Cheteshwar Pujara : चेतेश्वर पुजारासाठी टीम इंडियाचे दरवाजे बंद? माजी क्रिकेटर म्हणाला,"गौतम गंभीर असूनही पण..."
Duleep Trophy 2024 : आता सध्या भारताची देशांतर्गत स्पर्धा दुलीप ट्रॉफीची सर्वत्र चर्चा होत आहे. अलीकडेच या स्पर्धेसाठी निवड समितीने संघांची घोषणा केली.
Basit Ali on Cheteshwar Pujara : आता सध्या भारताची देशांतर्गत स्पर्धा दुलीप ट्रॉफीची सर्वत्र चर्चा होत आहे. अलीकडेच या स्पर्धेसाठी निवड समितीने संघांची घोषणा केली. यावेळी अनेक दिग्गज खेळाडूंनाही या स्पर्धेत सहभागी होण्यास सांगण्यात आले होते.
मात्र, काही खेळाडूंकडे दुर्लक्ष करण्यात आले. असेच एक नाव म्हणजे चेतेश्वर पुजारा. गेल्या रणजी हंगामात चांगली कामगिरी करूनही दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या फेरीसाठी पुजाराची निवड न झाल्याबद्दल पाकिस्तानचा माजी खेळाडू बासित अलीने आश्चर्य व्यक्त केले आहे.
बीसीसीआय वरिष्ठ निवड समितीने 14 ऑगस्ट रोजी दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या फेरीसाठी चार संघांची घोषणा केली. जी 5 ते 8 सप्टेंबर दरम्यान खेळली जाणार आहे. चेतेश्वर पुजाराकडे दुर्लक्ष करण्याबरोबरच निवडकर्त्यांनी अजिंक्य रहाणे, संजू सॅमसन आणि रिंकू सिंग या खेळाडूंनाही स्थान दिलेले नाही.
पाकिस्तानकडून खेळलेल्या बासित अली त्याच्या यूट्यूब चॅनलवर म्हणाला की, "मी संघ पाहिला आणि मला आश्चर्य वाटले की त्यात तीन-चार दिग्गज नावे नाहीत. अजिंक्य रहाणे नाही. चेतेश्वर पुजारा नाही. संजू सॅमसन नाही. रिंकू सिंग नाही. पण शिवम दुबे यांची निवड करण्यात आली आहे. मला वाटते की त्याला अष्टपैलू म्हणून तयार केले जात आहे. बघूया दुलीप ट्रॉफीमध्ये कोण काय कामगिरी करतो.
पुढे तो म्हणाला की, पुजाराचा ऑस्ट्रेलियात उपयोग होऊ शकला असता. गौतम गंभीर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक असूनही त्याची निवड झाली नाही याचे मला आश्चर्य वाटते.
Despite performing well in the Ranji Trophy, Cheteshwar Pujara has not been included in the Duleep Trophy squad. It's clear that the BCCI is now looking beyond him, but given the amount of runs he got in last Ranji, his exclusion is surprising #DuleepTrophy pic.twitter.com/DrqyuZREXJ
— Varun Giri (@Varungiri0) August 14, 2024
चेतेश्वर पुजाराने गेल्या वर्षी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये भारतीय संघासाठी शेवटचा कसोटी सामना खेळला होता. यानंतर त्याला संघातून वगळण्यात आले. पुजाराने देशांतर्गत क्रिकेटमध्ये नक्कीच चांगली कामगिरी केली पण कदाचित निवडकर्त्यांनी आता त्याला सोडून पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. याच कारणामुळे त्याची दुलीप ट्रॉफीसाठी निवड झाली नाही.