The Ashes 2021-22 : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघासाठी अत्यंत महत्त्वाची स्पर्धा असणाऱ्या अॅशेस मालिकेला (Ashes Series) सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशीचा खेळ पावसामुळे मध्येच थांबवला आहे. पण त्यापूर्वी ऑस्ट्रेलियाने अप्रतिम गोलंदाजी करत इंग्लंडचा पहिला डाव 147 धावांत गुंडाळला आहे. यावेळी ऑस्ट्रेलियाचा नवनिर्वाचित कर्णधार पॅट कमिन्सने (Pat Cummins) पहिल्याच सामन्यात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. कमिन्सने सर्वोत्कृष्ट गोलंदाजी इंग्लंडच्या 5 गड्यांना माघारी धाडलं आहे. कमिन्सने या 5 विकेट्स घेत 127 वर्ष जुन्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. कर्णधार असताना अॅशेसमध्ये 5 विकेट्स घेण्याची अप्रतिम कामगिरी पॅटने केली आहे.


तसंच कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात 5 विकेट्स घेणारा पॅट जगातील 12 वा तर ऑस्ट्रेलियाचा दुसरा गोलंदाज ठरला आहे. याआधी 1894 मध्ये जॉर्ज गिफन यांनी अशी कामगिरी केली होती. त्यांनी 155 धावा देत 6 विकेट्स घेतल्या होत्या. तर पॅटने मात्र आणखी उत्कृष्ट गोलंदाजी केली आहे. त्याने 13.1 ओव्हर टाकत केवळ 38 धावा देत 5 विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या या कामगिरीमुळे त्याची सर्वत्र वाह वाह! होत आहेत.



असा होता पहिला दिवस


सामन्यात नाणेफेक जिंकत इंग्लंडचा कर्णधार जो रुटने (Joe Root) फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी करत त्यांचा हा निर्णय साफ चूकीचा ठरवत अवघ्या 147 धावांमध्ये इंग्लंडच्या सर्व फलंदाजांना तंबूत धाडलं. यावेळी पॅट कमिन्सने सर्वोत्कृष्ट गोलंदाजी करत 5 विकेट्स टीपल्या. तर मिचेल स्टार्च आणि जोश हॅजलवुड यांनी प्रत्येकी 2 तर कॅमरॉन ग्रीनने एक विकेट घेतली आहे. इंग्लंडकडून जोस बटलर (39) आणि ओली पोप (35) यांनी सर्वाधिक धावा केल्या. तर सलामीवीर रॉरी बर्न्स, कर्णधार जो रुट आणि रॉबिनसन हे तिघे शून्यावर बाद झाले. त्यामुळे इंग्लंडने केवळ 147 धावा केल्या असून ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीपूर्वीच पावसाच्या व्यत्ययामुळे सामना थांबवण्यात आला आहे.


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha