Commonwealth Games 2022: बर्मिंगहॅम येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत (Commonwealth Games 2022) भारतीय महिला क्रिकेट संघ आज बार्बाडोस महिला क्रिकेट संघाची (India Women vs Barbados Women) भिडणार आहे. ग्रुप 'ब' मध्ये दोन्ही संघानं एक-एक सामना गमावला आहे. आजच्या सामन्यात विजय मिळवून उपांत्य फेरीचं तिकीट निश्चित करण्यासाठी दोन्ही संघ मैदानात उतरणार आहे. यामुळं आजचा सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे. 


राष्ट्रकुल क्रिकेट स्पर्धेतील 'ब' गटात भारत, बार्बाडोस, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानचा समावेश आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरलाय. तर,  भारताकडून मिळालेल्या पराभवानंतर पाकिस्तानचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलंय. यामुळं भारत आणि बार्बाडोस यांच्यातील सामन्यात विजय मिळवणाऱ्या संघाला उपांत्य फेरीत प्रवेश करता येणार आहे. 


राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेतील भारतीय क्रिकेट संघाचा प्रवास
बर्मिंगहॅम येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतील पहिल्या क्रिकेट सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला. मात्र, या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाला चांगलीच झुंज दिली. भारताची सलामीवीर शेफाली वर्मा आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार खेळी केली. दरम्यान, भारताची गोलंदाज रेणुका सिंहनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध दमदार प्रदर्शन करून दाखवलं. तिनं अवघ्या 18 धावा खर्च करून ऑस्ट्रेलियाचे चार फलंदाजांना माघारी धाडलं होतं. यानंतर भारतीय संघानं आपल्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा एकतर्फी पराभव केला. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानचा संघ अवघ्या 99 धावांत गुंडाळला. प्रत्युत्तरात स्मृती मानधनाच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतानं विजय मिळवला.


पाकिस्तानला हरवल्यानंतर बार्बाडोसचा संघ भारताशी भिडणार 
ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव पत्कारावा लागल्यानंतर बार्बाडोस महिला क्रिकेट संघानंही पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवलाय. बार्बाडोसनं पाकिस्तानवर 15 धावांनी पराभूत केलं. ऑस्ट्रेलियाविरुद्ध बार्बाडोसचा संघ अवघ्या 64 धावांत ऑलआऊट झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघानं 9 विकेट्सनं विजय मिळवत गुणतालिकेतील अव्वल स्थान गाठलं. 


हे देखील वाचा-