Akash Deep 1st Half Century : अभ्यास केला गिल अन् राहुलचा, पण पेपर आला सिलॅबसच्या बाहेरचा; आकाश दीपने इंग्रजांना रडवले, ठोकले पहिले अर्धशतक
England vs India 5th Test Update : केनिंग्टन ओव्हल मैदानावर सुरु असलेल्या भारत-इंग्लंड कसोटी मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात तिसऱ्या दिवशी एक मोठा थरार पाहायला मिळाला.

Akash Deep 1st Test half century vs England : केनिंग्टन ओव्हल मैदानावर सुरु असलेल्या भारत-इंग्लंड कसोटी मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात तिसऱ्या दिवशी एक मोठा थरार पाहायला मिळाला. भारतासाठी नाईट वॉचमन म्हणून मैदानात उतरलेल्या आकाश दीपने इंग्लंडच्या रणनीती अक्षरशः पाण्यात घालवली. कसोटी कारकिर्दीत पहिल्यांदाच अर्धशतक झळकावत त्याने धडाकेबाज फलंदाजी करत इंग्लंडला आश्चर्यचकित केलं.
इंग्लिश गोलंदाजांसमोर संयमी आणि आत्मविश्वासपूर्ण खेळी करत आकाश दीपने 70 चेंडूत अर्धशतक पुर्ण केलं. त्याने यशस्वी जैस्वालसोबत 80 धावांहून अधिक महत्त्वपूर्ण भागीदारी करत भारताला मजबूत स्थितीत नेलं. भारताची आघाडी आता 132 धावांची झाली आहे आणि सामना भारताच्या पकडीत येऊ लागला आहे.
विशेष म्हणजे, इंग्लंड संघाने संपूर्ण तयारी शुभमन गिल, के.एल. राहुल आणि साई सुदर्शन यांच्यावर केंद्रित केली होती. पण ज्या खेळाडूला त्यांनी गांभीर्याने घेतलंच नाही, त्याच आकाश दीपने त्यांचं सगळं गणितच बिघडवलं. इंग्लंडसाठी हा सामना अगदी ‘सिलॅबसबाहेरचा पेपर’ ठरला.
सध्या भारत दुसऱ्या डावात भक्कम स्थितीत असून, तिसऱ्या दिवशी आकाश दीपने गोलंदाजीबरोबरच फलंदाजीतही चमक दाखवून संघ व्यवस्थापनाचा विश्वास सार्थ ठरवला आहे. एकंदरीत, आकाश दीपने तिसऱ्या दिवशी इंग्लंडला रडवलं आणि मैदानावर आपली 'दीप' छाप सोडली.
Maiden FIFTY in international cricket for Akash Deep 😎
— BCCI (@BCCI) August 2, 2025
A valuable contribution with the bat and a knock to remember! 👏👏
He gets it in style with a four 🔥
Updates ▶️ https://t.co/Tc2xpWNayE#TeamIndia | #ENGvIND pic.twitter.com/hMF9oeqE90
पाचव्या कसोटीत आतापर्यंत काय घडलं?
केनिंग्टन ओव्हल येथे इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात भारतीय संघ 224 धावांवर गुंडाळला गेला. या डावात फक्त करुण नायरने अर्धशतक झळकावले. इंग्लंडचा संघ फलंदाजीसाठी आला, तेव्हा त्यांचे सलामीवीर फलंदाज बेन डकेट आणि जॅक क्रॉली यांनी चांगली सुरुवात केली, परंतु त्यानंतर भारताच्या गोलंदाजांनी ब्रिटिशांवर पूर्णपणे वर्चस्व गाजवले. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या डावात प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 4-4 विकेट घेतल्या. त्याच वेळी आकाशदीपला यश मिळाले.
पहिल्या डावानंतर इंग्लंडने 23 धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपताच टीम इंडियाचा दुसरा डाव सुरू झाला. केएल राहुल 7 धावा करून बाद झाला आणि साई सुदर्शन 11 धावा करून बाद झाला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपवण्यासाठी साई सुदर्शन बाद झाल्यानंतर, शुभमन गिल स्वतः आला नाही, परंतु आकाशदीपला नाईट वॉचमन म्हणून पाठवण्यात आले आणि पहिले अर्धशतक ठोकले.
हे ही वाचा -





















