Ashes 2021-22: अॅशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान वीज कोसळली, स्टंप कॅमेऱ्यात फोटो कैद

Ashes 2021-22: ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (AUS Vs ENG) यांच्यात अॅशेस मालिकेतील दुसरा सामना अॅडलेडच्या (Adelaide) ओव्हल मैदानावर सुरू आहे.

Continues below advertisement

Ashes 2021-22: ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (AUS Vs ENG) यांच्यात अॅशेस मालिकेतील दुसरा सामना अॅडलेडच्या (Adelaide) ओव्हल मैदानावर सुरू आहे. मात्र, या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी मैदानाबाहेर वीज कोसळली. यानंतर संपूर्ण मैदानात भितीजनक वातावरण निर्माण झालं. दरम्यान, पंचांनीही खेळाडूंच्या सुरेक्षतेच्या कारणास्तव वेळेपूर्वीच खेळ थांबवला. या घटनेचा फोटो स्टंपच्या कॅमेऱ्यात कैद झालीय. 

Continues below advertisement

ऑस्ट्रेलिया- इंग्लंड यांच्यातील दुसरा डे-नाईट कसोटी सामना ओव्हल मैदानावर खेळला जात होता. त्यावेळी इंग्लंडच्या डावाच्या 9 व्या षटकादरम्यान मैदानाबाहेर वीज कोसळल्यानं मोठा आवाज झाला. यामुळं खेळाडू आणि पंचांसह मैदानातील प्रेक्षक खूप घाबरले. ही घटना स्टंप कॅमेऱ्यात कैद झाली. सामन्यादरम्यानच अॅडलेड हवामान खराब झालं. दरम्यान, विजेचा कडकडाट झालाय. त्यानंतर पंचांनी तात्काळ खेळाडूंना पॅव्हेलियनमध्ये परतण्याच्या सूचना दिल्या. काही वेळानं हलका पाऊस सुरू झाला. त्यानंतर पंचांनी दिवसाचा खेळ संपवण्याचा निर्णय घेतला. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं या घटनेचा फोटो ट्विटरवर शेअर केलाय. याव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरनंही हा फोटो शेअर केलाय. 

डेव्हिड वार्नरचं ट्वीट-

अॅडिलेड ओव्हल मैदानावर अ‍ॅशेस मालिकेतील (Ashes series) दुसरा कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. तिसऱ्या दिवसअखेरीस ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीमध्ये आहे. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाच्या एक बाद 45 धावा झाल्या असून त्यांच्याकडे 282 धावांची आघाडी आहे. ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीमध्ये आहे. इंग्लंडसाठी परिस्थिती अधिक खडतर झाली आहे. त्यांचा पहिला डाव 236 धावात आटोपला.

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola