Asia Cup 2023: आशिया चषकातील टीम इंडियाच्या संघनिवडीवर मोठी अपडेट, उद्याच भारतीय संघाची निवड
Asia Cup 2023 : आशिया चषकाला बोटावर मोजण्याइतके दिवस शिल्लक राहिले आहेत.
Updates on Indian team for Asia Cup 2023 : आशिया चषकाला बोटावर मोजण्याइतके दिवस शिल्लक राहिले आहेत. पाकिस्तान आणि बांगलादेश यांनी आशिया चषकासाठी संघाची निवड केली. मात्र अद्याप भारतीय संघाने आपल्या संघाची घोषणा केलेली नाही. पण आता आशिया चषकाच्या संघ निवडीसाठी बीसीसीआयला मुहूर्त मिळाला आहे. 21 ऑगस्ट रोजी आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा होणार आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, सोमवारी दुपारी 12 वाजता आशिया चषकासाठी संघ निवड होणार आहे. संघ निवडीच्या बैठकीला कर्णधार रोहित शर्मा आणि कोच राहुल द्रविड उपस्थित राहणार आहेत. दुपारी 12 वाजता निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा पत्रकार परिषद घेणार आहेत.
भारतीय संघातील काही सिनिअर खेळाडू दुखापतग्रस्त आहेत. त्यामुळे संघ निवडीला उशीर झाल्याचे समजतेय. राहुल आणि श्रेयस अय्यर हे दुखापतीवर मात करत आहेत. बुमराहने आयर्लंडविरोधात कमबॅक केलेय. तसेच, युवा खेळाडू आयर्लंडमध्ये असल्याने काही दिवसांचा अवधी घेत ही संघनिवड लांबणीवर पडली होती. अखेर आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा होणार आहे. 21 ऑगस्ट रोजी भारतीय संघाची निवड करण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केएल राहुल तंदुरुस्त झाला असून आशिया चषकासाठी तयार आहे. त्याशिवाय श्रेयस अय्यर याच्याबाबतही सकारात्मक बातम्या समोर येत आहेत. राहुल आणि अय्यर यांची निवड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जर श्रेयस अय्यर उपलब्ध नसेल तर बीसीसीआय सूर्यकुमार यादव याला संधी देणार आहे. अय्यरच्या अनुपस्थिती गेल्या काही दिवसांपासून सूर्याला भारतीय संघात स्थान दिले जातेय. त्याशिवाय तिलक वर्माच्या निवडीबाबतही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, केएल राहुल तंदुरुस्त असल्याने संजू सॅमसन याचा पत्ता कट होण्याची दाट शक्यता आहे. दुसरा विकेटकिपर म्हणून टीम इंडिया ईशान किशन याचा विचार करत आहे. मागील काही दिवसांपासून ईशान किशन याला वारंवार भारतीय संघात स्थान देण्यात आलेय.
आशिया चषक कधी पासून?
आशिया चषक श्रीलंका आणि पाकिस्तानात 30 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर या कालावधीत खेळला जाणार आहे. पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यामध्ये सलामीची लढत होणार आहे. भारत, पाकिस्तान आणि नेपाळ हे एकाच ग्रुपमध्ये आहेत. विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होणार आहे. त्यापूर्वी श्रीलंकामध्ये याची रंगीत तालिम पाहायला मिळणार आहे. आशिया चषकामध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होणार आहे. 2 सप्टेंबर रोजी श्रीलंका येथील पल्लेकेले स्टेडिअमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होणार आहे. आशिया चषक यंदा एकदिवसीय स्वरुपात होणार आहे. भारत आणि पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये आहेत. आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात किमान दोन सामने होतील. पाकिस्तानने आशिया चषकासाठी संघाची घोषणा केली आहे. भारतीय संघाची निवड अद्याप झालेली नाही. भारतीय संघाची निवड 21 ऑगस्ट रोजी होण्याची शक्यता आहे.