All Time XI : एंजेलो मॅथ्यूजने निवडली क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ठ टीम; सचिन, लारा, अक्रम आणि 'या' खेळाडूंचा समावेश
Angelo Mathews All Time XI : एंजेलो मॅथ्यूजने आपली ऑलटाईम इलेव्हन टीम निवडली असून त्यामध्ये सचिनसहित लारा, वॉर्न अशा अनेक दिग्गज खेळाडूंचा समावेश केला आहे.
All Time XI : आपल्या अष्ठपैलू खेळाच्या जीवावर श्रीलंकेच्या अनेक विजयामध्ये मोलाचा वाटा उचलणाऱ्या एंजेलो मॅथ्यूजने आपली ऑलटाईम इलेव्हन टीम निवडली आहे. त्याने सचिन तेंडुलकर या एकमेव भारतीय खेळाडूचा समावेश आपल्या संघात केला आहे. विशेष म्हणजे त्याच्या या संघात पाच श्रीलंकन खेळाडूंचा समावेश आहे.
एंजेलो मॅथ्यूजने आपल्या संघात वेस्ट इंडिजचा महान खेळाडू ब्रायन लाराचा समावेश केला आहे. सचिन तेंडुलकर सोबत सलामीला फलंदाजी करण्यासाठी त्याने कुमार संगकाराची निवड केली आहे. इंग्लंडच्या एकाही खेळाडूचा त्याने आपल्या संघात समावेश केला नाही.
एंजेलो मॅथ्यूजने आपल्या ऑल टाईम इलेव्हन संघात श्रीलंकेच्या अरविंद डिसिल्व्हा, माहेला जयवर्धने, कुमार संगकारा, मुथय्या मुरलीधरन आणि चामिंडा वास या पाच खेळाडूंचा समावेश केला आहे. तसेच आफ्रिकेच्या जॅक कॅलिसचाही त्याने समावेशे केला आहे. एंजेलो मॅथ्यूजच्या संघात दोन स्पिनर्ससह पाच गोलंदाजांचा समावेश आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉर्न, मॅक्ग्राथ आणि पाकिस्तानच्या वासिम आक्रमचा समावेश आहे.
असा आहे एंजेलो मॅथ्यूजचा ऑल टाईम इलेव्हन संघ
सचिन तेंडूलकर, कुमार संगकारा (कर्णधार), ब्रायन लारा, अरविंद डिसिल्व्हा, माहेला जयवर्धने, जॅक कॅलिस, शेन वॉर्न, मुथय्या मुरलीधरन, वासिम आक्रम, चामिंडा वास, ग्रेन मॅक्ग्राथ
महत्वाच्या बातम्या :
- Copa America 2021 final : तब्बल 28 वर्षांनी कोपा अमेरिका स्पर्धेत अर्जेंटीनाची विजयाला गवसणी, गतविजेत्या ब्राझीलला नमवलं
- UP Panchayat Polls : ब्लॉक प्रमुख निवडणुकीत भाजपचा वरचष्मा; दोन तृतियांश जागांवर विजय
- गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी अधिकच्या विशेष गाड्या सोडा; आशिष शेलार यांची रेल्वे राज्यमंत्र्यांकडे मागणी