India vs Bangladesh: भारत आणि बांगलादेश (Ind vs Ban) यांच्यात 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिली कसोटी 19 सप्टेंबरपासून चेन्नईत खेळवली जाणार आहे. यानंतर 27 सप्टेंबरपासून दुसऱ्या कसोटीसाठी दोन्ही संघ कानपूरमध्ये आमनेसामने येतील. याचदरम्यान नझमुल हसन शांतोच्या नेतृत्वाखालील बांगलादेश क्रिकेट संघाचे खेळाडू पहिल्या कसोटीसाठी चेन्नईला पोहोचले आहेत. बांगलादेशी खेळाडूंना चेन्नईत विशेष सुरक्षा पुरवली जात आहे. 


बांगलादेशी खेळाडू हॉटेलमध्ये पोहोचल्यावर त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. नझमुल हसन शांतोच्या (Najmul Hossain Shanto) नेतृत्वाखालील बांगलादेश क्रिकेट संघाचे खेळाडू हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर राहतील आणि प्रोटोकॉलनुसार सशस्त्र सुरक्षा कर्मचारी तेथे उपस्थित असतील. वास्तविक बांगलादेश गेल्या महिन्यापासून अशांततेच्या काळातून जात आहे. मात्र, असे असतानाही बांगलादेश क्रिकेट संघाने पाकिस्तानचा दौरा केला. बांगलादेशने पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेत 2-0 असा ऐतिहासिक विजय नोंदवला. त्याचबरोबर आता बांगलादेश क्रिकेट संघाचे खेळाडू टीम इंडियाला आव्हान देण्यासाठी सज्ज झाले आहेत.


बांगलादेशच्या कर्णधाराचा टीम इंडियाला इशारा-


भारताला रवाना होण्यापूर्वी बांगलादेशचा कर्णधार नझमुल हुसैन शांतोने आपल्या रणनीतीवर प्रतिक्रिया दिली. नझमुल हुसेन शांतो म्हणाला की, भारत आमच्यापेक्षा चांगला संघ आहे, टीम इंडियाची क्रमवारी आमच्यापेक्षा चांगली आहे, याबाबत आम्हाला कल्पना आहे. परंतु आमचा प्रयत्न शेवटच्या दिवसापर्यंत कसोटी खेचून आणण्याचा आणि भारतीय संघाला सहज जिंकू न देण्याचा असेल. सामन्याचा निकाल शेवटच्या सत्रात यावेत अशी आमची इच्छा आहे. आम्ही फार दूरचा विचार करत नाही, पण भारताविरुद्ध जिंकण्याच्या मानसिकतेने आम्ही मैदानात उतरु, असा इशारा हुसेन शांतेने दिला. 






 पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारताचा संपूर्ण संघ- 


रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल , कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि यश दयाल.


बांगलादेशचा संपूर्ण संघ:


नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), महमुदुल हसन जॉय, झाकीर हसन, शादमान इस्लाम, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शकीब अल हसन, लिटन कुमेर दास, मेहिदी हसन मिराझ, तैजुल इस्लाम, नईम हसन, नाहिद राणा, हसन महमूद, तस्किन अहमद, मोहम्मद. सय्यद खालेद अहमद, जाकेर अली आनिक


संबंधित बातमी:


बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया चेन्नईत पोहचली; रोहित शर्मासोबत कोण कोण?