Stoinis and Zampa : ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू स्टॉयनिस आणि झाम्पा एकमेकांचे व्हॅलेंटाईन, बिग बॅश लीगनं शेअर केली खास पोस्ट
Valentines Day Stoinis and Zampa : ऑस्ट्रेलियाचे स्टार क्रिकेटर मार्कस स्टॉयनिस आणि अॅडम झाम्पा या दोघांचा एक अगदी क्यूट फोटो बिग बॅश लीगनं त्यांच्या ऑफिशिअल ट्वीटरवरुन शेअर केला आहे.
Valentines Day Special : जगभरातील तरुण वर्ग आज म्हणजेच 14 फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डे (Valentines Day) साजरा करत आहे. प्रेमाचा दिवस म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या या दिवशी अनेकजण आपल्या प्रियकर, प्रेयसीसोबतचे खास पोस्ट शेअर करत असतात. अशामध्ये ऑस्ट्रेलियाची प्रसिद्ध बिग बॅश लीगनं त्यांच्या ऑफिशिअल ट्वीटरवरुन ऑस्ट्रेलियन क्रिकेटर मार्कस स्टॉयनिस आणि अॅडम झाम्पा यांचा क्युट फोटो शेअर करत व्हॅलेंटाईन डे निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोमध्ये झाम्पा स्टॉयनिसच्या गालावर किस देताना दिसून येत आहे. दरम्यान या दोघांमधील असे क्युट मूमेंट्स याआधीही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. पण दोघेही समलैगिंक असल्याचं किंवा त्यांच्यात मैत्रीपलीकडे काही नातं असल्याचं आजवर समोर आलेलं नाही. त्यामुळं ही एक मैत्रीपूर्ण पोस्ट समजली जाऊ शकते. पण फोटोमध्ये झाम्पा स्टॉयनिसला गालावर किस देत असल्यानं अनेक चर्चांना उधाण येत आहे. नेटकरी विविध कमेंट्सही करताना दिसत आहेत.
पाहा पोस्ट-
happy valentine's day 🥰 pic.twitter.com/tv5dkKlxi3
— KFC Big Bash League (@BBL) February 13, 2023
नेटकऱ्यांनी एडिट केला भन्नाट व्हिडीओ
या पोस्टवर जगभरातील क्रिकेटप्रेमी वेगवेगळ्या कमेंट्स पोस्ट करताना दिसत आहेत. अनेकजण या पोस्टला क्युट पोस्ट म्हणत आहेत. तर एका युजरने दोघांचा बॉलीवुड गाण्यावर एडिटेड व्हिडिओच पोस्ट केला आहे. तर या व्हिडीओसह इतरही काही हटके रिएक्शन्स पाहूया...
Ohk, happy Valentines Day 🌝👍🏻 pic.twitter.com/XgGrTDNYvS
— 𝐀𝐬𝐡𝐦𝐢𝐭𝐚 (@samaira__kohli) February 14, 2023
Reyyy 😂😂😂 pic.twitter.com/FoQMLOX2cj
— Professor 🪄 (@Sriinivasss) February 14, 2023
Cutest Cricket Couple Ever pic.twitter.com/HOxGQN89Fs
— Dr Khushboo 🇮🇳 (@khushbookadri) February 14, 2023
— Jyotiranjan Sahu (@ChikuSa85580890) February 14, 2023
क्रिकेटर्सनी साजरा केला व्हॅलेंटाईन डे
वराज सिंग, दीपक चहर, जसप्रीत बुमराहसह डेव्हिड वॉर्नरसारख्या परदेशी खेळाडूंसग अनेक प्रसिद्ध क्रिकेटपटू व्हॅलेंटाईन डे साजरा करत आहेत. भारतीय क्रिकेटपटूंव्यतिरिक्त, या सर्वच खेळाडूंनी त्यांच्या पत्नी आणि मैत्रिणींसोबत हा खास दिवस साजरा केला आहे. युवराज, बुमराह यांच्या पोस्ट व्हायरल होत आहेत. तसंच टीम इंडियाच्या क्रिकेटपटूंशिवाय ऑस्ट्रेलियन खेळाडू डेव्हिड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा यांनी आपापल्या पत्नींसोबत व्हॅलेंटाईन डे साजरा केला. दोन्ही ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी सोशल मीडियावर आपापल्या पत्नीसोबतचे फोटो शेअर करून हा खास दिवस साजरा केला.
हे देखील वाचा-