(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ICC WTC Final : भारताविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी ऑस्ट्रेलियाकडून संघ जाहीर, 'या' 17 खेळाडूंचा समावेश
ICC WTC Final : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 फायनल आणि भारताविरुद्धच्या पहिल्या दोन ऍशेस टेस्टसाठी ऑस्ट्रेलियाने संघांची घोषणा केली आहे.
ICC WTC Final Australia Squad : भारताविरुद्ध (Team India) आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 (World Test Championship 2023) फायनल आणि पहिल्या दोन ऍशेस टेस्टसाठी ऑस्ट्रेलियाने संघांची (Team Australia) घोषणा केली. ओव्हल येथे ऑस्ट्रेलिया संघ भारताविरुद्ध आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 चा अंतिम मुकाबला होणार आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल (ICC WTC Final) आणि सुरुवातीच्या दोन ॲशेस टेस्टसाठी (Men's Ashes Test) ऑस्ट्रेलियाच्या 17 खेळांडूंची संघात समावेश केला आहे. ऑस्ट्रेलियाने खेळाडूंची यादी (Australia Squad) जाहिर केली आहे. भारताविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी आणि ॲशेस मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघात मॅट रेनशॉ, मार्कस हॅरिस आणि मिचेल मार्श यांचा समावेश करण्यात आला आहे. निवड समितीने बुधवारी 17 सदस्यीय संघाची (Australia Squad For ICC WTC Final 2023) घोषणा केली आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी ऑस्ट्रेलियाकडून संघ जाहीर
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना (World Test Championship Final) भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात 7 जूनपासून ओव्हल येथे खेळवला जाणार आहे. ऑस्ट्रेलियन () संघाला 28 मे पर्यंत संघांची संख्या 17 वरून 15 करावी लागेल. त्यानंतर ॲशेस मालिका (Ashes Test) आहे. दरम्यान, शेवटच्या तीन कसोटींमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.
भारताविरुद्धच्या सामन्यात 'या' 17 खेळाडूंचा समावेश
World Test Championship Final and Men's Ashes squad: Pat Cummins (C), Steve Smith (VC), Scott Boland, Alex Carey, Cameron Green, Marcus Harris, Josh Hazlewood, Travis Head, Josh Inglis, Usman Khawaja, Marnus Labuschagne, Nathan Lyon, Mitchell Marsh, Todd Murphy, Matthew Renshaw,…
— ANI (@ANI) April 19, 2023
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल आणि पुरुष ऍशेस संघ
पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ (उप कर्णधार), स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर.
ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांपैकी एक लान्स मॉरिसला पाठीच्या दुखापतीमुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधून बाहेर पडला आहे. त्याला सहा आठवडे विश्रांतीची आवश्यकता आहे. त्याच्या तंदुरुस्तीची चाचणी घेण्यात येईल. त्यानंतरच त्याच्या खेळण्याबाबत स्पष्टता येईल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :