एक्स्प्लोर

10 सामन्यांची बंदी अन् 83 लाख रुपयांचा दंड! फायनलमध्ये हाणामारीप्रकरणी अर्जेंटिनाच्या खेळाडूवर मोठी कारवाई, नेमकं काय घडलं होतं?

Argentina Leandro Paredes banned for 10 matches by FIFA : फिफा वर्ल्ड कप 2026 च्या फायनलचा थरार संपल्यानंतर मैदानावर घडलेल्या वादाला अखेर फिफाने पूर्णविराम दिला आहे.

Argentina Leandro Paredes banned for 10 matches by FIFA : फिफा वर्ल्ड कप 2026 च्या फायनलचा थरार संपल्यानंतर मैदानावर घडलेल्या वादाला अखेर फिफाने पूर्णविराम दिला आहे. स्पेनने अर्जेंटिनाचा पराभव करत विश्वविजेतेपद पटकावल्यानंतर दोन्ही संघांतील काही खेळाडूंमध्ये जोरदार वाद झाला होता. या वादाचे रूपांतर थेट धक्काबुक्की आणि हाणामारीत झाले. या घटनेनंतर दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत होती. अखेर घटनेच्या जवळपास महिनाभरानंतर फिफाने आपला कठोर निर्णय जाहीर केला आहे. या कारवाईचा सर्वात मोठा फटका अर्जेंटिनाचा मिडफिल्डर लिआंद्रो पारेदेसला बसला आहे. फिफाच्या शिस्तपालन समितीने त्याला तब्बल 10 आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी निलंबित केले आहे. याशिवाय त्याच्यावर 90 हजार डॉलर म्हणजेच जवळपास 83 लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

लिआंद्रो पारेदेसला सर्वात मोठी शिक्षा

20 जुलै रोजी अमेरिका येथील न्यूयॉर्क-न्यू जर्सी स्टेडियमवर विश्वचषकाचा अंतिम सामना रंगला होता. निर्धारित वेळेत दोन्ही संघांना गोल करता आला नाही. त्यानंतर अतिरिक्त वेळेत स्पेनने निर्णायक गोल करत अर्जेंटिनावर 1-0 असा विजय मिळवला आणि विश्वचषकाच्या ट्रॉफीवर नाव कोरले. मात्र, सामना संपल्यानंतर अर्जेंटिनाच्या काही खेळाडूंना पराभव पचवणे कठीण गेले. मैदानावरील वातावरण अचानक तापले आणि स्पेन-अर्जेंटिना खेळाडूंमध्ये वादाला सुरुवात झाली. स्पेनच्या खेळाडूंसोबत झालेल्या संघर्षात लिआंद्रो पारेदेसने आक्रमकता दाखवल्याचे फिफाने नमूद केले. त्यामुळे त्याच्यावर 10 सामन्यांची बंदी आणि 90 हजार डॉलरचा दंड अशी दुहेरी कारवाई करण्यात आली आहे.

मोलिनावरही मोठी कारवाई

अर्जेंटिनाचा बचावपटू नाहुएल मोलिनालाही फिफाने कठोर शिक्षा सुनावली आहे. त्याला 7 आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी निलंबित करण्यात आले असून 90 हजार डॉलरचा दंड ठोठावण्यात आला आहे. याशिवाय थियागो अल्माडालाही कारवाईला सामोरे जावे लागले. त्याच्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली असून 30 हजार डॉलर म्हणजेच जवळपास 29 लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे. या प्रकरणात केवळ खेळाडूच नाही, तर अर्जेंटिनाच्या सपोर्ट स्टाफवरही कारवाई झाली आहे. असिस्टंट कोच रॉबर्टो अयालादेखील या वादात सहभागी असल्याचे तपासात निष्पन्न झाले. फिफाने अयालावर 3 सामन्यांची बंदी घातली असून त्याला 30 हजार डॉलरचा दंड भरावा लागणार आहे. विशेष म्हणजे, स्पेनचा युवा स्टार गावीही या प्रकरणात दोषी आढळला आहे. त्याच्यावर एका सामन्याची बंदी आणि 30 हजार डॉलरचा दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे.

अर्जेंटिना फुटबॉल असोसिएशनवरही कोट्यवधींचा दंड

फिफाची कारवाई केवळ खेळाडू आणि कोचपुरती मर्यादित राहिलेली नाही. अर्जेंटिना फुटबॉल असोसिएशनवरही मोठा आर्थिक दंड ठोठावण्यात आला आहे. एएफएला तब्बल 3 लाख 21 हजार डॉलर म्हणजेच जवळपास 3 कोटी रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. मात्र, हा दंड केवळ फायनलमधील हाणामारीसाठी नाही. फिफाने अर्जेंटिना फुटबॉल असोसिएशनवर आर्थिक दंड ठोठावण्यासोबतच आणखी एक कठोर निर्बंध लावला आहे. अर्जेंटिनाला आपल्या पुढील दोन घरच्या सामन्यांमध्ये स्टेडियमच्या क्षमतेच्या केवळ 50 टक्के प्रेक्षकांनाच प्रवेश देता येणार आहे. अशा प्रकारे विश्वचषकाच्या फायनलमध्ये पराभवानंतर मैदानावर उसळलेला संताप आता अर्जेंटिनाच्या खेळाडूंना चांगलाच महागात पडला आहे.  

हे ही वाचा -

AUS vs BAN 2nd Test : W,W,W,W,W,W... पहिल्याच चेंडूपासून कहर! स्टार्कच्या वादळात बांगलादेश उद्ध्वस्त, 64 धावांत संपूर्ण संघाचा खेळ खल्लास; ऑस्ट्रेलियाचा धडकी भरवणारा पलटवार, VIDEO

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

10 सामन्यांची बंदी अन् 83 लाख रुपयांचा दंड! फायनलमध्ये हाणामारीप्रकरणी अर्जेंटिनाच्या खेळाडूवर मोठी कारवाई, नेमकं काय घडलं होतं?
10 सामन्यांची बंदी अन् 83 लाख रुपयांचा दंड! फायनलमध्ये हाणामारीप्रकरणी अर्जेंटिनाच्या खेळाडूवर मोठी कारवाई, नेमकं काय घडलं होतं?
AUS vs BAN 2nd Test : W,W,W,W,W,W... पहिल्याच चेंडूपासून कहर! स्टार्कच्या वादळात बांगलादेश उद्ध्वस्त, 64 धावांत संपूर्ण संघाचा खेळ खल्लास; ऑस्ट्रेलियाचा धडकी भरवणारा पलटवार, VIDEO
W,W,W,W,W,W... पहिल्याच चेंडूपासून कहर! स्टार्कच्या वादळात बांगलादेश उद्ध्वस्त, 64 धावांत संपूर्ण संघाचा खेळ खल्लास; ऑस्ट्रेलियाचा धडकी भरवणारा पलटवार, VIDEO
WTC Points Table : पाकिस्तानची अशी दाणादाण कधी पाहिली नसेल! ना फलंदाजी जमली, ना गोलंदाजी...; इंग्लंडसमोर फक्त अन् फक्त लाचार, आता WTC पॉइंट्स टेबलमध्ये तळाला
पाकिस्तानची अशी दाणादाण कधी पाहिली नसेल! ना फलंदाजी जमली, ना गोलंदाजी...; इंग्लंडसमोर फक्त अन् फक्त लाचार, आता WTC पॉइंट्स टेबलमध्ये तळाला
IND vs SL 2nd Test : कुलदीप यादव OUT, एका खेळाडूचं पदार्पण; श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
कुलदीप यादव OUT, एका खेळाडूचं पदार्पण; श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
Advertisement

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News: सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
Mumbai Crime News : मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
Accident: लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
Chhatrapati Sambhajinagar News : गेल्या वर्षीही कुणाल जीवन संपवण्यासाठी पोहोचलेला खवड्या डोंगरावर; तेव्हा मनधरणी केली पण यावेळी...; संभाजीनगरमधील त्रिकुटाच्या मृत्यू प्रकरणात हादरवणारी माहिती समोर
गेल्या वर्षीही कुणाल जीवन संपवण्यासाठी पोहोचलेला खवड्या डोंगरावर; तेव्हा मनधरणी केली पण यावेळी...; संभाजीनगरमधील त्रिकुटाच्या मृत्यू प्रकरणात हादरवणारी माहिती समोर
Rahul Gandhi Chhatron Ki Goonj: पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
IND vs SL 2nd Test : कुलदीप यादव OUT, एका खेळाडूचं पदार्पण; श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
कुलदीप यादव OUT, एका खेळाडूचं पदार्पण; श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
Nashik Crime News: चार वर्षांपासून प्रेमसंबंध; नंतर लग्नाला दिला नकार, दोघांचं पुन्हा लग्न जुळवण्यासाठी भोंदूनं दाखवलं अमिष, स्मशानात रात्री पूजा अन्..., हजारो रूपये उकळले
चार वर्षांपासून प्रेमसंबंध; नंतर लग्नाला दिला नकार, दोघांचं पुन्हा लग्न जुळवण्यासाठी भोंदूनं दाखवलं अमिष, स्मशानात रात्री पूजा अन्..., हजारो रूपये उकळले
Share Market News : शेअर बाजारात 'देसी दम'! म्युच्युअल फंड, किरकोळ गुंतवणूकदारांचा दबदबा वाढला, परदेशी गुंतवणूकदारांना टाकले मागे
शेअर बाजारात 'देसी दम'! म्युच्युअल फंड, किरकोळ गुंतवणूकदारांचा दबदबा वाढला, परदेशी गुंतवणूकदारांना टाकले मागे
Embed widget