IND Vs BAN Live Score : भारत आणि बांगलादेशमध्ये लढत, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

IND Vs BAN Live :

एबीपी माझा ब्युरो Last Updated: 15 Sep 2023 11:04 PM
भारताचा पराभव

मोहम्मद शामी धावबाद झाला... भारताचा सहा धावांनी पराभव

दोन चेंडूत ८

दोन चेंडूत ८ धावांची गरज... तिसऱ्या चेंडूवर शामीने चौकार मारला

तीन बॉल १२

तीन बॉल १२

पाच चेंडूत १२ धावांची गरज

पाच चेंडूत १२ धावांची गरज आहे. अखेरच्या षटकातील पहिला चेंडू शामीने निर्धाव खेळला

सहा चेंडूत १२ धावांची गरज

सहा चेंडूत १२ धावांची गरज

अक्षर पटेल बाद

भारताला नववा धक्का... अक्षर पटेल ४२ धावांवर बाद

भारताला आठवा धक्का

मोक्याच्या क्षणी भारताला आठवा धक्का बसला आहे. शार्दूल ठाकूर ११ धावांवर बाद झालाय. भारताला विजयासाठी ११ चेंडूत १७ धावांची गरज

१२ चेंडूत १७ धावांची गरज

१२ चेंडूत १७ धावांची गरज आहे. अक्षर पटेल आणि शार्दूल ठाकूर खेळत आहेत.

भारताला मोठा धक्का

मोक्याच्या क्षणी शुभमन गिल बाद झाला...  गिलने १२१ धावांची खेळी केली. 

शुभमन गिलचे दमदार शतक

शुभमन गिलची शतकी खेळी... एका बाजूला विकेट पडत असताना गिल याने शतकाला गवसणी घतली.

भारताला सहावा धक्का

रविंद्र जाडेजाच्या रुपाने भारताला सहावा धक्का बसलाय.  रविंद्र जाडेजा सात धावांवर बाद झालाय.

भारताचे दीडशतक

भारताचे दीडशतक पूर्ण.. गिलची एकाकी झुंज सुरु

भारताचा अर्धा संघ तंबूत

सूर्यकुमार यादव याच्या रुपाने भारताला पाचवा धक्का बसलाय. सूर्यकुमार यादव २६ धावांवर बाद झाला. भारत पाच बाद १३९ धावा

शुभमन गिलची एकाकी झुंज

शुभमन गिल याने एकाकी लढा देत आहे. गिलच्या फलंदाजीच्या बळावर टीम इंडिया १३३ धावसंख्येंपर्यंत पोहचलाय

भारताचे शतक

टीम इंडियाचे फलकावर शतक... गिलची दमदार अर्धशतक

भारताला चौथा धक्का

ईशान किशनच्या रुपाने भारताला चौथा धक्का बसलाय... 

शुभमन गिलचे दमदार अर्धशतक

शुभमन गिल याने एकाकी झुंज दिली आहे. गिल ५४ धावांवर फलंदाजी करत आहे. रोहित, तिलक अन् केएल बाद झाल्यानंतर गिल दमदार फलंदाजी करत आहे.

केएल राहुल बाद

केएल राहुल १९ धावांवर बाद झाला... भारत तीन बाद ८९ धावा

शुभमन गिलची अर्धशतकी खेळी

शुभमन गिलची अर्धशतकी खेळी

भारताला तिसरा धक्का... राहुल बाद

भारताला तिसरा धक्का... राहुल बाद

भारताला तिसरा धक्का

केएल राहुलच्या रुपाने भारताला तिसरा धक्का बसलाय. 

टीम इंडियाचे अर्धशतक

शुभमन गिल आणि केएल राहुल यांनी डाव सांभाळला.. टीम इंडियाचे अर्धशतक

गिल-राहुलने डाव सावरला

दोन विकेट झटपट गेल्यानंतर शुभमन गिल आणि केएल राहुल यांनी टीम इंडियाचा डाव सावरला. शुभमन गिल १६ आणि केएल राहुल दहा धावांवर खेळत आहे. तिसऱ्या विकेटसाठी २१ धावांची भागिदारी झाली आहे. भारतीय संघ २६६ धावांचा पाठलाग करत आहे.

भारताची खराब सुरुवात

२६६ धावसंख्येचा पाठलाग करताना टीम इंडियाची खराब सुरुवात झाली. कर्णधार रोहित शर्मा खातेही न उघडता बाद झाला. तर पदार्पण करणारा तिलक वर्मा याला दुहेरी धावसंख्या ओलांडता आली नाही.  शुभमन गिल आणि केएल राहुल सध्या मैदानावर आहेत. 

भारताला दुसरा धक्का

तिलक वर्माच्या रुपाने भारताला दुसरा धक्का बसलाय.  टीम इंडियाची खराब सुरुवात

भारताला पहिला धक्का

रोहित शर्माच्या रुपाने भारताला पहिला धक्का बसलाय

भारताच्या फलंदाजीला सुरुवात

रोहित शर्मा आणि शुभमन गिल मैदानात आलेत...  २६६ धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी टीम इंडियाचे शिलेदार तयार

भारताला विजयासाठी २६६ धावांचे आव्हान

शाकीब अल हसन आणि तौहीद ह्रदय यांच्या जिगरबाज फलंदाजीच्या जोरावर बांगलादेशने २६५ धावसंख्येपर्यंत मजल मारली. खराब सुरुवातीनंतरही बांगलादेश संघाने निर्धारित ५० षटकात आठ विकेटच्या मोबदल्यात २६५ धावांपर्यंत मजल मारली. शाकीब अल हसन याने ८० तर तौहीद ह्रदय याने ५४ धावांची खेळी केली. भारताकडून शार्दूल ठाकूर याने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. भारतीय संघाला विजयासाठी २६६ धावांचे आव्हान आहे.

बांगलादेशची २६५ धावसंख्येपर्यंत मजल

बांगलादेशने निर्धारित ५० षटकात २६५ धावसंख्येपर्यंत मजल मारली

बांगलादेश २५० पार

बांगलादेश २५० पार... भारताविरोधात बांगलादेशचे दमदार कमबॅक

बांगलादेशला आठवा धक्का

प्रसिद्ध कृष्णाने बांगलादेशला आठवा धक्का दिला. नासूम ४४ धावांवर बाद झाला.

बांगलादेशचं दमदार कमबॅक

खराब सुरुवात झाल्यानंतर बांगलादेश संघाने दमदार कमबॅक केलेय...  कर्णधार शाकीब याने जिगरबाज खेळी केली.

तौहीद ह्रदय याचे अर्धशतकी

बाद होण्यापूर्वी तौहीद ह्रदय याने अर्धशतकी खेळी केली. मोक्याच्या क्षणी कर्णधार शाकीबसोबत डाव सावरला

बांगलादेशला सातवा धक्का

मोहम्मद शामीने बांगलादेशला दिला सातवा धक्का

जडेजाची '200 नंबरी' कामगिरी

एकदिवसीय क्रिकेटमध्ये रवींद्र जडेजाने 200 विकेट्सचा टप्पा गाठला





बांगलादेशचा सहावा गडी बाद

बांगलादेशचा सहावा गडी बाद


जडेजाचा भेदक मारा... शमीम पॅव्हेलिनध्ये माघारी

बांगलादेशला पाचवा धक्का

शार्दूल ठाकूरकडून शाकीब अल हसन क्लीन बोल्ड... 80 धावा करून तंबूत परतला

शाकीब अल हसनचे अर्धशतक

शाकीब अल हसनचे दमदार अर्धशतक..... बांगलादेशचा डाव सावरला

बांगलादेशचे शतक

शाकीब आणि हदय यांच्या दमदार फलंदाजीमुळे बांगलादेशचा डाव सावरलाय. २४ व्या षटकात बांगलादेशचे शतक फलकावर...

तिलक वर्माला लागोपाठ दोन षटकार

तौहिद एच याने तिलक वर्मा याला एकापाठोपाठ एक दोन षटकार ठोकले

शाकीबने डाव सावरला

लागोपाठ चार विकेट पडल्यानंतर शाकीब अल हसन याने डाव सावरला. शाकीब ३० धावांवर खेळत आहे.  बांगलादेश चार बाद ७४ धावा

बांगलादेशला चौथा धक्का

अक्षर पटेलने बांगलादेशला दिला चौथा धक्का... मेहंदी हसन झाला बाद

बांगलादेशचं अर्धशतक

१२ व्या षटकात बांगलादेश संघाने तीन विकेटच्या मोबदल्यात अर्धशतक केले.

शार्दूल ठाकूरचा भेदक मारा
बांगलादेशला तिसरा धक्का बसलाय.  शार्दुलने हक याला बाद केले. 28 धावांवर बांगलादेशची तिसरी विकेट पडली.  
शामी-शार्दूलचा भेदक मारा

मोहम्मद शमी आणि शार्दूल ठाकूर यांनी भेदक मारा करत बांगलादेशला दोन धक्के दिले आहेत. २४ धावांच्या आत बांगलादेशचे दोन गडी तंबूत परतले आहेत.

बांगलादेशची दमदार सुरुवात

बांगलादेशची दमदार सुरुवात.... 

बांगलादेशचे शिलेदार

 



लिटन दास (विकेटकीपर), तांजीद हसन तमीम, अनामुल हक, शाकिब अल हसन (कर्णधार), ताउहिद ह्रदय, शामीम हुसैन, मेहदी हसन मिराज, मेहदी हसन, नसुम अहमद, तांजीम हसन शाकिब, मुस्ताफिजुर रहमान.


बांगलादेशचे फलंदाज मैदानात

मोहम्मद शामीकडे पहिले षटक.. बांगलादेशचे सलामी फलंदाज तयार

टीम इंडियाचे शिलेदार -

 


शुभमन गिल, रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार  यादव, तिलक वर्मा, कएल राहुल, ईशान किशन, रविंद्र जाडेजा, अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज

श्रेयसला स्थान नाहीच - 

विश्वचषकाचा भाग असणाऱ्या श्रेयस अय्यर दुखापतीमुळे मागील दोन्ही सामन्यात उपलब्ध नव्हता. अय्यर याने दुखापतीवर मात केल्याचे वृत्त समोर आले होते. अय्यर याला बांगलादेशविरोधात स्थान मिळू शकते, असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, आजही श्रेयस अय्यर याला प्लेईंग ११ मध्ये स्थान मिळाले नाही.

भारतीय संघात पाच बदल

विराट, हार्दिक, सिराज आणि बुमराहसह कुलदीपला आराम

भारताची प्रथम गोलंदाजी

रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. 

रोहित शर्माने नाणेफेक जिंकली

रोहित शर्माने नाणेफेक जिंकली

सुपर ४ चा अखेरचा सामना

आशिया चषकातील सुपर ४ मधील अखेरच्या सामन्याला सुरुवात होत आहे. 

तिलक वर्माला संधी

भारताच्या प्लेईंग ११ मध्ये तिलक वर्माला संधी मिळाली आहे. नाणेफेकीआधी तिलक वर्मा याला वनडे कॅप देण्यात आली. तिलक वर्मा याचे वनडेमध्ये पदार्पण झालेय. राहुल अथवा इशान किशन यांच्यापैकी एका खेळाडूला आराम देण्यात येणार.. हे निश्चित

थोड्याच वेळात होणार नाणेफेक

भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. अडीच वाजता नाणेफेक होणार आहे.

पार्श्वभूमी

Asia Cup 2023, IND Vs BAN Live Updates :


 भारतीय क्रिकेट संघ (Team India) आशिया कप 2023 च्या (Asia Cup 2023) अंतिम सामन्यात पोहोचणारा पहिला संघ बनला. मंगळवारी (12 सप्टेंबर) रोजी श्रीलंकेला हरवून टीम इंडियानं फायनलचं तिकीट मिळवलं. दरम्यान, फायनलपूर्वी टीम इंडियाला आणखी एक सामना खेळायला लागणार आहे. टीम इंडिया आशिया कपच्या सुपर-4 मधील तिसरा सामना बांगलादेशसोबत खेळणार आहे. तसं पाहायला गेलं तर, बांगलादेशविरुद्धच्या (Bangladesh) सामन्याचा निकाल काहीही लागला तरीदेखील टीम इंडियाचं फायनलमधील स्थान पक्क आहे. अशातच बांगलादेशविरोधातील सामन्यात टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये अनेक मोठे बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. 


बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियातील सिनियर स्टार प्लेयर्सना विश्रांती दिली जाऊ शकते आणि त्यांच्याऐवजी आतापर्यंत एक्स्ट्रामध्ये बसलेल्या खेळाडूंना खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. फलंदाजीपासून गोलंदाजीपर्यंत टीम इंडियामध्ये अनेक बदल पाहायला मिळू शकतात. टीम इंडियाचे बॉलिंग कोच पारस म्हाम्ब्रे यांनीही पत्रकार परिषदेत बोलताना याबाबतचे संकेत दिले होते. त्यामुळे बांगलादेश विरोधात टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये मोठे बदल पाहायला मिळू शकतात. 


कोणत्या बदलांची शक्यता? 


बांगलादेश विरोधातील सामन्यात टीम इंडियाचा स्टार फलंदाज, विकेटकीपर केएल राहुलला विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. केएल राहुलऐवजी सुर्यकुमार यादव खेळताना दिसू शकतो. दुखापतीतून सावरल्यानंतर राहुलनं सलग दोन सामन्यांमध्ये बॅटिंग आणि विकेटकिपिंगची धुरा सांभाळली होती. त्यामुळे फायनसाठी त्याला विश्रांती दिली जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. केएल राहुलच्या अनुपस्थितीत ईशान किशन विकेटकिपींग करताना दिसणार आहे. 


याव्यतिरिक्त स्टार ऑलराउंडर हार्दिक पांड्यालाही आजच्या सामन्यात विश्रांती दिली जाऊ शकते. पांड्याच्या जागी वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाला संधी मिळण्याची शक्यता आहे. कारण श्रीलंकेविरुद्धच्या प्लेईंग इलेव्हनचा भाग असलेला अक्षर पटेलचा बांगलादेश विरुद्धच्या प्लेईंग इलेव्हनमध्येही सहभाग असण्याची शक्यता जास्त आहे.  









बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात टीम इंडिया स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजला आराम दिला जाऊ शकतो. बुमराहच्या ऐवजी मोहम्मद शामी आणि सिराज यांची कमी शार्दुल ठाकूर पूर्ण करू शकतो. अनुभवी पेसर शामीनं आतापर्यंत आशिया चषकात नेपाळ विरुद्धचा एकच सामना खेळला आहे, त्यामुळे आजच्या सामन्यात शामीला संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे. तर श्रीलंकेच्या विरुद्धच्या सामन्यात संघाबाहेर असलेल्या शार्दुल ठाकूरला आणखी एक संधी दिली जाण्याची शक्यता आहे. 


आशिया चषकासाठी टीम इंडियाचे शिलेदार -   


रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, ईशान किशन, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकुर, प्रसिद्ध कृष्णा, तिलक वर्मा. 


आशिया कपसाठी बांगलादेशचा संघ 


शाकिब अल हसन (कर्णधार), मोहम्मद नईम, मेहदी हसन मिराज, लिटन दास (विकेटकीपर), तौहीद हृदॉय, शमीम हुसैन, नसुम अहमद, तस्कीन अहमद, शोरीफुल इस्लाम, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, मेहदी हसन, अनामुल हक, अफीफ हुसैन, तंजीद हसन, तंजीम हसन साकिब. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.