एक्स्प्लोर

T20 World Cup 2026 : विश्वचषकाचं वेळापत्रक बदलणार?, बंद दाराआड खलबली, ICC चा गेमचेंजर प्लॅन, घोषणेकडे साऱ्या जगाचं लक्ष

BCB vs ICC T20 World Cup 2026 Row : टी-20 विश्वचषकाच्या तयारीला सध्या प्रचंड वेग आला आहे. आयसीसीकडून याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

BCB vs ICC T20 World Cup 2026 Row : टी-20 विश्वचषकाच्या तयारीला सध्या प्रचंड वेग आला आहे. मात्र या दरम्यान बांगलादेशने विनाकारण काही दिवस वाया घालवले आणि अखेर ही टीम आता विश्वचषकातून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे. आयसीसीकडून याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे. टी20 विश्वचषक ठरलेल्या वेळापत्रकानुसारच सुरू होणार का, की त्यामध्ये बदल होणार?

भारतात खेळण्यास बांगलादेशचा नकार, आयसीसीचा निर्णय लवकरच

आयसीसीने दोन दिवसांपूर्वी स्पष्ट शब्दांत सांगितले होते की, टी-20 विश्वचषक खेळायचा असेल, तर बांगलादेशला भारतात येऊनच सामने खेळावे लागतील. यासाठी आयसीसीने बांगलादेश क्रिकेट बोर्डाला (BCB) एक दिवसाची मुदत दिली होती, जी आता संपली आहे. मात्र बांगलादेशने भारतात येऊन सामने खेळण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्यांची इच्छा श्रीलंकेत सामने खेळण्याची होती, पण त्यावर कोणताही तोडगा निघू शकलेला नाही. त्यामुळे आता आयसीसीकडून मोठी घोषणा होणार असून, बांगलादेशच्या जागी कोणती टीम टी-20 विश्वचषक खेळणार, हे अधिकृतपणे जाहीर केले जाईल.

बांगलादेशच्या जागी स्कॉटलंडला संधी

सध्याच्या रिपोर्टनुसार, बांगलादेशच्या जागी स्कॉटलंडला टी-20 विश्वचषकात खेळण्याची संधी मिळणार आहे. स्कॉटलंडने याआधी क्वालिफायर खेळले होते, मात्र ते पात्र ठरू शकले नव्हते. पण आता बांगलादेश बाहेर पडल्याने स्कॉटलंडची लॉटरी लागली आहे. आयसीसीकडून अधिकृत घोषणा होणे फक्त बाकी आहे. स्कॉटलंडचा समावेश त्याच गटात होईल, ज्यामध्ये बांगलादेश होता. विश्वचषक सुरू होण्यासाठी केवळ 15 दिवस उरले असल्याने स्कॉटलंडला तातडीने तयारी करत आपला संघ जाहीर करावा लागणार आहे.

वेळापत्रकात बदल नाही, 7 फेब्रुवारीपासूनच स्पर्धेला सुरुवात

टी-20 विश्वचषकाच्या वेळापत्रकात कोणताही बदल केला जाणार नाही, हे जवळपास निश्चित आहे. बांगलादेशचे जे सामने होते, तेच सामने आता स्कॉटलंड खेळणार आहे. बांगलादेशचा पहिला सामना 7 फेब्रुवारीला, म्हणजेच उद्घाटनाच्या दिवशी वेस्ट इंडिजविरुद्ध कोलकात्यात होणार होता. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरू होणार आहे. त्यामुळे आयसीसीला अंतिम निर्णय लवकरात लवकर जाहीर करावा लागणार असून, स्कॉटलंडलाही झटपट तयारीला लागावे लागणार आहे.

टी-20 विश्वचषक 2026 च्या पहिल्याच दिवशी तीन सामने

टी-20 विश्वचषक 2026 च्या पहिल्या दिवशी एकूण तीन सामने खेळवले जाणार आहेत. पहिला सामना सकाळी 11 वाजता पाकिस्तान आणि नेदरलँड्स यांच्यात कोलंबो येथे होईल. दुसरा सामना दुपारी 3 वाजता कोलकात्यात वेस्ट इंडिजचा असेल. तर तिसरा आणि दिवसातील सर्वात मोठा सामना संध्याकाळी 7 वाजता मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाईल, जिथे भारत आणि यूएसए आमनेसामने असतील. म्हणजेच स्पर्धेच्या पहिल्याच दिवसापासून चाहत्यांना थरारक क्रिकेटचा अनुभव मिळणार आहे.

हे ही वाचा -

IND vs PAK : आधी पाकिस्तानी खेळाडूंना मिठी मारली, मग हात मिळवला...; इरफान पठाणचा व्हायरल व्हिडीओ चर्चेत, नेमकं काय घडलं?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma Ind Vs Eng ODI: मुंबईचा राजा रोहित शर्माने सिलेक्टर्सच्या नाकावर टिच्चून शतक ठोकलं, वय झालं म्हणणाऱ्यांना तोंडघशी पाडलं
मुंबईचा राजा रोहित शर्माने सिलेक्टर्सच्या नाकावर टिच्चून शतक ठोकलं, वय झालं म्हणणाऱ्यांना तोंडघशी पाडलं
Shubman Gill: लॉर्ड्सवर टीम इंडियाचा पराभव, मालिकाही गमावली; कर्णधार शुभमन गिलने कोणाला ठरवले जबाबदार? रोहित-विराटबाबत म्हणाला...
लॉर्ड्सवर टीम इंडियाचा पराभव, मालिकाही गमावली; कर्णधार शुभमन गिलने कोणाला ठरवले जबाबदार? रोहित-विराटबाबत म्हणाला...
रोहितसह विराट कोहलीची दमदार खेळी, पण लॉर्ड्सवर भारताचा पराभव, इंग्लंडने एकदिवसीय मालिका जिंकली 
रोहितसह विराट कोहलीची दमदार खेळी, पण लॉर्ड्सवर भारताचा पराभव, इंग्लंडने एकदिवसीय मालिका जिंकली 
लॉर्ड्सवर 388 धावांचा पाठलाग करणं शक्य? एकदिवसीय सामन्यात भारताने पाठलाग केलेली सर्वोच्च धावसंख्या किती?  
लॉर्ड्सवर 388 धावांचा पाठलाग करणं शक्य? एकदिवसीय सामन्यात भारताने पाठलाग केलेली सर्वोच्च धावसंख्या किती?  

व्हिडीओ

Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!
Sonam Wangchuk Protest : दिल्लीत वादंग, मुंबईत वादळ, ठाकरेंनी सुनावलं Special Report
Ravindra Dhangekar Not Reachable : रवींद्र धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, प्रकरण काय? | Special Report
Parliament Monsoon Session 2026 : सरकारची मोर्चेबांधणी, विधेयकांसाठी मनधरणी? निर्णयाआधीच आमंत्रण | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
Yogendra Yadav : संसदेकडे जाणारे सर्व रस्ते गर्दीने भरुन गेलेत, लाखोंचा जमाव पाहून योगेंद्र यादव भारावले, म्हणाले, 'हा ऐतिहासिक क्षण...'
50 वर्षांनंतर शिक्षण आणि बेरोजगारीच्या मुद्यावर युवक रस्त्यावर उतरले, योगेंद्र यादव व्हिडिओ शेअर करत म्हणाले...
Samruddhi Mahamarg Accident : मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
Geetanjali Wangchuk : आम्ही देशासाठी लढतोय, शिक्षण व्यवस्थेची जबाबदारी न सांभाळू शकणाऱ्यांचा राजीनामा घ्या, गीतांजली वांगचुक यांची मागणी
शिक्षण व्यवस्थेची जबाबदारी न सांभाळू शकणाऱ्यांचा राजीनामा घ्या, गीतांजली वांगचुक यांची मागणी
Dharmendra Pradhan resignation: दिल्लीत वेगवान हालचाली, धर्मेंद्र प्रधान अमित शाहांच्या भेटीला पोहोचले, केंद्रीय शिक्षण मंत्रिपदाचा राजीनामा देणार?
दिल्लीत वेगवान हालचाली, धर्मेंद्र प्रधान अमित शाहांच्या भेटीला पोहोचले, केंद्रीय शिक्षण मंत्रिपदाचा राजीनामा देणार?
Kalyan Crime News:
"फ्लॅटमध्ये बाथरूमचा नळ सुरूये, तिथे एक डेड बॉडी...'', व्हाईस मेल ऐकताच घरमालकाच्या पायाखालची जमीन सरकली, दार उघडताच सगळेच चक्रावले
जंतरमंतरवरील आंदोलनाला 'समाजवादी' बळ! खासदार डिंपल यादवांचा खासदारांची फौज घेत संसदेतून थेट जंतरमंतरकडे मार्च; म्हणाल्या, 'देशातील तरुण लाठ्या खात आहेत..'
जंतरमंतरवरील आंदोलनाला 'समाजवादी' बळ! खासदार डिंपल यादवांचा खासदारांची फौज घेत संसदेतून थेट जंतरमंतरकडे मार्च; म्हणाल्या, 'देशातील तरुण लाठ्या खात आहेत..'
Delhi Parliament March CJP: सीजेपी आंदोलकांचा तो गट संसदेपर्यंत धडकताच एकच धावाधाव, सुरक्षारक्षकांनी बंदुका रोखल्या, सगळे गेटकडे धावले
सीजेपी आंदोलकांचा तो गट संसदेपर्यंत धडकताच एकच धावाधाव, सुरक्षारक्षकांनी बंदुका रोखल्या, सगळे गेटकडे धावले
Embed widget