस या तीन नव्या खेळाडूंचा संघात समावेश केलाय. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha