एक्स्प्लोर

Australia Squad T20 World Cup 2026 : ज्याने मैदान गाजवलं, त्यालाच बाहेर फेकले! T20 वर्ल्डकपसाठी ऑस्ट्रेलियन संघाची धक्कादायक घोषणा, हैराण करणारा संपूर्ण Squad

Australia Squad T20 World Cup 2026 Marathi News : भारत आणि श्रीलंकेच्या संयुक्त यजमानपदाखाली होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कप 2026 साठी ऑस्ट्रेलियानेही आपला 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे.

Australia Announce Squad for T20 World Cup 2026 News : भारत आणि श्रीलंकेच्या संयुक्त यजमानपदाखाली होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कप 2026 साठी ऑस्ट्रेलियानेही आपला 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. मिचेल मार्श संघाचे नेतृत्व करणार आहे, पण या संघाची घोषणा करताना काही असे निर्णय आहेत, ज्यांनी सगळेच हैराण झाले आहे.

ज्याने मैदान गाजवलं, त्यालाच बाहेर फेकले!

ऑस्ट्रेलियन संघाच्या निवडीत सर्वात धक्कादायक बाब म्हणजे मिशेल ओवेन याला संघात स्थान न मिळणं. 2025 मध्ये ज्याच्या कामगिरीची सर्वत्र चर्चा झाली, तोच खेळाडू वर्ल्ड कप संघाबाहेर राहिल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. विशेष म्हणजे, गेल्या 12 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांपासून संघाबाहेर असलेल्या कूपर कोनोलीला मात्र थेट वर्ल्ड कपसाठी संधी देण्यात आली आहे.

मिशेल ओवेन का ठरला ‘अनलकी’?

मिशेल ओवेन गेल्या वर्षी BBL मध्ये होबार्ट हरिकेन्सकडून खेळताना सिडनी थंडरविरुद्ध अवघ्या 42 चेंडूत 11 षटकारांसह 108 धावांचा वादळी शतक ठोकून प्रकाशझोतात आला होता. त्यानंतर PSL मधून थेट IPL मध्ये खेळण्यासाठी बोलावलं जाणं, आणि प्रीती झिंटाच्या पंजाब संघाने 3 कोटींना खरेदी करणं, यामुळे तो प्रचंड चर्चेत होता. जुलै 2025 मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणही केलं. मात्र, चर्चेपेक्षा कामगिरी कमी पडली. 2025 मध्ये खेळलेल्या 50 टी-20 सामन्यांत त्याने केवळ 981 धावा केल्या. टी-20 आंतरराष्ट्रीयत 13 सामन्यांत फक्त 163 धावा, तर भारतात खेळलेल्या 3 टी-20I सामन्यांत केवळ 14 धावा. ही आकडेवारी त्याच्या निवडीविरोधात गेली, असं मानलं जात आहे.

12 सामन्यांपासून बाहेर, तरीही वर्ल्ड कप तिकीट!

मिशेल ओवेनला डच्चू दिला गेला असताना, कूपर कोनोलीला मात्र थेट वर्ल्ड कप संघात स्थान देण्यात आलं आहे. तो गेल्या 12 टी-20 सामन्यांपासून संघाचा भाग नव्हता. याशिवाय मॅथ्यू शॉर्ट, मॅट कुन्हेमन आणि झेवियर बार्टलेट यांनाही संधी देण्यात आली असून, या चौघांसाठी हा पहिलाच टी-20 वर्ल्ड कप असेल.

अनुभव आणि स्पिनवर ऑस्ट्रेलियाचा भर 

संघात पॅट कमिन्स, मार्कस स्टॉइनिस, ग्लेन मॅक्सवेल आणि जोश हेजलवूड यांचा अनुभव आहे. भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या स्पर्धेचा विचार करता, ऑस्ट्रेलियाने स्पिनला विशेष महत्त्व दिलं असून अ‍ॅडम झम्पा स्पिन आघाडी सांभाळताना दिसणार आहे. एकंदरीत, ऑस्ट्रेलियाचा हा संघ अनुभव आणि नव्या चेहऱ्यांचा मेळ असला, तरी काही धक्कादायक निर्णयांमुळे ही संघनिवड चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे.

2026 च्या टी-20 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ (T20 World Cup 2026 Australia Squad) : मिशेल मार्श (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, पॅट कमिन्स, मार्कस स्टोइनिस, जॉश हेझलवूड, नॅथन एलिस, झेवियर बार्टलेट, मॅथ्यू वेड, कूपर कॉनोली, अॅडम झांपा, मॅट कुनहेमन, टिम डेव्हिड, कॅमेरॉन ग्रीन, जॉश इंग्लिस आणि ग्लेन मॅक्सवेल.

हे ही वाचा -

Sara Tendulkar Viral Video : हातात बिअरची बाटली, गोव्याच्या रस्त्यावर फिरणारी सारा तेंडुलकर; नेमकं काय करतं होती सचिनची लेक?, व्हिडिओ व्हायरल

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Palghar : मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
Donald Trump : आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं, अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं,व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Aaditya Thackeray on Coffee With Kaushik : Raj-Uddhav ठाकरे बंधू विरोधकांना सपाट करणार: आदित्य ठाकरे
Manjusha Nagpure PMC Election : पुण्यात भाजपचा उमेदवार बिनविरोध;मंजुषा नागपुरेंची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde Full Speech Mumbai : पहिला वार राज-उद्धव ठाकरेंवर; एकनाथ शिंदेंचं घणाघाती भाषण
Devendra Fadnavis : मुंबईचा महापौर महायुतीचा, हिंदू, मराठीच; फडणवीसांचा एल्गार, ठाकरे बंधूंवर प्रहार
Ashish Shelar Majha Katta : ठाकरे की पवार, भाजपसोबत कोण येणार, राजकारणात नवा बॉम्ब : माझा कट्टा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Palghar : मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
Donald Trump : आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं, अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं,व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवाराची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवाराची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
Venezuela : राष्ट्रपती निकोलस मादुरो अमेरिकेच्या ताब्यात, व्हेनेझुएलाचं नेतृत्त्व कोण करणार? नाव आघाडीवर असलेल्या डेल्सी रॉड्रिग्ज नेमक्या कोण?
राष्ट्रपती निकोलस मादुरो अमेरिकेच्या ताब्यात, व्हेनेझुएलाचं नेतृत्त्व कोण करणार? डेल्सी रॉड्रिग्ज यांचं नाव आघाडीवर
बीडमध्ये सह्याद्री वनराईला दुसऱ्यांदा आग, सयाजी शिंदेंचा संताप; अजित पवारांना भेटणार, काय म्हणाले शिंदे
बीडमध्ये सह्याद्री वनराईला दुसऱ्यांदा आग, सयाजी शिंदेंचा संताप; अजित पवारांना भेटणार, काय म्हणाले शिंदे
Embed widget