एक्स्प्लोर

Asia Cup 2023 : आशिया चषकात भारत नेहमीच पाकिस्तानपेक्षा वरचढ, सर्व सामन्याचे निकाल एका क्लिकवर

Asia Cup History IND vs PAK : आशिया चषकाच्या इतिहासात आतापर्यंत टीम इंडियाचे पारडे जड राहिले आहे.

Asia Cup History, IND vs PAK : भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) हे क्रिकेट जगतातील कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. दोन्ही संघाचा सामना म्हणजे संपूर्ण जगातील क्रिकेट रसिकांसाठी ब्लॉकबस्टर शो असतो. दोन्ही देशातील संबंध खास नसल्याने दोघेही एकमेकांचा दौरा करत नाहीत. अशात मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येच आमने-सामने येतात. आशिया चषकातही भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. नुकतेच आशिया चषकाचे वेळापत्रक जारी झाले आहे. आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये दोन सामने तरी होणार, हे आता जवळपास निश्चित झालेय. पहिला सामना 2 सप्टेंबर रोजी होणार आहे. आशिया चषकाच्या इतिहासात आतापर्यंत टीम इंडियाचे पारडे जड राहिले आहे. यंदा श्रीलंकामध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे. 

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामने आतापर्यंत अटीतटीचे झाले आहेत. दोन्ही संघांनी आतापर्यंत आशिया कपमध्ये खेळलेले मोस्ट ऑफ सामने कमालीचे अटीतटीचे झाले आहेत, त्यामुळे यंदाही चुरशीची लढत पाहायला मिळू शकते. 1984 पासून 2022 पर्यंत भारत आणि पाकिस्तान एकूण 16 वेळा आमने-सामने आले आहेत.  यामध्येबारताने 9 वेळा बाजी मारली तर 6 वेळा पाकिस्तान जिंकला आहे. 1997 सालचा एक सामना पावसामुळे अनिर्णीत देखील राहिला होता. त्यामुळे आतापर्यंतच्या सामन्यात भारताचंच पारडं जड राहिल्याचं दिसून येतंय. तर नेमके निकाल एकदा पाहूया.. 

1984 साली म्हणजेत भारताने 1983 विश्वचषक जिंकल्यावर एक वर्षाने भारत-पाकिस्तान आमने-सामने आले. हा सामना 54 धावांच्या तगड्या फरकाने भारताने जिंकला होता. 

1988 साली पुन्हा एकदा भारताने चार गडी राखून पाकिस्तानला मात दिली होती.

1995 साली मात्र प्रथमच पाकिस्तानने भारताला मात देत 97 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला.

1997 मध्ये पावसामुळे सामना अनिर्णीत राहिला.

2000 साली पुन्हा पाकिस्तानने 44 धावांच्या फरकाने विजय मिळवला.

2004 पुन्हा पाकिस्तान 59 धावांच्या फरकाने जिंकला अशारितीने 1997 चा अनिर्णीत सामना वगळला तर सलग तीन वेळा पाकिस्तानचा संघ जिंकला.

2008 मध्ये ग्रुप स्टेजमध्ये भारताने सहा विकेट्सनी बाजी मारली. 

 2010, 2012 अशा दोन्ही वर्षी अनुक्रमे 3 आणि 6 विकेट्सच्या फरकाने भारतच जिंकला. 

2014 साली मात्र शाहीन आफ्रिदीच्या तुफान खेळीच्या जोरावर पाकिस्तान अवघ्या एका विकेटने सामना जिंकला.

2016 साली 5 विकेटने भारत जिंकला.

2018 मध्ये दोन वेळा भारत-पाकिस्तान आमने-सामने आले यावेळी एकदा 8 तर एकदा 9 विकेट्सने भारताने विजय मिळवला. 

2022 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात दोन वेळा सामना झाला. दोन्ही संघाने एक एक विजय मिळवला.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Bhaskar Jadhav On Nana Patole : Chhatrapati Sambhaji Nagar : गुगल मॅपने केला गोंधळ, UPSC चे विद्यार्थी परीक्षेपासून वंचितABP Majha Headlines : 2 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
Embed widget