Ind vs Pak Asia Cup 2025 Full Schedule : 14 सप्टेंबर 2025 ही तारीख लक्षात ठेवा! आशिया कपच्या मैदानात भारत-पाकिस्तान युद्ध, पाहा संपूर्ण वेळापत्रक
Asia Cup 2025 Full Schedule News : कधीपासून वाट पाहत होतो, अखेर आशिया कप 2025 चं संपूर्ण वेळापत्रक जाहीर!

Asia Cup 2025 Full Schedule Update : काही दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आणि अनेक चर्चांनंतर अखेर आशिया कप 2025 चं संपूर्ण वेळापत्रक समोर आलं आहे. आशियाई क्रिकेट परिषदेनं शनिवारी, 26 जुलै रोजी या 8 संघांच्या स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं. आशिया कपची सुरुवात 9 सप्टेंबरपासून होणार असून अंतिम सामना 28 सप्टेंबरला रंगणार आहे. ही संपूर्ण स्पर्धा बीसीसीआयच्या यजमानपदाखाली संयुक्त अरब अमिराती (UAE)मध्ये आयोजित होणार आहे. टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या पार्श्वभूमीवर यंदा आशिया कप टी-20 फॉरमॅटमध्ये खेळवला जाणार आहे. यामध्ये अंतिम सामन्यासह एकूण 18 सामने खेळवले जातील.
The ACC Men's T20I Asia Cup 2025 is set for an expanded showpiece in the UAE! 🤩
— AsianCricketCouncil (@ACCMedia1) July 26, 2025
Read more: https://t.co/GE63vDfqNN #ACCMensAsiaCup2025 #ACC pic.twitter.com/GDylqj9ev1
गट रचना कशी आहे?
या वर्षी 8 संघांमध्ये स्पर्धा होणार आहे आणि त्यानुसार 2 गट तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक संघ गटातील उर्वरित तिन्ही संघांविरुद्ध एक-एक सामना खेळेल. त्यानंतर प्रत्येक गटातील टॉप 2 संघ सुपर-4 राऊंडमध्ये प्रवेश करतील. तिथं प्रत्येक संघ बाकी 3 संघांविरुद्ध एक सामना खेळेल. या फेरीत टॉप 2 संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील.
- ग्रुप A : भारत, पाकिस्तान, यूएई आणि ओमान
- ग्रुप B : श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि हाँगकाँग
आशिया कप 2025 – संपूर्ण वेळापत्रक (ग्रुप स्टेज)
- 9 सप्टेंबर – अफगाणिस्तान विरुद्ध हाँगकाँग
- 10 सप्टेंबर – भारत विरुद्ध यूएई
- 11 सप्टेंबर – बांगलादेश विरुद्ध हाँगकाँग
- 12 सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध ओमान
- 13 सप्टेंबर – बांगलादेश विरुद्ध श्रीलंका
- 14 सप्टेंबर – भारत विरुद्ध पाकिस्तान
- 15 सप्टेंबर – यूएई विरुद्ध ओमान
- 15 सप्टेंबर – श्रीलंका विरुद्ध हाँगकाँग
- 16 सप्टेंबर – बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान
- 17 सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध यूएई
- 18 सप्टेंबर – श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान
- 19 सप्टेंबर – भारत विरुद्ध ओमान
सुपर-4 आणि अंतिम सामना
- 20 सप्टेंबर – बी1 विरुद्ध बी2
- 21 सप्टेंबर – ए1 विरुद्ध ए2
- 23 सप्टेंबर – ए2 विरुद्ध बी1
- 24 सप्टेंबर – ए1 विरुद्ध बी2
- 25 सप्टेंबर – ए2 विरुद्ध बी2
- 26 सप्टेंबर – ए1 विरुद्ध बी1
- 28 सप्टेंबर – अंतिम सामना
आशिया कपमध्ये भारताचे सामने
आशिया कप 2025 मध्ये, भारतीय संघ युएई विरुद्ध पहिला सामना खेळेल. दुसरा सामना पाकिस्तान विरुद्ध आणि टीम इंडियाचा गट टप्प्यातील शेवटचा सामना ओमान विरुद्ध असणार आहे. भारत हा आशिया कपचा गतविजेता आहे, ज्याने 2023 च्या अंतिम सामन्यात श्रीलंकेचा 10 गडी राखून पराभव केला होता.
- 10 सप्टेंबर – भारत विरुद्ध यूएई
- 14 सप्टेंबर – भारत विरुद्ध पाकिस्तान
- 19 सप्टेंबर – भारत विरुद्ध ओमान
हे ही वाचा -





















