Birmingham 2022 Commonwealth Games: कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतानं आणखी एक पदक जिंकलंय. वेटलिफ्टिंगच्या 109 किलोग्राम वजनी गटात लवप्रीत सिंहनं (Lovepreet Singh) कांस्यपदक जिंकून बर्मिंगहॅम येथे भारताचा तिरंगा फडकावला. ज्यामुळं संपूर्ण देशभरातून त्याचं कौतूक केलं जातंय. याच पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी लवप्रीत सिंहसाठी अतिशय खास ट्विट केलंय. 


नरेंद्र मोदी काय म्हणाले? 
"वेटलिफ्टिंगमध्ये पुरुषांच्या 109 किलोग्राम वजनी गटात कांस्यपदक जिंकणाऱ्या लवप्रीत सिंहचं अभिनंदन. युवा आणि गतिमान लवप्रीत सिंहनं त्यांच्या शांत स्वभावानं आणि खेळातील समर्पणानं सर्वांना प्रभावित केलंय. भविष्यातील पुढील वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा", अशा शब्दात नरेंद्र मोदी यांनी लवप्रीत सिंहचं कौतूक केलंय.


नरेंद्र मोदींचं ट्वीट-



लवप्रीत सिंह कोण आहे?
लवप्रीत सिंह हा 24 वर्षाचा असून तो पंजाबच्या अमृतसर येथील रहिवाशी आहे.  त्यानं कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमच्या 109 किलोग्राम वजनी गटात रौप्यपदक जिंकलं होतं. ज्यामुळं तो कॉमनवेल्थ स्पर्धेसाठी पात्र ठरला. लवप्रीत सिंहनं एशियन ज्यूनिअर चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकलं होतं. तसेच त्यानं कॉमनवेल्थ ज्युनिअर चॅम्पियनशिपचाही खिताब जिंकलाय. त्यानं आतापर्यंत एकूण 13 पदकं जिंकली आहेत. यातील सर्वाधिक 8 पदकं त्यानं वेटलिफ्टिंगमध्येच जिंकली आहेत. ज्यात तीन सुवर्णपदकांचा समावेश आहे. 


कॉमनवेल्थमध्ये भारतासाठी पदक जिंकणारे खेळाडूंची यादी
सुवर्णपदक- 5  (मीराबाई चानू, जेरेमी लालरिनुंगा, अंचिता शेउली, महिला लॉन बॉल संघ, टेबल टेनिस पुरुष संघ.)
रौप्यपदक- 5  (संकेत सरगरी, बिंदियाराणी देवी, सुशीला देवी, विकास ठाकूर, भारतीय बॅडमिंटन संघ.)
कांस्यपदक- 4 (गुरुराजा पुजारी, विजय कुमार यादव, हरजिंदर कौर, लवप्रीत सिंह.)


हे देखील वाचा-