एक्स्प्लोर

AUS vs WI: काइल मेयर्सचा 105 मीटरचा अतरंगी षटकार! खेळाडू, अंपायरसह प्रेक्षकंही झाले हैराण, पाहा व्हिडिओ

ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीज (Australia vs West Indies)  यांच्यात आज पहिला टी-20 सामना खेळला गेला. कॅरारा ओव्हलच्या (Carrara Oval) क्विन्सलँडच्या (Queensland) क्रिकेट मैदानावर खेळला गेलेल्या हा सामना अतिशय रोमहर्षक ठरला.

Kyle Mayers Six  Video: ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीज (Australia vs West Indies)  यांच्यात आज पहिला टी-20 सामना खेळला गेला. कॅरारा ओव्हलच्या (Carrara Oval) क्विन्सलँडच्या (Queensland) क्रिकेट मैदानावर खेळला गेलेल्या हा सामना अतिशय रोमहर्षक ठरला. या सामन्यात वेस्ट इंडीजच्या संघानं ऑस्ट्रेलियाला कडवी झुंज दिली. मात्र, त्यांच्या पदरात निराशा पडली. हा सामना ऑस्ट्रेलियानं 3 विकेट्सनं जिंकून दोन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या विजयापेक्षा वेस्ट इंडीजचा फलंदाज काइल मेयर्सच्या (Kyle Mayers) अतरंगी षटकारची अधिक चर्चा रंगलीय. या षटकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. 

काइल मेयर्सच्या षटकाराची चर्चा
वेस्ट इंडीजच्या डावातील चौथ्या षटकात कॅमेरून ग्रीनच्या गोलंदाजीवर मेयर्सनं कव्हर्सच्यावरून 105 मीटर उत्तुंग षटकार लगावला. मेयर्सचा हा षटकारपाहून मैदानातील खेळाडू, अंपायरसह स्टँडमध्ये बसलेले प्रक्षकही हैराण झाले.भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरनंही मेयर्सच्या या षटकाराचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केलाय. मेयर्सचा हा षटकार खरोखरच अविश्वसनीय आहे. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजच्या संघानं ऑस्ट्रेलियासमोर 146 धावांचं लक्ष्य ठेवलं. तर, मेयर्सनं आपल्या संघासाठी सर्वाधिक 39 धावांचं योगदान दिलं. 

व्हिडिओ-

ऑस्ट्रेलियानं वेस्ट इंडीजच्या तोंडातून विजयी घास हिसकावला
वेस्ट इंडीजच्या संघानं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाची दमछाक झाली. ऑस्ट्रेलियानं अवघ्या 58 धावांवर पाच विकेट्स गमावल्या. सामना वेस्ट इंडीजच्या बाजूनं झुकलेला दिसत असताना कर्णधार आरोन फिंच आणि मॅथ्यू हेडन मोक्याची क्षणी संघाचा डाव सावरला. फिंचनं 53 चेंडूत 58 धावांची खेळी खेळली आणि कारकिर्दीतील 18 वं अर्धशतक झळकावलं. तर, वेडनं 29 चेंडूत नाबाद 39 धावा केल्या. अखेरच्या षटकात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 11 धावांची गरज होती. शेल्डन कोट्रेलच्या पहिल्याच चेंडूवर चौकार लागला. पुढच्या चेंडूवर हेडचा झेल सुटला. त्यानंतर मिचेल स्टार्कचाही झेल सुटला. ज्यामुळं ऑस्ट्रेलियाच्या संघानं या सामन्यात तीन विकेट्सनं विजय मिळवला, असं बोलणं वावग ठरणार नाही.

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
Embed widget