एक्स्प्लोर

विराट-बुमराहचं कमबॅक, आशिया चषकाच्या फायनलसाठी टीम इंडियाची संभाव्य प्लेईंग 11

India vs Sri Lanka : अंतिम फेरीसाठी विश्रांती देण्यात आलेल्या सर्व खेळाडूंचे पुनरागमन निश्चित आहे.

India vs Sri Lanka In Asia Cup Final : आशिया चषका 2023 स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी होणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडिअमवर लढत होणार आहे. ३० ऑगस्टपासून सुरु असणाऱ्या स्पर्धेचा विजेता रविवारी मिळणार आहे. अंतिम सामन्यावर पावसाचे सावट आहे. पण दिलासादायक बाब म्हणजे, फायनलसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. सुपर ४ फेरीत श्रीलंकेला हरवत भारताने फायनलमध्ये प्रवेश केला होता. फायनलचे तिकिट मिळवणारा भारत पहिला संघ ठरला होता. पाकिस्तानचा पराभव करत श्रीलंका संघाने फायनलमध्ये प्रवेश केला होता. आता रविवारी आशिया चषकाचा किंग कोण? यावरुन पडदा उठणार आहे. पण भारत आणि श्रीलंका आशिया चषकाच्या फायनलमध्ये आठव्यांदा आमनेसामने आलेत. याआधी या दोन संघामध्ये सातवेळा स्पर्धा रंगली होती.  रविवारी भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये फायनलचा सामना रंगणार आहे. या सामन्यात टीम इंडियामध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे. मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह गोलंदाजीची धुरा सांभाळतील.. विराट कोहली आणि हार्दिक पांड्या यांचे कमबॅक होईल. बांगलादेशविरोधात झालेल्या सामन्यात टीम इंडियात पाच बदल करण्यात आले होते. विराटसह अनेकांना आराम दिला होता. 

अंतिम फेरीसाठी विश्रांती देण्यात आलेल्या सर्व खेळाडूंचे पुनरागमन निश्चित आहे. या खेळाडूंमध्ये विराट कोहली, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि हार्दिक पांड्यासारख्या स्टार खेळाडूंचा समावेश होता. श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम सामन्यासाठी सर्व खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये परत येतील. कर्णधार रोहित शर्मासोबत शुभमन गिल सलामीला उतरतील.  दोन्ही फलंदाज चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहेत. विराट कोहलीही तिसऱ्या क्रमांकावर खेळेल. अशाप्रकारे संघाच्या आघाडीच्या फळीत कर्णधार रोहित शर्मा, शुभमन गिल आणि विराट कोहली यांची उपस्थिती निश्चित आहे असे म्हणता येईल. तर मुख्य यष्टिरक्षक म्हणून संघात सामील झालेला केएल राहुल चौथ्या क्रमांकावर दिसू शकतो. याशिवाय डावखुरा किशन पाचव्या क्रमांकाची जबाबदारी सांभाळू शकतो. ईशान आतापर्यंत चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे. याशिवाय अष्टपैलू हार्दिक पांड्या सहाव्या क्रमांकावर आणि रवींद्र जडेजा सातव्या क्रमांकावर खेळेल.  

फिरकीपटू कुलदीप यादव फिरकीची धुरा सांभाळेल. संघाची फलंदाजी आणखी मजबूत करण्यासाठी वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरचाही प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश केला जाऊ शकतो. खालच्या फळीत चांगली फलंदाजी करून संघासाठी महत्त्वाच्या धावा जोडण्याची क्षमता शार्दुलमध्ये आहे. याशिवाय स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज खेळणार हे जवळपास निश्चित आहे.

संभाव्य प्लेईंग ११ 

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (विकेटकीपर), ईशान किशन, हार्दिक पांड्या रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.  

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
CNG Price Hike : सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! विधानसभेचं मतदान होताच CNG च्या दरात वाढ; दर किती रुपयांनी वाढले?
सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! विधानसभेचं मतदान होताच CNG च्या दरात वाढ; दर किती रुपयांनी वाढले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Solapur : सोलापुरात महाविकास आघाडीत नेमकं काय घडतंय?Ulhas Bapat Vidhansabha Election 2024 : 26 नोव्हेंबरच्या आज  सरकार स्थापन झाल्यास राष्ट्रपती राजवटMVA Leaders Meeting : अपक्ष आमदारांशी मविआकडून संपर्क; निकालाआधीच मविआची सरकार स्थापनेचे रणनीतीABP Majha Headlines :  12 PM : 22 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
CNG Price Hike : सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! विधानसभेचं मतदान होताच CNG च्या दरात वाढ; दर किती रुपयांनी वाढले?
सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! विधानसभेचं मतदान होताच CNG च्या दरात वाढ; दर किती रुपयांनी वाढले?
Sharad Pawar : शरद पवार काहीही करु शकतात, त्यांच्याबाबत कुणीही सांगू शकत नाही; शिंदे गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
शरद पवार काहीही करु शकतात, त्यांच्याबाबत कुणीही सांगू शकत नाही; शिंदे गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
भाजप पदाधिकारी माझ्यासोबतच म्हणणाऱ्या सदा सरवणकरांना माहीम विधानसभेत गुलिगत धोका? निकालाच्या आदल्या दिवशी ठाकरेंची खेळी उघड
भाजप पदाधिकारी माझ्यासोबतच म्हणणाऱ्या सदा सरवणकरांना माहीम विधानसभेत गुलिगत धोका? निकालाच्या आदल्या दिवशी ठाकरेंची खेळी उघड
Baba Siddique Case Update: बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणातील आरोपीने पोलिसांपासून वाचण्यासाठी लढवली शक्कल, फोन बंद केला अन् वापरलं मजुराचं हॉटस्पॉट
बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणातील आरोपीने पोलिसांपासून वाचण्यासाठी लढवली शक्कल, फोन बंद केला अन् वापरलं मजुराचं हॉटस्पॉट
Sharad Pawar : एक्झिट पोलचा लोड घेऊ नका; ऑनलाईन बैठकीत शरद पवारांनी उमेदवारांना महाविकास आघाडीचा थेट आकडाच सांगितला!
एक्झिट पोलचा लोड घेऊ नका; ऑनलाईन बैठकीत शरद पवारांनी उमेदवारांना महाविकास आघाडीचा थेट आकडाच सांगितला!
Embed widget