सिडनी : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज माजी फिरकीपटू शेन वॉर्नचा अपघात (Shane Warne Accident) झाल्याची घटना घडली आहे. वॉर्न त्याचा मुलगा जॅक्सन याला घेऊन बाईक चालवताना चालू बाईकवरुन दोघेही पडल्याने हा अपघात झाला आहे. ऑस्ट्रेलियन मीडियाने दिलेल्या
माहितीनुसार 52 वर्षीय वॉर्नची बाईक दूरवर फरफटत गेल्याने त्याला गंभीर दुखापत (Shane Warne Injured) झाली असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.



पूर्वीपासून कोणत्या न कोणत्या वादात अडकणाऱ्या शेनचं जीवन कायमच विविध विषयांनी चर्चेत असतं. सचिनचा कट्टर प्रतिस्पर्धी असणारा शेन भारतीय क्रिकेटमध्येही चांगलाच सक्रीय होता. सर्वात पहिली आयपीएल ट्रॉफी शेन कर्णधार असणाऱ्या 
राजस्थान रॉयल्सनेच उचलली होती. दरम्यान काही दिवसांपूर्वी शेनवर एका मॉडेल आणि टीव्ही अभिनेत्री जेसिका पॉवरला हीने अश्लील मेसेज पाठवल्या आरोप केला होता. त्यानंतर आता या अपघातामुळे शेन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 


कोण आहे शेन वॉर्न?


जगातील अव्वल दर्जाचा फिरकीपटू तसंच एक दिग्गज कर्णधार अशी शेन वॉर्नची ख्याती आहे. ऑस्ट्रेलियाकडून (Australia Cricket) अनेक वर्ष क्रिकेट खेळलेला वॉर्न क्रिकेट जगतात बहुतेक सर्वांना माहित आहे. वॉर्नने 145 कसोटी सामन्यात 708 विकेट्स घेतल्या आहेत. तर 194 एकदिवसीय सामन्यात 293 गड्यांना माघारी धाडलं आहे. याशिवाय 55 आयपीएल सामन्यात वॉर्नने 57 विकेट मिळवले आहेत.  


संबधित बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha