Angelo Mathews Retirement : विराट अन् रोहितनंतर आणखी एका दिग्गज क्रिकेटपटूने घेतला कसोटी क्रिकेटमधून संन्यास, 17 वर्षांच्या ऐतिहासिक कारकिर्दीचा शेवट
Angelo Mathews Test Retirement News : भावनिक पोस्ट शेअर करत दिग्गज खेळाडूची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा!

Angelo Mathews Test Retirement : आता आणखी एका दिग्गज खेळाडूने कसोटी फॉर्मेट सोडण्याचा निर्णय घेतला आहे, तो म्हणजे श्रीलंकेचा माजी कर्णधार अँजेलो मॅथ्यूज. जून महिन्यात बांगलादेश संघाच्या श्रीलंका दौऱ्यादरम्यान खेळल्या जाणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात खेळल्यानंतर 37 वर्षीय मॅथ्यूज या फॉरमॅटला अलविदा म्हटले. भावनिक पोस्ट शेअर करत अँजेलो मॅथ्यूजने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.
— Angelo Mathews (@Angelo69Mathews) May 23, 2025
श्रीलंकेसाठी क्रिकेट खेळणे माझ्यासाठी सन्मान....
कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीच्या निर्णयाबद्दल अँजेलो मॅथ्यूजने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, जूनमध्ये बांगलादेशविरुद्धचा कसोटी सामना हा या फॉरमॅटमधील त्याचा शेवटचा सामना असेल. मी या फॉरमॅटला अलविदा करत असलो तरी, निवडकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर संघाला जेव्हा जेव्हा माझी गरज असेल, तेव्हा मी मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये खेळण्यासाठी उपलब्ध असेन. मला वाटते की सध्या आमच्या कसोटी संघात अनुभवी आणि युवा खेळाडू आहेत. माझ्यासाठी हा माझा आवडता क्रिकेट फॉरमॅट आहे, पण आता त्याला निरोप देण्याची वेळ आली आहे. गेल्या 17 वर्षांपासून श्रीलंकेसाठी या फॉरमॅटमध्ये खेळणे माझ्यासाठी सन्मान आणि अभिमानाची गोष्ट आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये मॅथ्यूजची कामगिरी
अँजेलो मॅथ्यूजच्या कसोटी क्रिकेटमधील कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने 118 सामन्यांमध्ये 44.62 च्या सरासरीने 8167 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 16 शतके आणि 45 अर्धशतकांचा समावेश आहे. 17 जूनपासून बांगलादेशविरुद्ध सुरू होणाऱ्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात मॅथ्यूज शेवटच्या वेळी पांढऱ्या रंगाची जर्सी घालणार आहे आणि त्याच्याकडे विराट कोहलीला मागे टाकून घरच्या मैदानावर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनण्याची संधी असेल, ज्यापासून तो फक्त 13 धावा दूर आहे. दोन कसोटी सामन्यांव्यतिरिक्त, बांगलादेश संघाला श्रीलंकेत तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका आणि तेवढ्याच टी-20 सामन्यांची मालिकाही खेळायची आहे.
“A true servant of Sri Lanka Test Cricket. Thank you, @Angelo69Mathews, for 17 years of unwavering dedication, leadership, and unforgettable moments in the red-ball format. Your commitment and passion have inspired a generation. We wish you all the very best as you step away from… pic.twitter.com/fwhCYdirxT
— Press Trust of India (@PTI_News) May 23, 2025
हे ही वाचा -





















