(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Asia Cup Schedule : प्रतीक्षा संपणार! आशिया चषकाचे वेळापत्रक शुक्रवारी जारी होण्याची शक्यता
Asia Cup 2023 Schedule : आशिया चषक 2023 च्या तारखा आणि ठिकाणांची घोषणा होऊन महिनाभर झाला, पण स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झालेले नाही.
Asia Cup 2023 Schedule : आशिया चषक 2023 च्या तारखा आणि ठिकाणांची घोषणा होऊन महिनाभर झाला, पण स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झालेले नाही. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यामुळे वेळापत्रकाला उशीर होत असल्याचे समोर आले आहे. बीसीसीआय आणि पीसीबी यांच्या सहमतीने आशिया चषक हायब्रिड मॉडेलनुसार खेळवण्यात येणार आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, शुक्रवारी 14 जुलै रोजी आशिया चषकाचे वेळापत्रक जारी होण्याची शक्यता आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना दंबुला अथवा कोलंबो या ठिकाणी होणार आहे. अद्याप यावर शिक्कामोर्तब झालेले नाही, त्यामुळेच आशिया चषकाच्या वेळापत्रकाला उशीर होत आहे. शुक्रवारी सविस्तर वेळापत्रक जाहीर होण्यास शक्यता आहे.
बीसीसीआय सचिव जय शाह आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष जाका अशरफ डरबन यांच्यामध्ये नुकतीच भेट झाली. या भेटीमध्ये आशिया चषक आणि विश्वचषकासंदर्भात चर्चा झाल्याचे समजतेय. आशिया चषकासाठी हायब्रिड मॉडेल असणार आहे. भारताचे सर्व सामने श्रीलंकामध्ये खेळवण्यात येणार आहेत. श्रीलंकामध्ये आशिया चषकाचे 9 सामने होणार आहे तर चार सामने पाकिस्तानमध्ये होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना कधी होणार? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आशिय चषकाचे वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे. आशियन क्रिकेट काऊन्सिल शुक्रवारी आशिया चषकाचे वेळापत्रक जारी करणार असल्याचे समोर आलेय. 31 ऑगस्ट 2023 ते 17 सप्टेंबर 2023 यादरम्यान आशिया चषक रंगणार आहे. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्थान आणि नेपाळ या देशांमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. 13 एकदिवसीय सामन्यानंतर आशियाचा किंग कोण ? यावरुन पडदा उठणार आहे.
JAY SHAH WILL VISIT PAKISTAN DURING THE ASIA CUP 🔥
— Farid Khan (@_FaridKhan) July 11, 2023
Chairman PCB management committee Zaka Ashraf met BCCI secretary Jay Shah in Durban, South Africa earlier today and invited him to visit Pakistan for the Asia Cup. Jay Shah accepted the invitation and in return invited Zaka… pic.twitter.com/rZGHGGTe5I
कुठे पाहाता येणार सामने?
31 ऑगस्टपासून आशिया चषकाला सुरुवात होणार आहे. पाकिस्तान आणि श्रीलंकामध्ये आशिया चषक रंगणार आहे. भारतीय चाहत्यांसाठी आशिया चषकाचे लाईव्ह स्ट्रिमिंग हॉटस्टारवर पाहाता येतील. त्याशिवाय स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर लाईव्ह सामने पाहाता येणार आहे. त्याशिवाय एबीपी माझ्याच्या संकेतस्थळावरही आशिया चषकासंदर्भातील अपडेट तुम्हाला पाहाता येतील. आशिया चषकासाठी हायब्रिड मॉडेल वापरण्यात आलेय. पाकिस्तानमध्ये चार सामने होणार आहेत. तर उर्वरित सर्व सामने श्रीलंकामध्ये खेळवण्यात येणार आहेत. हायब्रिड मॉडेलचा स्विकार केल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये जाणार नाही? हे स्पष्ट झालेय. टीम इंडियाचे सर्व सामने श्रीलंकामध्ये खेळवण्यात येणार आहेत. लवकरच आशिया चषक वेळापत्रकाची घोषणा होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील थरारक सामना श्रीलंकामध्ये होणार आहे.
आणखी वाचा :
Asia Cup 2022 : भारत पाकिस्तानवर कायमच वरचढ, आशिया कपमधील सर्व सामन्याचे निकाल एका क्लिकवर
Asia Cup 2023 : आशिया चषकात टीम इंडिया सर्वात यशस्वी संघ, पाकिस्तानला फक्त दोन वेळा जेतेपद
IND vs PAK : मौका... मौका... आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान महासंग्राम तीन वेळा होणार ?