एक्स्प्लोर

Asia Cup 2023 : भारत-पाकिस्तान सामन्याबाबत मोठा निर्णय, पाऊस आला तरी....

IND vs PAK Asia Cup 2023 : आशिया चषकात  भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये रविवारी, 10 सप्टेंबर रोजी कोलंबो येथे महामुकाबला रंगणार आहे.

IND vs PAK Asia Cup 2023 Reserve Day : आशिया चषकात  भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये रविवारी, 10 सप्टेंबर रोजी कोलंबो येथे महामुकाबला रंगणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, रविवारी कोलंबो येथे मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 2 सप्टेंबर रोजी कँडी येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे हायव्होल्टेज सामना रद्द करावा लागला होता.त्यामुळे आता एसीसीने भारत आणि पाकिस्तान सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.  क्रिकइन्फोने याबाबतचा निर्णय घेतला आहे. 
 
भारत-पाकिस्तान सामन्यासाठी राखीव दिवसाची घोषणा

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना वगळता आशिया चषक 2023 स्पर्धेतील कोणत्याही सामन्यासाठी राखीव दिवस नाही. आशिया चषकाच्या अंतिम सामन्यालाही राखीव दिवस नसल्याचे समोर आले आहे.त्यामुळे आशिया चषक स्पर्धा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, अंतिम सामना आणि सुपर-4 फेरीतील भारत आणि पाकिस्तान सामन्यासाठी राखीव दिवस (Reserve Day) ठेवण्यात आला आहे. हे दोन्ही सामने जेव्हा सुरू होतील, त्याच दिवशी संपवण्याचा प्रयत्न केला जाईल. यासाठी सामना छोटा झाला, तरीही त्याच दिवशी संपवला जाईल. असे असूनही सामना पूर्ण झाला नाही, तर दुसऱ्या दिवशी जिथे सामना रोखण्यात आला होता, तिथूनच सुरू केला जाईल.

भारत आणि पाकिस्तान सामन्यात पुन्हा पावसाचा अंदाज - 

Accuweather च्या वृत्तानुसार, रविवारी कोलंबोमध्ये पावसाची शक्यता 75 टक्के इतकी आहे. आशिया चषकात दुसऱ्यांदा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रद्द होणार का? अशा चर्चा रंगल्या आहेत. रविवारी दुपारी कोलंबोमध्ये 99 टक्के ढगाळ वातावरणाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दुपारी अडीच वाजता पावसाची शक्यता 77 टक्के असेल... तर सायंकाळी 80 टक्के पाऊस कोसळू शकतो. Accuweather च्या रिपोर्ट्सनुसार, दिवसभर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज सामना होणार का ? अशी चर्चा रंगली आहे.  

पहिल्या सामन्यात काय झाले होते.. ? 

शनिवारी, दोन सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला होता. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण पाकिस्तानच्या वेगवान तिकडीसमोर भारताच्या फलंदाजांची भंबेरी उडाली होती. भारताची आघाडीची फळी 15 षटकांच्या आत तंबूत परतली होती. एकवेळ भारताची अवस्था 4 बाद 66 अशी दयनीय झाली होती. रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि शुभमन गिल स्वस्तात माघारी परतले होते. भारतीय संघ 150 धावांपर्यंत पोहचणार का ? अशी स्थिती निर्माण झाली होती. पण इशान किशन आणि हार्दिक पांड्या यांनी जिगरबाज खेळी करत भारताचा डाव सावरला होता. हार्दिक पांड्याने 87 धावांची झुंजार खेळी केली होती. तर इशान किशन याने 82 धावांचे वादळी योगदान दिले होते. हार्दिक पांड्या आणि इशान किशन या जोडीने पाचव्या विकेटला 138 धावांची भागिदारी केली. हार्दिक आणि इशान या जोडीच्या बळावर भारतीय संघाने 266 धावसंख्येपर्यंत मजल मारली होती. पण त्यानंतर पावसाने खोडा घातल्यामुळे सामना रद्द करावा लागला होता. आता पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होणार आहे. पाकिस्तानच्या वेगवान माऱ्याला भारतीय फलंदाज कसे तोंड देणार? हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. शाहीन आफ्रिदी, हॅरिस रौफ आणि नसीम शाह या वेगवान तिकडीने पहिल्या सामन्यात भारताचा संपूर्ण संघ तंबूत धाडला होता. आता 10 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागलेय. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maha Shivratri : कित्येक वर्ष जुनं मंदिर, अन् पूजेचा तामझाम, पाकिस्तानातील खास महाशिवरात्र! पाहा Exclusive फोटो
कित्येक वर्ष जुनं मंदिर, अन् पूजेचा तामझाम, पाकिस्तानातील खास महाशिवरात्र! पाहा Exclusive फोटो
फक्त 11 रुपयांत मिळणार विमानाचे तिकीट! 'या' ऑफरमुळे देशात खळबळ
फक्त 11 रुपयांत मिळणार विमानाचे तिकीट! 'या' ऑफरमुळे देशात खळबळ
उन्हाचा कहर, महाराष्ट्र तापला, ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद; गोव्यातही वाढलं टेंपरेचर
उन्हाचा कहर, महाराष्ट्र तापला, ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद; गोव्यातही वाढलं टेंपरेचर
चाहे जाओ मुंबई, दिल्ली, आगरा... सोलापुरात भाच्याच्या लग्नात मामाने नाचवल्या नृत्यांगणा; पोलिसांचा फौजफाटा आला
चाहे जाओ मुंबई, दिल्ली, आगरा... सोलापुरात भाच्याच्या लग्नात मामाने नाचवल्या नृत्यांगणा; पोलिसांचा फौजफाटा आला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 26 February 2025Special Report Ujjwal Nikam | निकमांकडे वकीलपत्र, तरीही आरोपांचं सत्र;नियुक्तीवर देशमुख कुटुंब समाधानीSpecial Report | Uddhav Thackeray | ठाकरेंकडून शिंदेंना शिंगावर, फडणवीसांना डोक्यावर?Zero Hour | Swarget Bus Depo News | 'शिवशाही'त बलात्कार एसटीचं 'वस्रहरण',झीरो अवर शोमध्ये सखोल चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maha Shivratri : कित्येक वर्ष जुनं मंदिर, अन् पूजेचा तामझाम, पाकिस्तानातील खास महाशिवरात्र! पाहा Exclusive फोटो
कित्येक वर्ष जुनं मंदिर, अन् पूजेचा तामझाम, पाकिस्तानातील खास महाशिवरात्र! पाहा Exclusive फोटो
फक्त 11 रुपयांत मिळणार विमानाचे तिकीट! 'या' ऑफरमुळे देशात खळबळ
फक्त 11 रुपयांत मिळणार विमानाचे तिकीट! 'या' ऑफरमुळे देशात खळबळ
उन्हाचा कहर, महाराष्ट्र तापला, ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद; गोव्यातही वाढलं टेंपरेचर
उन्हाचा कहर, महाराष्ट्र तापला, ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद; गोव्यातही वाढलं टेंपरेचर
चाहे जाओ मुंबई, दिल्ली, आगरा... सोलापुरात भाच्याच्या लग्नात मामाने नाचवल्या नृत्यांगणा; पोलिसांचा फौजफाटा आला
चाहे जाओ मुंबई, दिल्ली, आगरा... सोलापुरात भाच्याच्या लग्नात मामाने नाचवल्या नृत्यांगणा; पोलिसांचा फौजफाटा आला
पुण्यातील घटनेनंतर मंत्रालयात उद्याच बैठक; बस स्थानकांतील जुन्या बसेस संदर्भातही महत्त्वाचे निर्देश
पुण्यातील घटनेनंतर मंत्रालयात उद्याच बैठक; बस स्थानकांतील जुन्या बसेस संदर्भातही महत्त्वाचे निर्देश
Chandrapur News : महाशिवरात्रीनिमित्य देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला; वैनगंगा नदीत बुडून 3 सख्या बहि‍णींचा दुर्दैवी अंत
महाशिवरात्रीनिमित्य देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला; वैनगंगा नदीत बुडून 3 सख्या बहि‍णींचा दुर्दैवी अंत
पुण्यातील धक्कादायक घटनेनंतर अजित पवारांचा लाडक्या बहि‍णींना शब्द; CM फडणवीसांनीही घेतली दखल
पुण्यातील धक्कादायक घटनेनंतर अजित पवारांचा लाडक्या बहि‍णींना शब्द; CM फडणवीसांनीही घेतली दखल
Prashant Kishor : बिहारमध्ये अजूनही डाळ शिजत नसल्याने, प्रशांत किशोर जुन्या मार्गावर? उत्तरेतून दक्षिणेकडे मोर्चा वळवत कोणता संदेश दिला??
बिहारमध्ये अजूनही डाळ शिजत नसल्याने, प्रशांत किशोर जुन्या मार्गावर? उत्तरेतून दक्षिणेकडे मोर्चा वळवत कोणता संदेश दिला??
Embed widget