AUS vs ENG: स्टीव्ह स्मिथचा खास पराक्रम; आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 14000 धावांचा टप्पा गाठला
AUS vs ENG 2nd ODI: ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (Australia vs England) यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर खेळला जातोय.
AUS vs ENG 2nd ODI: ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (Australia vs England) यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर खेळला जातोय. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथनं (Steve Smith) खास पराक्रमाला गवसणी घातलीय. या सामन्यात स्टीव स्मिथनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 14000 धावांचा टप्पा गाठला. इंग्लंडविरुद्ध मालिकेत स्टीव्ह स्मिथनं आपला फॉर्म कायम ठेवलाय. पहिल्या सामन्यात नाबाद 80 धावांची खेळी करणाऱ्या स्मिथनं दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियासाठी 92 धावांचं योगदान दिलं.
दरम्यान, आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 14000 धावांचा टप्पा गाठणारा स्टीव्ह स्मिथ ऑस्ट्रेलियाचा नववा खेळाडू ठऱला आहे. पण, सर्वात जलद आंतराष्ट्रीय 14000 धावांचा पूर्ण करणारा तो पहिला ऑस्ट्रेलियन खेळाडू आहे. स्पिनर म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या स्मिथनं दिग्गज खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवलं आहे.
ट्वीट-
Steve Smith completes 14000 runs in international cricket.
— CricTracker (@Cricketracker) November 19, 2022
He is the fastest to do so for Australia 👏@stevesmith49 | #AUSvENG | #CricketTwitter pic.twitter.com/GgHaA0uw5b
सलग चार सामन्यात जबरदस्त कामगिरी
स्मिथनं सलग चार एकदिवसीय सामन्यात चार अर्धशतक झळकावली आहेत. त्यानं न्यूझीलंडविरुद्ध 94 चेंडूत 61 धावांची खेळी केली होती. त्यानंतरच्या पुढच्या सामन्यात त्याच्या बॅटमधून शतक झळकलं. या सामन्यात त्यानं 131 चेंडूत 105 केल्या होत्या. त्यानंतर इंग्लंडविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्यानं 78 चेंडूत 80 धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियासाठी 114 चेंडूत 94 धावांचं योगदान दिलं.
नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाच फलंदाजीचा निर्णय
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड याच्यात सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर दुसरा एकदिवसीय सामना खेळला जातोय. या सामन्यात नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाच्या संघानं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत इंग्लंडसमोर निर्धारित 50 षटकात 8 विकेट्स गमावून 281 धावांचं लक्ष्य ठेवलं. इग्लंडकडून आदिल राशीदनं सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तर, क्रिस वोक्स आणि विले यांना प्रत्येकी दोन-दोन विकेट्स मिळाल्या. तर, मोईन अलीच्या खात्यात एक विकेट्स जमा झाली.
ऑस्ट्रेलियाचा संघ मालिकेत 1-0 नं आघाडीवर
अॅडिलेड येथे गुरुवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियानं इंग्लंडचा सहा विकेट्नं पराभव केला. या सामन्यात इंग्लंडच्या संघानं प्रथम फंलदाजी करत ऑस्ट्रेलियासमोर 288 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाच्या संघानं चार विकेट्स आणि 19 चेंडू शिल्लक ठेवून हा सामना जिंकला.
हे देखील वाचा-