क्लासेनने अक्षर पटेलला धू धू धुतलं, सामना संपल्यात जमा; षटक संपल्यानंतर रोहित शर्मा म्हणाला...
T20 World Cup Ind vs SA Final: अक्षर पटेलने अंतिम सामन्याबाबत गुपित उघड केलं आहे.
T20 World Cup Ind vs SA Final:टी-20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) च्या अंतिम सामन्यात भारताला विजय मिळवून देण्यात अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलचाही (Axar Patel) मोठा वाटा होता. अक्षर पटेलला पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्यात आले होते. अक्षर पटेलने अंतिम सामन्यात 31 चेंडूत 47 धावांची जबाबदारीपूर्ण खेळी केली होती. आता अक्षर पटेलने अंतिम सामन्याबाबत गुपित उघड केलं आहे.
दक्षिण अफ्रिकेचा आक्रमक फलंदाज हेन्रिच क्लासेनने अक्षर पटेलच्या एका षटकात 24 धावा केल्या. या षटकानंतर टीम इंडियाचा हातातून सामना जवळपास गेला होता, तर दक्षिण अफ्रिकेचा विजय जवळपास निश्चित मानला जात होता. क्लासेनने अक्षर पटेलविरोधात चौकार, षटकारांचा पाऊस पाडला. या षटकातील थरारावर अक्षर पटेलला एका मुलाखतीती प्रश्न विचारण्यात आला. यावर 5 सेकंदसाठी मलाही आता सगळं संपलं, असं वाटलं. परंतु रोहित शर्मा माझ्याजवळ आला आणि सामना अजूनही संपलेला नाही, असं सांगितलं, असा खुलासा अक्षर पटेलने केला.
अक्षर पटेलची खेळी किती महत्त्वाची?
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात रोहित शर्मा, ऋषभ पंत आणि सूर्यकुमार लवकर बाद झाले. पाचवे षटक संपले नव्हते, पण संघाने 3 महत्त्वाचे विकेट गमावले होते. विराट कोहली मैदानावर टिकून होता, पण त्याला दुसऱ्या फलंदाजाचीही साथ आवश्यक होती. विराट कोहली आणि अक्षर पटेल यांच्यात 72 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी झाली आणि या भागीदारीमुळे टीम इंडियाला 176 धावांपर्यंत मजल मारता आली. अक्षरने या सामन्यात 31 चेंडूत 47 धावा केल्या.
वयाच्या 20 व्या वर्षी टीम इंडियाकडून पदार्पण-
अक्षर पटेल सध्या 30 वर्षांचा आहे. त्याने वयाच्या 20 व्या वर्षी टीम इंडियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. मात्र या 10 वर्षांमध्ये त्याला क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत मिळून केवळ १३१ सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. अक्षरने 2014 मध्ये इंडियन प्रीमियर लीगमध्ये आणि भारताच्या एकदिवसीय संघात पदार्पण केलं. 2015 मध्ये त्याला भारताच्या टी-20 संघात स्थान मिळालं. मात्र देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करूनही त्याचं भारतीय संघातलं स्थान कधीच पक्कं झालं नाही. आजही तो किमान एका तरी प्रकारात भारतीय संघाचा पूर्णवेळ सदस्य होण्यासाठी धडपडताना दिसतोय.
श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी अक्षर पटेलला संधी-
आगामी श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी अक्षर पटेलला संघात स्थान देण्यात आलं आहे. तर सूर्यकुमार यादवला टीम इंडियाचं कर्णधारपद देण्यात आलं आहे.
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जायस्वाल, रिंकु सिंह, रियान पराग, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह, खलील अहमद, मोहम्मद सिराज
टी20 मालिकेचं वेळापत्रक-
पहिली टी 20 मॅच : 27 जुलै
दुसरी टी 20 मॅच : 28 जुलै
तिसरी टी 20 मॅच : 30 जुलै
संबंधित बातम्या:
हार्दिक पांड्यासोबतच्या घटस्फोटानंतर नताशाची पहिली पोस्ट; भारताबाहेर गेल्यावर काय करतेय?