Asia Cup 2023 : रविंद्र जाडेजाचा मोठा विक्रम, कपिल देवच्या पंक्तीत मिळवले स्थान
Ravindra Jadeja 200 ODI Wickets : भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजा याने आशिया चषकात मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

Ravindra Jadeja 200 ODI Wickets : भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजा याने आशिया चषकात मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. रविंद्र जाडेजाने वनडेमध्ये दोनशे विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. वनडे क्रिकेटमध्ये २०० विकेट आणि दोन हजार धावा करणारा रविंद्र जाडेजा दुसरा भारतीय खेळाडू ठरलाय. जाडेजाच्या आधी माजी कर्णधार कपिल देव याने हा विक्रम केलाय.
आशिया चषकात बांगलादेशविरोधात गोलंदाजी करतान शमीम हुसैन याला बाद करत रविंद्र जाडेजा याने वनडे क्रिकेटमध्ये दोनशे विकेट घेण्याचा विक्रम केला आहे. रविंद्र जाडेजा २०० विकेट घेणारा पहिला भारतीय डावखुरा फिरकी गोलंदाज झालाय. भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणारा फिरकी गोलंदाजीचा विक्रम अनिल कुंबळेच्या नावावर आहे. अनिल कुंबळेच्या नावावर वनडे क्रिकेटमध्ये 334 विकेट आहेत. दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या हरभजन सिंह याच्या नावावर 265 विकेट आहेत. रविंद्र जाडेजा आता तिसऱ्या क्रमांकावर पोहचलाय.
Ravindra Jadeja became the 2nd Indian after Kapil Dev to have 2000 runs & 200 wickets in ODI.
— Johns. (@CricCrazyJohns) September 15, 2023
- Jadeja created history....!!!!!! pic.twitter.com/GUVFGIkTlF
शाकीब अल हसन आणि तौहीद ह्रदय यांच्या जिगरबाज फलंदाजीच्या जोरावर बांगलादेशने २६५ धावसंख्येपर्यंत मजल मारली. खराब सुरुवातीनंतरही बांगलादेश संघाने निर्धारित ५० षटकात आठ विकेटच्या मोबदल्यात २६५ धावांपर्यंत मजल मारली. शाकीब अल हसन याने ८० तर तौहीद ह्रदय याने ५४ धावांची खेळी केली. भारताकडून शार्दूल ठाकूर याने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. भारतीय संघाला विजयासाठी २६६ धावांचे आव्हान आहे. गोलंदाजी शार्दूल ठाकूर सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. शार्दूल ठाकूर याने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. तर मोहम्मद शामी याने दोन फलंदाजांना तंबूत धाडले. पदार्पण करणाऱ्या प्रसिद्ध कृष्णा याला एक विकेट मिळाली. अक्षर पटेल आणि रविंद्र जाडेजा यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
