IPL 2022 : आयपीएलच्या 15 व्या हंगामासाठी जानेवारी 2022 मध्ये पहिल्या आठवड्यात मेगा लिलाव होण्याची शक्यता आहे. अहमदाबाद आणि लखनौ या दोन संघामुळे आगामी आयपीएल हंगाम रोमांचक होणार आहे. त्यापूर्वी आठ संघाना काही खेळाडू रिटेन करण्याचे अधिकार बीसीसीआयने दिले आहेत. त्याशिवाय दोन नव्या संघांना लिलावापूर्वी खेळाडू खरेदी करण्याची मूभाही दिली आहे. धोनीपासून राहुलपर्यंत अन् अय्यरपासून हार्दिक पांड्या, रसेल, वॉर्नरपर्यंत कोणत्या खेळाडूला कायम ठेवलं जाईल अन् कोणत्या खेळाडूला बाहेरचा रस्ता दाखवला जाणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. आठ संघाना आपल्या खेळाडूंना रिटेन करण्यासाठी 30 नोव्हेंबरची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक संघ चाचपणी करत आहे. मुंबई, चेन्नई, दिल्ली आणि आरसीबी सारख्या संघाला खेळाडू रिटेन करताना डोकेदुखी होणार, यात दुमत नाही. 


पाहूयात रिटेशनचे नियम काय आहेत –
प्रत्येक संघ चार खेळाडूंना रिटेन करु शकतो. यामध्ये दोनपेक्षा जास्त विदेशी खेळाडू नसतील असं बीसीसीआयने सांगितलेय. म्हणजे, 2 भारतीय 2 विदेशी अथवा तीन भारतीय एक विदेशी... अशा प्रकारे आपल्या संघातील खेळाडू रिटेन करण्याचे अधिकार आयपीएल संघाला देण्यात आले आहेत. 


रिटेशन केलेल्या खेळाडूसाठी किती रक्कम?
बीसीसआयने यंदा प्रत्येक संघाला लिलिवात खेळाडू खरेदी करण्यासाठी 90 कोटी रुपये दिले आहेत. रिटेशनमध्ये खेळाडू खरेदी केल्यास यामधून रक्कम वजा होईल. पहिल्या रिटेशनसाठी 16 कोटी, दुसऱ्या रिटेशनसाठी 12 कोटी, तिसऱ्या रिटेशनसाठी 8 आणि चौथ्या रिटेशनसाठी 6 कोटी रुपये मोजावे लागणार आहेत. 


कोणता संघ कुणाला रिटेन करणार?
रिटेन करण्यात आलेल्या खेळाडूची अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र प्रसारमाध्यमांनी आपल्या सूत्रांच्या हवाल्यानं काही नावं प्रसिद्ध केली आहेत. त्यानुसार काही दिग्गज खेळाडूंना संघानी रिटेन केलेलं नाही. नियमाअभावी काही दिग्गजांना संघाबाहेर ठेवण्यात आलं आहे. पाहूयात कोणता संघ कोणत्या खेळाडूला रिटेन करु शकतो.... 


मुंबई इंडियन्स
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह, कायरन पोलार्ड, इशान किशन/सूर्यकुमार यादव


दिल्ली कॅपिट्लस –
ऋषभ पंत, अक्षर पटेल, पृथ्वी शॉ, नॉर्त्जे


चेन्नई सुपरकिंग्ज – 
एम.एस. धोनी, ऋतुराज गायकवाड, रविंद्र जाडेजा, मोईन अली/सॅम करन


 रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु
विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, यजुवेंद्र चहल, देवदत्त पडीकल/हर्षल पटेल


राजस्थान रॉयल –
संजू सॅमसन, जोस बटलर, यशस्वी जयस्वाल, चेतन सकारिया


पंजाब किंग्ज – 
एकाही खेळाडूला रिटेन करणार नाही.


कोलकाता नाईट रायडर्स – 
रसेल, सुनिल नारायण, वरुण चक्रवर्ती, वेंकटेश अय्यर


सनरायजर्स हैदराबाद
केन विल्यमसन, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, अब्दुल समद


लखनौ आणि अहमदाबाद संघ काय करणार?
लिलावात उतरलेल्या उर्वरित खेळाडूमधून लखनौ आणि अहमदाबाद संघाला तीन खेळाडू खरेदी करण्याची संधी. यामध्ये एक विदेशी आणि दोन भारतीय खेळाडू घ्यावे लागतील. यासाठी त्यांना 33 कोटी रुपयांचं बजेट देण्यात आलं आहे. 


लिलावात असू शकतात हे खेळाडू ?
हार्दिक पांड्या, क्रृणाल पांड्या, बोल्ट, इशान किशन/सूर्यकुमार यादव, राहुल चहर, ख्रिस लीन, जेम्स निशम, डिकॉक, सुरेश रैना, ड्युप्लेसिस, मोईन अली/सॅम करन, ब्राव्हो, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, जोश हेजलवूड, अंबाती रायडू, मिचेल सँटनर, श्रेयस अय्यर, रबाडा, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, स्मिथ, हेटमायर, आवेश खान, स्टॉयनिस, देवदत्त पडीकल/हर्षल पटेल, नवदीप सैनी, मोहम्मद सिराज, हसरंगा, कायले जेमिसन, के. एल. राहुल, मार्करम, मयांक अग्रवाल, शाहरुख खान, मोहम्मद शामी, रवी बिश्नोई, दिपक हुड्डा, लिव्हिंगस्टोन, ख्रिस मॉरिस,डेव्हिड मिलर,तरबेज शम्सी, इविन लुईस, डेव्हिड वॉर्नर, मनिष पांडे, जॉनी बेयरस्टो, नटराजन, जेसन रॉय, जेसन होल्डर, मुजीब रहमान, मॉर्गन, दिनेश कार्तिक, नितेश राणा, राहुल त्रिपाठी, कमलेश नाटगरकोटे, कुलदीप यादव, लॉकी फर्गुसन, प्रसिद्ध कृष्णा, शिवम मावी, शुबमन गिल, शाकीब अल हसन.