IPL 2022 : आयपीएलच्या 15 (IPL 2022) व्या हंगामात 8 च्या जागी 10 संघ खेळताना दिसणार आहेत. त्यानुसार दोन नव्या संघांची घोषणा करण्यात आली ज्यामध्य़े लखनौ (Lucknow Team) आणि अहमदाबाद (Ahmedabad Team) या दोन संघाची एन्ट्री झाली आहे. यामध्ये आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा संघ लखनौ ठरला असून संजीव गोएन्का ग्रुपने तब्बल 7 हजार 90 कोटींना संघ विकत घेतला आहे. आता याच संघात आयपीएलच्या इतिहासातील एक यशस्वी कर्णधार असणारा गौतम गंभीर जॉईन झाला आहे. गंभीर मेंटॉर अर्थात मार्गदर्शक म्हणून संघासोबत जोडला गेला आहे. संघाचे मालक संजीव गोएंका यांनी स्वत: शनिवारी ही माहिती दिली. याआधी झिम्बाब्वेचा माजी कर्णधार अँडी फ्लॉवरची (Andy Flower) लखनौचा मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 


गंभीर याच्या नेतृत्त्वाखाली कोलकाता नाईट रायडर्स संघाने 2012 आणि 2014 साली आयपीएल ट्रॉफी जिंकली होती. त्यामुळे गंभीरच्या मार्गदर्शनाखाली नव्याने स्पर्धेत येणारा लखनौचा संघही चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. पण आता या नव्या संघाचं कर्णधारपद कोणाला मिळणार? हा सर्वात मोठा प्रश्न सर्वांसमोर आहे. दरम्यान केएल राहुलला पंजाबने रिटेन केलेलं नाही. त्यात पंजाबचा कोच अँड़ी फ्लोवरही लखनौमध्ये गेल्याने राहुलच लखनौचा कर्णधार होईल अशी चर्चा आहे.


दोन नवे संघ आयपीएलमध्ये


आतापर्यंत 8 संघ असणाऱ्या आयपीएलमध्ये 10 संघ असणार आहेत. यावेळी संजीव गोएन्का ग्रुपने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी बोली लावत लखनौ संघ जवळपास 7 हजार 90 कोटी रुपयांना विकत घेतला आहे. तर सीवीसी कॅपिटलने अहमदाबाद संघाला जवळपास 5 हजार 625 कोटी रुपयांना लिलावात मिळवला आहे. त्यामुळे या दोन्ही संघासाठी मोजावी लागलेली किंमत तब्बल 12 हजार कोटींहूनही अधिक आहे.


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha