भारताविरोधात वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा, लाबुशेनला मिळाली संधी
Australia ODI Squad Against India: विश्वचषकाआधी भारतात होणाऱ्या तीन सामन्याच्या वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने संघाची घोषणा केली आहे.
Australia ODI Squad Against India: विश्वचषकाआधी भारतात होणाऱ्या तीन सामन्याच्या वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने संघाची घोषणा केली आहे. पॅट कमिन्सच्या नेतृत्वातील संघात अनुभवी आणि युवा खेळाडूंचा भरणा आहे. विश्वचषकाच्या दृष्टीने ही मालिका दोन्ही संघासाठी महत्वाची आहे. स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क आणि ग्लेन मॅक्सवेलसह कर्णधार पॅट कमिन्सचे ऑस्ट्रेलियाच्या संघात पुनरागमन झाले आहे. विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियन संघाला तयारीची चाचपणी करण्याच्या उद्देशाने मैदानावर उतरेल.
2023 च्या अॅशेस मालिकेतील शेवटच्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स दुखापत झाल्यामुळे दक्षिण आफ्रिकेतील एकदिवसीय मालिकेत भाग घेऊ शकला नाही. त्याचे कमबॅक झाले. त्याशिवाय स्टीव्ह स्मिथ आणि ग्लेन मॅक्सवेल हे देखील दुखापतींमुळे या मालिकेत सहभागी होऊ शकले नाहीत. आता हे खेळाडू पूर्णपणे तंदुरुस्त झाले असून पुनरागमन करत आहेत.
भारतीय खेळपट्ट्या लक्षात घेऊन, ऑस्ट्रेलियाने आपल्या संघात दोन स्पेशल फिरकी गोलंदाजांचाही समावेश केलाय. अॅडम झम्पा आणि तनवीर संघा यांना संधी दिली आहे. त्याशिवाय ग्लेन मॅक्सवेल हा तिसरा फिरकी गोलंदाजही पर्याय म्हणून असेल.
स्पेंसर आणि लाबुशेनला संधी -
दक्षिण आफ्रिकाविरोधात दमदार कामगिरी करणाऱ्या मार्नस लाबुशेल याला भारताविरोधात ऑस्ट्रलियाच्या संघात स्थान दिले आहे. गोलंदाजीमध्ये मिचेल स्टार्क याच्याशिवाय कर्णधार पॅट कमिन्स, सीन एबॉट, जोश हेझलवूड आणि स्पेन्सर जॉन्सन यांनाही स्थान देण्यात आले आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेचं वेळापत्रक -
आशिया चषकानंतर टीम इंडिया मायदेशात ऑस्ट्रेलियाविरोधात तीन सामन्याची वनडे मालिका खेळणार आहे. पहिला एकदिवसीय सामना २२ सप्टेंबर रोजी मोहालीच्या मैदानावर रंगणार आहे. त्यानंतर २४ आणि २७ सप्टेंबर रोजी इंदौ आणि राजकोट येथे लढत होणार आहे. विश्वचषकाच्या आधी होणारी ही वनडे मालिका तयारीसाठी महत्वाची आहे.
भारताविरोधात वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाची टीम:
पॅट कमिन्स (कर्णधार), सीन एबॉट, एलेक्स कॅरी, नाथन एलिस, कॅमरून ग्रीन, जोश हेजलवुड, जॉश इंग्लिश, स्पेंसर जॉनसन, मार्नश लाबुशेन, मिचल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तनवीर संघा, मॅथ्यू शॉर्ट, स्टीव स्मिथ, मिचल स्टार्क, मार्कस स्टोइनिस, डेविड वॉर्नर, एडम जम्पा.
Pat Cummins (C), Abbott, Carey, Ellis, Green, Hazlewood, Inglis, Spencer Johnson, Labuschagne, Mitchell Marsh, Maxwell, Sangha, Matt Short, Smith, Starc, Stoinis, Warner, Zampa
Australian ODI squad vs India:
— Johns. (@CricCrazyJohns) September 17, 2023
Pat Cummins (C), Abbott, Carey, Ellis, Green, Hazlewood, Inglis, Spencer Johnson, Labuschagne, Mitchell Marsh, Maxwell, Sangha, Matt Short, Smith, Starc, Stoinis, Warner, Zampa pic.twitter.com/5ipyykcVsC