Tejashwi Yadav On Virat Kohli : बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी असे वक्तव्य केले आहे ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यांनी एका मुलाखतीदरम्यान खुलासा केला आहे की, जगभरात भारताचा गौरव करणारा विराट कोहली एकेकाळी त्याच्या नेतृत्वाखाली म्हणजेच तेजस्वीच्या नेतृत्वाखाली खेळला आहे. तेजस्वी यादवच्या या वक्तव्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. चला तर मग सांगतो तो काय म्हणाला...


तेजस्वी यादव विराट कोहलीबद्दल काय म्हणाले?


तेजस्वी यादव म्हणाला की, “मी क्रिकेटर होतो आणि आजकाल त्याबद्दल कोणी बोलत नाही. विराट कोहली माझ्या नेतृत्वाखाली खेळला आहे. पण यावर कुणी कधी बोललं का? एक क्रिकेटर म्हणून मी भरपूर क्रिकेट खेळलो आहे. टीम इंडियाचे अनेक खेळाडू माझे बॅचमेट आहेत. माझे दोन्ही लिगामेंट फ्रॅक्चर झाल्याने मला खेळ सोडावा लागला."


तेजस्वी यादव खरोखरच विराट कोहलीचा कर्णधार होता का?


विराट कोहली आपल्या कर्णधारपदाखाली खेळला असे वक्तव्य तेजस्वी यादवने केल्यानंतर सगळ्याचा प्रश्न पडला. एवढेच नाही तर त्याचे सत्य जाणून घेण्यासाठी सर्वांनी गुगलवर सर्च करायला सुरुवात केली? विराट कोहलीसारख्या दिग्गज खेळाडूसाठी असे विधान करणे छोटी गोष्टी नाही.


पण, तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल कारण तेजस्वी यादव यांचे हे विधान अगदी खरे आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू यादव यांचा मुलगा तेजस्वी यादव दिल्लीकडून देशांतर्गत क्रिकेट खेळला आहे. तो अंडर-17 आणि अंडर-15 मध्ये दिल्लीकडून देशांतर्गत क्रिकेट खेळला आणि अंडर-15 मध्ये संघाचा कर्णधारही होता. त्यावेळी विराट कोहलीही त्या संघाचा एक भाग होता. 


अशा परिस्थितीत विराट कोहलीने तेजस्वी यादवच्या नेतृत्वाखाली क्रिकेट खेळले आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. मात्र, त्यानंतर तेजस्वीने दुखापतीमुळे क्रिकेट खेळणे बंद केले आणि विराट कोहली खेळत राहिला आणि आज तो जगभरात भारताचा गौरव करत आहे.


हे ही वाचा -


IPL 2025 Mega Auction : बीसीसीआयने ऐकलं नाही तर... चेन्नई सुपर किंग्ज MS धोनीबाबत घेणार मोठा निर्णय?


Ind vs Ban : मोठी अपडेट! BCCI देणार इशान किशनला चुका सुधारण्याची संधी, धोनीच्या लाडक्याची घेणार जागा?