एक्स्प्लोर

Asia Cup 2025 : संजू सॅमसन की जितेश शर्मा, प्लेईंग 11 मध्ये कोण? आशिया चषकात भारताची UAE विरुद्ध लढाई

Asia Cup 2025 India vs UAE : भारताच्या प्लेईंग 11 बद्दल सर्वांना उत्सुकता आहे. संजू सॅमसन खेळणार की टीम इंडिया जितेश शर्माला संधी देणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Asia Cup 2025 India vs UAE : आशिया चषक स्पर्धा 2025 मध्ये आज भारत आपला पहिला सामना संयुक्त अरब अमिरात (UAE) विरुद्ध  खेळणार आहे. दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात भारताची धुरा सूर्यकुमार यादवकडे आहे. आशिया चषकाला काल अफगाणिस्तान विरुद्ध हाँगकाँग सामन्याने सुरुवात झाली. अफगाणिस्तानने विजय मिळवून स्पर्धेला जल्लोषात सुरुवात केली. आता आज भारतही विजयी सलामी देऊन आगेकूच करण्याच्या तयारीत आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ कोणत्या 11 खेळाडूंसह मैदानात उतरणार याची उत्सुकता आहे. कारण शुभमन गिलच्या एन्ट्रीने सलामीवर संजू सॅमसनचं स्थान धोक्यात आलं आहे. पण संजूची आम्ही योग्य खबरदारी घेऊ असं सूर्यकुमार यादवने सांगितलं होतं. त्यामुळे विकेटकीपर कोण, सलामीला कोण, तिसऱ्या नंबरवर कोण, फिरकीपटू किती, वेगवान गोलंदाज किती असे अनेक प्रश्न आहेत. भारत आजचा सामना केवळ सराव सामना म्हणून पाहिल कारण टीम इंडियाची खरी कसोटी पाकिस्तानविरुद्ध 14 तारखेच्या सामन्यात लागणार आहे. 

भारत-यूएई सामने  

आंतरराष्ट्रीय टी 20 स्पर्धेत भारत आणि यूएई संघ एकदाच आमने सामने आले आहेत. आशिया चषकात 2016 मध्ये झालेल्या या सामन्यात भारताने 9 विकेट्स राखून विजय मिळवला होता. दुसरीकडे दोन्ही संघात तीन वन डे सामने झाले. या तिन्ही सामन्यात भारताने विजय मिळवला होता. 

दुबईची खेळपट्टी

दुबईची खेळपट्टी चकीत करणारी आहे. कारण फलंदाज आणि गोलंदाज दोघांसाठी संतुलित आहे. यावेळी खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना साथ देणारी ठरू शकते. त्यामुळे बुमराहसोबत आणखी एक स्पेशालिस्ट वेगवान गोलंदाज भारतीय टीम खेळवू शकते. 

 संजू सॅमसन की जितेश शर्मा?  

भारताच्या प्लेईंग 11 बद्दल सर्वांना उत्सुकता आहे. संजू सॅमसन खेळणार की टीम इंडिया जितेश शर्माला संधी देणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. संजू सॅमसन हा आतापर्यंत अभिषेक शर्माच्या साथीने सलामीला उतरत होता. मात्र आता शुभमन गिलच्या समावेशाने संजूची जागा डळमळीत झाली आहे. शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा डावाची सुरुवात करु शकतात. त्यामुळे जितेश शर्माला फिनिशर म्हणून संघात स्थान मिळू शकतं. 

नंबर 8 वर कोण? 

टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये जसे सलामीला  शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा येईल. अशा परिस्थितीत, तिसरे स्थान कायम आहे परंतु तिलक वर्माने या स्थानावर खूप चांगली कामगिरी केली आहे. ज्यामुळे तो टी-२० जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. कर्णधार सूर्यकुमार यादव तिसऱ्या किंवा चौथ्या स्थानावर फलंदाजीसाठी येऊ शकतो. यानंतर अष्टपैलू खेळाडूंची संख्या येते ज्यामध्ये हार्दिक पंड्या महत्त्वाचा आहे. शिवाय शुभम दुबेचा नंबर लागू शकतो. कारण शुभम दुबे हा गोलंदाजीचा पर्याय आहे, शिवाय संथ खेळपट्टीवर मोठे फटके मारुन तगडा फिनिशरची भूमिका बजावू शकतो. यानंतर मग अक्षर पटेल आणि विकेटकीपर फलंदाज म्हणून जितेश शर्मा अशी भारताची दीर्घ आणि भक्कम फलंदाजी क्रम दिसू शकतो. 

भारताची संभाव्य प्लेईंग इलेव्हन

अभिषेक शर्मा, शुभमन गिल, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, अक्षर पटेल, हार्दिक पांड्या, जितेश शर्मा, हर्षित राणा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्ती.

 आशिया चषकासाठी भारतीय संघ (Asia Cup Team India)

फलंदाज : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, रिंकू सिंग.
अष्टपैलू : हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल.
यष्टिरक्षक : संजू सॅमसन, जितेश शर्मा.
गोलंदाज : जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव, हर्षित राणा.

आशिया कपमधील भारताचे वेळापत्रक (Asia Cup time table India)

10 सप्टेंबर - विरुद्ध यूएई (दुबई)
14 सप्टेंबर - विरुद्ध पाकिस्तान (दुबई)
19 सप्टेंबर - विरुद्ध ओमान (अबू धाबी)

आशिया कप 2025 – संपूर्ण वेळापत्रक (ग्रुप स्टेज) (Asia Cup 2025 Full Schedule)

9 सप्टेंबर – अफगाणिस्तान विरुद्ध हाँगकाँग
10 सप्टेंबर – भारत विरुद्ध यूएई
11 सप्टेंबर – बांगलादेश विरुद्ध हाँगकाँग
12 सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध ओमान
13 सप्टेंबर – बांगलादेश विरुद्ध श्रीलंका
14 सप्टेंबर – भारत विरुद्ध पाकिस्तान 
15 सप्टेंबर – यूएई विरुद्ध ओमान
15 सप्टेंबर – श्रीलंका विरुद्ध हाँगकाँग
16 सप्टेंबर – बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान
17 सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध यूएई
18 सप्टेंबर – श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान
19 सप्टेंबर – भारत विरुद्ध ओमान

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Bangar : निवडणूक आयोगानं संतोष बांगर यांची आमदारकी रद्द करावी, आयोगानं कारवाई करावी, ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखाची मागणी
निवडणूक आयोग जिवंत असेल तर आमदार संतोष बांगर यांच्यावर कारवाई करेल, ठाकरेंची शिवसेना आक्रमक
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 डिसेंबर 2025 | मंगळवार
8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, राज्यसभेत पेन्शनवर प्रश्न, केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण
आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, राज्यसभेत पेन्शनवर प्रश्न, केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण
Nashik Nagarparishad Election: नाशिक जिल्ह्यात मतदानादरम्यान जोरदार राडा; मनमाडमध्ये भाजप, शिंदे गटाचे समर्थक भिडले, त्र्यंबकमध्ये पोलीस अन् उमेदवार प्रतिनिधींची बाचाबाची
नाशिक जिल्ह्यात मतदानादरम्यान जोरदार राडा; मनमाडमध्ये भाजप, शिंदे गटाचे समर्थक भिडले, त्र्यंबकमध्ये पोलीस अन् उमेदवार प्रतिनिधींची बाचाबाची
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Santosh Banger Hingoli : बांगरांचा कारनामा, बातमीनंतर गुन्हा Special Report
Nagar Panchayat, Nagar Parishad Election : चांदा ते बांदा; जिल्ह्यात कुठे कुठे राडा? Special Report
Maharashtra Local Body Election Result :निवडणुकांच्या निकालाचा नवा' कायदेशीर मुहूर्त' Special Report
Zero Hour Full : आधी निवडणुका, आता निकालही पुढे ढकललं, राजकीय आरोप-प्रत्यारोप
Nagar Panchayat Nagar Parishad Election : राडा, पैसा आणि मतदान; तुमच्या जिल्ह्यात कुठे कुठे राडा?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Bangar : निवडणूक आयोगानं संतोष बांगर यांची आमदारकी रद्द करावी, आयोगानं कारवाई करावी, ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखाची मागणी
निवडणूक आयोग जिवंत असेल तर आमदार संतोष बांगर यांच्यावर कारवाई करेल, ठाकरेंची शिवसेना आक्रमक
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 डिसेंबर 2025 | मंगळवार
8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, राज्यसभेत पेन्शनवर प्रश्न, केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण
आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, राज्यसभेत पेन्शनवर प्रश्न, केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण
Nashik Nagarparishad Election: नाशिक जिल्ह्यात मतदानादरम्यान जोरदार राडा; मनमाडमध्ये भाजप, शिंदे गटाचे समर्थक भिडले, त्र्यंबकमध्ये पोलीस अन् उमेदवार प्रतिनिधींची बाचाबाची
नाशिक जिल्ह्यात मतदानादरम्यान जोरदार राडा; मनमाडमध्ये भाजप, शिंदे गटाचे समर्थक भिडले, त्र्यंबकमध्ये पोलीस अन् उमेदवार प्रतिनिधींची बाचाबाची
Nilesh Rane: निवडणूक आयोगाला देखील कोर्टात खेचणार, अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर निलेश राणेंचा मोठा निर्णय; म्हणाले,  'ज्यांचा हातभार असेल त्यांच्यावर मी...'
निवडणूक आयोगाला देखील कोर्टात खेचणार, अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर निलेश राणेंचा मोठा निर्णय; म्हणाले, 'ज्यांचा हातभार असेल त्यांच्यावर मी...'
Hardik Pandya :  हार्दिक पांड्याकडून व्याजासह परतफेड, 7 चौकार, 4 षटकारांसह नाबाद 77 धावा,  बडोद्याचा पंजाबवर दणदणीत विजय
हार्दिक पांड्याकडून व्याजासह परतफेड, 7 चौकार, 4 षटकारांसह नाबाद 77 धावा,  बडोद्याचा पंजाबवर दणदणीत विजय
Gold Silver Rate : 2025 मध्ये सोने चांदीचे गुंतवणूकदार मालामाल, चांदी 2 लाखांचा टप्पा पार करण्याची शक्यता, सोन्याचे आजचे दर जाणून घ्या
2025 मध्ये सोने चांदीचे गुंतवणूकदार मालामाल, चांदी 2 लाखांचा टप्पा पार करण्याची शक्यता, सोन्याचे दर जाणून घ्या
Nagar Parishad and nagar panchayat Election: पुणे जिल्ह्यात दुपारी दिड वाजेपर्यंत 35.69 टक्के मतदान; जास्त टक्केवारी वडगावमध्ये तर सर्वांत कमी दौंडमध्ये
पुणे जिल्ह्यात दुपारी दिड वाजेपर्यंत 35.69 टक्के मतदान; जास्त टक्केवारी वडगावमध्ये तर सर्वांत कमी दौंडमध्ये
Embed widget