IND Vs NEP Live Score : भारताचा नेपाळवर 10 विकेटने विजय, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर
Asia Cup 2023 Live : भारतासाठी आज करो आणि मरो असा सामना आहे. नेपळाविरोधात सामना भारताला कोणत्याही स्थितीत जिंकावाच लागेल..
LIVE
Background
Asia Cup 2023, IND Vs NEP Live Updates : भारतीय संघ आशिया चषकातील आपला दुसरा सामना आज नेपाळविरोधात खेळत आहे. पाकिस्तानविरोधात झालेला पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी भारताला विजय अनिवार्य झाला आहे. नेपाळच्या संघाने पाकिस्तानच्या संघाला सुरुवाता चांगलेच झुंजवले होते. त्यामुळे रोहित अॅण्ड कंपनी नेपाळला हलक्यात घेणार नाही. पाकिस्तानविरोधात भारतीय संघाची फलंदाजी ढेपाळली होती. रोहित शर्मा, विराट कोहली, गिल आणि अय्यर यांना लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नव्हती. त्याशिवाय रविंद्र जाडेजा आणि शार्दुल ठाकूरही प्रभावी कामगिरी करु शकले नव्हते. आजच्या सामन्यात भारतीय संघ कशी कामगिरी करतो, त्यावर स्पर्धेतील आव्हान ठरणार आहे.
भारताला झटका, बुमराह नेपाळविरोधात अनुपलब्ध
दरम्यान, या सामन्याच्या आधी भारताला मोठ झटका बसला आहे. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा नेपाळविरुद्धच्या सामान्यात खेळू शकणार नाही. तो स्पर्धेच्या मध्यातूनच मायदेशात परतला आहे. जसप्रीस बुमराह बाबा बनला आहे. त्याची पत्नी संजना गणेशनने मुलाला जन्म दिला आहे. त्यामुळेच बुमराह भारतात परत आला असल्याचं समजतं. तत्पूर्वी बुमराहच्या जागी मोहम्मद शमीला प्लेईंग 11 मध्ये जागा मिळाली आहे.
आशिया चषकात एकूण सहा संघ सहभागी झाले आहेत आणि ते दोन ग्रुपमध्ये विभागले आहेत. पुढील फेरीत दोन्ही ग्रुपमधून प्रत्येकी दोन संघांनाच जागा मिळणार आहे. भारताकडे सध्या एक गुण आहे. तर पाकिस्तान तीन गुणांसह पुढील फेरीत दाखल झाला आहे. तर भारताविरुद्धचा आजचा सामना नेपाळने जिंकला तर संघाच्या खात्यात दोन गुण जमा होतील आणि पुढील फेरीत प्रवेश मिळवेल. अशा परिस्थितीत भारतीय संघ आशिया चषकातून बाहेर पडेल. मात्र नेपाळसारख्या कमकुवत संघाला भारतीय संघ सहजरित्या पराभूत करेल, अशी अपेक्षा आहे.
भारताने नाणेफेक जिंकली -
भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानविरोधात प्रथम फलंदाजी केल्यामुळे दुसऱ्या वनडे सामन्यात गोलंदाजीचा निर्णय घेतल्याचे राहित शर्माने नाणेफेकीवेळी सांगितले. पाकिस्तानविरोधात इशान किशन आणि हार्दिक पांड्या यांनी दमदार फलंदाजी केली, असे म्हणत रोहित शर्मा याने कौतुक केले. भारतीय संघात एक बदल करण्यात आला आहे. जसप्रीत बुमराह कौटंबिक कारणामुळे मायदेशात परतला आहे. त्यामुळे जसप्रीत बुमराह आजच्या सामन्यासाठी उपलब्ध नसेल. दरम्यान, नेपाळचा कर्णधार रोहित यानेही प्रथम गोलंदाजी करण्याची इच्छा असल्याचे नाणेफेक गमावल्यानंतर सांगितले. त्याशिवाय नेपाळसाठी आजचा दिवस सर्वात मोठा असल्याचेही सांगितले. नेपाळच्या संघातही एक बदल करण्यात आला आहे.
नेपाळवर 10 विकेटने विजय, रोहित-गिलची दमदार अर्धशतके, भारताचा सुपर 4 मध्ये प्रवेश
रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांच्या वादळी अर्धशतकाच्या बळावर भारताने नेपाळचा दहा विकेटने पराभव केला. या विजयासह भारताने आशिया चषकाच्या सुपर 4 फेरीत प्रवेश केला आहे. पावसाने प्रभावित झालेल्या सामन्यात डकवर्थ लुईस नियमांनुसार भारताला विजयासाठी 23 षटकात 145 धावांचे आव्हान दिले होते. भारताने हे आव्हान सहज पार केले. भारताने 20.1 षटकात 147 धावांपर्यंत मजल मारली.रोहित शर्माने नाबाद 74 तर शुभमन गिल याने नाबाद 67 धावांची खेळी केली.
भारताचा विजय दृष्टीक्षेपात
भारताचा विजय दृष्टीक्षेपात.... विजयासाठी 10 धावांची गरज
रोहित शर्माचा रेकॉर्ड
Rohit Sharma completed his 250th six with an outrageous shot.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 4, 2023
One of the best six hitters in history! pic.twitter.com/uWLgZRtGhB
रोहितपाठोपाठ गिलचेही अर्धशतक
रोहितपाठोपाठ गिलचेही अर्धशतक.... 47 चेंडूत ठोकले अर्धशतक
रोहित शर्माचे अर्धशतक
रोहित शर्माने 39 चेंडूत अर्धशतक ठोकले... भारत बिनबाद 96 धावा