Asia Cup 2023 : आशिया चषकात भारतासाठी तीन खेळाडू ठरतील गेमचेंजर, जाणून घ्या सविस्तर
Asia Cup 2023, Indian Team : आशिया चषकाला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. आशिय चषक म्हणजे विश्वचषकाची रंगीत तालीम होय.
Asia Cup 2023, Indian Team : आशिया चषकाला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. आशिय चषक म्हणजे विश्वचषकाची रंगीत तालीम होय. विश्वचषकाच्या तयारासाठी आशिया चषक अखेरची मोठी संधी असेल. त्यामुळे भारतीय संघ संपूर्ण ताकदीने मैदानात उतरणार आहे. दोन सप्टेंबर रोजी टीम इंडियाला पाकिस्तानविरुद्धही खेळण्याची संधी मिळणार आहे. आशिया चषक स्पर्धेसाठी भारताचा 17 सदस्यीय संघही जाहीर करण्यात आला आहे. काही खेळाडूंचे संघात पुनरागमन पाहायला मिळाले आहे, तर सर्वांच्या नजरा कोणत्या तरी कामगिरीकडे लागल्या आहेत.
आगामी वनडे वर्ल्ड कपला डोळ्यासमोर ठेवून यावेळी आशिया चषक स्पर्धा 50 षटकांच्या फॉरमॅटमध्ये खेळवली जात आहे. 2018 मध्ये, जेव्हा ही स्पर्धा शेवटच्या वेळी एकदिवसीय स्वरूपात खेळली गेली, तेव्हा भारतीय संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली विजेतेपद पटकावले होते. आता पुन्हा एकदा टीम इंडियाला आशिया चषक जिंकण्याचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. आशिया चषक स्पर्धा प्रथमच हायब्रीड मॉडेलनुसार खेळवली जात आहे, ज्यामध्ये पाकिस्तानमध्ये 4 सामने तर श्रीलंकेत 9 सामने खेळवले जाणार आहेत. भारताचे सर्व सामने श्रीलंकामध्ये होत आहेत. आशिया चषकात भारताचे तीन खेळाडू गेमचेंजर असलीत, त्यांच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. पाहूयात...
1 – रोहित शर्मा
भारताचा कर्णधार रोहित शर्मा सध्या भन्नाट फॉर्मात आहे. आशिया चषकात रोहितची बॅट धावांचा पाऊस पाडता दिसते. 2008 साली पहिल्यांदा या स्पर्धेत खेळला. रोहित 50 षटकांच्या फॉरमॅटमध्ये या स्पर्धेत भारतासाठी सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत सचिन तेंडुलकरनंतर दुसऱ्या स्थानावर आहे. रोहितने 22 सामन्यात 46.56 च्या सरासरीने 745 धावा केल्या आहेत. रोहितने वनडे आशिया चषक स्पर्धेत 1 शतक आणि 6 अर्धशतके ठोकली आहेत.
2 – विराट कोहली
रनमशीन विराट कोहली पुन्हा एकदा फॉर्मात परतलाय. आशिय चषकात विराट कोहलीचा रेकॉर्ड जबरदस्त आहे. त्याशिवाय मोठ्या स्पर्धेत विराट कोहलीच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडतो. 2010 मध्ये विराट कोहली पहिल्यांदा आशिया चषकात खेळला होता. 50 षटकांच्या फॉर्मेटमध्ये आतापर्यंत 11 सामन्यात विराट कोहलीने 61.30 च्या सरासरीने 613 धावा चोपल्या आहेत. यामध्ये तीन शतके आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे.
3 – जसप्रीत बुमराह
दुखापतीनंतर जसप्रीत बुमराहचे टीम इंडियात कमबॅक झाले. तब्बल एक वर्षभरानंतर जसप्रीत मैदानात परतलाय. आयर्लंडविरोधात त्याने धारधार गोलंदाजी केली. आता आशिया चषकातील त्याच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा असतील. आशिया चषकात बुमराह मॅचविन गोलंदाज म्हणून खेळताना दिसणार आहे. जसप्रीत बुमराहने आशिया कपच्या वनडे फॉरमॅटमध्ये आतापर्यंत फक्त 4 सामन्यात आठ विकेट घेतल्या आहेत.