एक्स्प्लोर

Asia Cup 2025 Saim Ayub: बुमराहला 6 सिक्स मारण्याचं स्वप्न घेऊन आला, सलग 3 डावात शून्यावर बाद झाला; पाकच्या फलंदाजाची नाचक्की!

Asia Cup 2025 Saim Ayub: पाकिस्तान क्रिकेट संघाच्या माजी खेळाडूंनी आशिया चषक सुरु होण्याआधी पाकिस्तान क्रिकेट संघाचा सलामीवीर सईम अयुबचं तोंडभरुन कौतुक केलं होतं.

Asia Cup 2025 Saim Ayub: आशिया चषक 2025 च्या स्पर्धेवर (Asia Cup 2025) बहिष्कार टाकण्याची धमकी मागे घेतल्यानंतर पाकिस्तानने 17 सप्टेंबर रोजी अखेरच्या साखळी सामन्यात कडवी झुंज दिलेल्या यूएईचा 41 धावांनी (Pak vs UAE) पराभव केला. याविजयासह पाकिस्तानने सुपर फोर फेरीत प्रवेश निश्चित केला. त्यामुळे 21 सप्टेंबर रोजी आता पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) आमनेसामने येणार आहेत. दरम्यान, सध्या पाकिस्तानचा सलामीवीर सईम अयुबची (Saim Ayub) चर्चा रंगलीय. 

पाकिस्तानचा सलामीवीर सईम अयुब आशिया चषकातील तीनही साखळी सामन्यात अपयशी ठरला. पाकिस्तान क्रिकेट संघाच्या माजी खेळाडूंनी आशिया चषक सुरु होण्याआधी सईम अयुबचं तोंडभरुन कौतुक केलं होतं. तसेच भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला षटकार मारण्याची स्वप्न पाहणारा सईम अयुब सलग तीन सामन्यात शून्यावर बाद झाल्याने त्याची नाचक्की झाली आहे. सलग तीन सामन्यात खातंही उघडता न आल्याने सईम अयुबला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. 

सईम अयुबची आशिया चषकामधील आतापर्यंतची कामगिरी-

पाकिस्तान विरुद्ध ओमान- 0 (1)

पाकिस्तान विरुद्ध भारत- 0 (1)

पाकिस्तान विरुद्ध यूएई- 0 (1)

ग्रुप-अ चे समीकरण-

भारत आणि पाकिस्तानने गट अ मध्ये त्यांचे सुपर-4 स्थान निश्चित केले आहे. दोन सामन्यांपैकी दोन विजयानंतर भारताचे 4 गुण आहेत, तर पाकिस्तानने तीन सामने खेळले आहेत आणि दोन विजयांसह त्यांचे 4 गुण आहेत. तथापि, नेट रनरेटच्या आधारे, भारत (+4.793) पाकिस्तानपेक्षा (+1.790) पुढे आहे. तर भारताचा आणखी एक साखळी सामना शिल्लक आहे. 19 सप्टेंबर रोजी भारत आणि ओमान यांच्यात सामना रंगणार आहे. 

ग्रुप-ब चे समीकरण-

श्रीलंकेने दोन साखळी सामने खेळले असून दोन्ही सामन्यात श्रीलंकने विजय मिळवला आहे. श्रीलंकेच सध्या 4 गुण आहेत. तर बांगलादेशने 3 सामने खेळले असून यामध्ये दोन सामन्यात विजय मिळवला. त्यामुळे बांगलादेशचेही 4 गुण आहेत. अफगाणिस्तानने दोन सामन्यांपैकी एक सामना जिंकला आणि एक सामना गमावला. सध्या अफगाणिस्तानचे 2 गुण असून तिसऱ्या स्थानावर कायम आहेत. आज अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यात शेवटचा साखळी सामना रंगणार आहे. या सामन्यात जो संघ विजयी होईल, तो संघ सुपर-4 मध्ये क्वालिफाय होईल. 

आशिया कप 2025 मध्ये सुपर फोरमध्ये पोहोचणारे संघ (दिनांक 17 सप्टेंबरपर्यंत)

1.भारत
2.पाकिस्तान

आशिया कप 2025 मधून बाहेर पडलेले संघ (दिनांक 17 सप्टेंबरपर्यंत)

1. ओमान
2. युएई
3. हाँगकाँग

संबंधित बातमी:

Asia Cup 2025 Ind vs Pak Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादवला दंड ठोठवा अन्...; यूएईविरुद्ध सामना खेळण्याआधी पाकिस्तानने ठेवल्या 2 डिमांड, काय काय घडलं?

Asia Cup 2025: आमची माफी मागितली..., पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा दावा; बहिष्काराचा निर्णय मागे घेण्याचं सांगितलं कारण

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा

व्हिडीओ

Nawab Malik PC BMC Election : नवाब मलिक 3 वर्षांनी मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर UNCUT PC
Parbhani Election : परभणी शहरातील एकनाथ नगरवासीयांनी टाकला मतदानावर बहिष्कार
Ravi Landge Nagarsevak : दबाव, अर्थकारण अन् डावपेच? दोन वेळा बिनविरोध; रवी लांडगेंनी सगळं सांगितलं?
Sanjay Raut VS Rahul Narvekar : अध्यक्ष प्रचारात, राजकारण जोमात; राऊतांचे राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप Special Report
Nashik Sudhakar Badgujar : एबी फॉर्मची मारामार बडगुजरांनी लाटले चार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
Ajit Pawar : मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
आम्ही महायुतीसोबच, पण..; रामदास आठवलेंचं बंड झालं थंड; देवेंद्र फडणवीसांकडून मिळाला शब्द
आम्ही महायुतीसोबच, पण..; रामदास आठवलेंचं बंड झालं थंड; देवेंद्र फडणवीसांकडून मिळाला शब्द
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे-पवारांच्या युतीला दे धक्का; उमेदवाराने परस्पर अर्ज माघारी घेतला; निवडणुकांपूर्वीच 1 जागा झाली कमी
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे-पवारांच्या युतीला दे धक्का; उमेदवाराने परस्पर अर्ज माघारी घेतला; निवडणुकांपूर्वीच 1 जागा झाली कमी
साडेतीन वर्षांनी नवाब मलिक मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर, म्हणाले, काहींनी बोंबाबोंब केली, तरी अजितदादा माझ्या पाठिशी उभे राहिले! निवडणूक आयोगाच्या कारभारावर सडकून प्रहार
साडेतीन वर्षांनी नवाब मलिक मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर, म्हणाले, काहींनी बोंबाबोंब केली, तरी अजितदादा माझ्या पाठिशी उभे राहिले! निवडणूक आयोगाच्या कारभारावर सडकून प्रहार
Embed widget