Paytm Home Series: भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं म्हणजेच बीसीसीआयनं (BCCI) आगामी पेटीएम सीरिज ऑस्ट्रेलिया (Australia) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्या भारत दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर केलंय. दरम्यान, सप्टेंबर महिन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. त्यानंतर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची टी-20 आणि एकदिवसीय मालिका पार पडणार आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला टी-20 सामना मोहाली येथे खेळला जाणार आहे. तर, दुसरा आणि तिसरा टी-20 सामना नागपूर आणि हैदराबाद येथे होणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या मालिकेला तिरुवनंतपुरममध्ये सुरुवात होईल. त्यानंतर दक्षिण आफ्रिकाविरुद्ध दुसरा टी-20 सामना गुवाहाटी येथे खेळवला जाईल. त्यानंतर शेवटचा टी-20 सामना इंदूर येथे होईल. टी-20 मालिकेनंतर 6 ऑक्टोबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेला सुरुवात होईल. पहिला एकदिवसीय सामना रांची आणि दुसरा आणि तिसरा एकदिवसीय सामना दिल्लीत खेळवला जाईल.
भारत- ऑस्ट्रलिया यांच्यातील टी-20 मालिकेचं वेळापत्रक:
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला टी-20 सामना | 20 सप्टेंबर 2022 | मोहाली |
दुसरा टी-20 सामना | 23 सप्टेंबर 2022 | नागपूर |
तिसरा टी-20 सामना | 25 सप्टेंबर 2022 | हैदराबाद |
भारत- दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिकेचं वेळापत्रक:
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला टी-20 सामना | 28 सप्टेंबर 2022 | तिरुवनंतपुरम |
दुसरा टी-20 सामना | 2 ऑक्टोबर 2022 | गुवाहाटी |
तिसरा टी-20 सामना | 4 ऑक्टोबर 2022 | इंदूर |
भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक:
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला एकदिवसीय सामना | 6 ऑक्टोबर 2022 | लखनौ |
दुसरा एकदिवसीय सामना | 9 ऑक्टोबर 2022 | रांची |
तिसरा एकदिवसीय सामना | 11 ऑक्टोबर 2022 | दिल्ली |
हे देखील वाचा-